आज कालची मुलगा मुलगी पप्पा ला सांगते काळासोबत बदला… टेक्नॉलॉजी शिका…

पप्पा : कधी आलीस बेटा?
मुलगी : दुपारीच आले.
पप्पा : जावई बापूंना का नाही थांबवलं?
मुलगी : आग्रह करायला तुम्ही नव्हता. तशीही तुम्हाला तर ड्युटी प्रिय आहे माझ्यापेक्षा…
पप्पा : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…
मुलगी : पप्पा डायलॉगबाजी नको आता.
पप्पा : बरं राहिलं… सॉरी…
मुलगी : यंदाही लिव्ह नाही ना घेतली?
पप्पा : सणासुदीच्या दिवसांमध्ये आमची जबाबदारी वाढते…
मुलगी : रिटायरमेंटला थोडेच महिने शिल्लक आहेत… किमान… आता तरी…
पप्पा : तेवढं सोडून बोल.
मुलगी : तुम्ही ऐकूच नका.
पप्पा : तुझं कसं चाललंय?
मुलगी : स्टेटस बघत नाही तुम्ही?
पप्पा : म्हणजे?
मुलगी : स्टेटसला रोज तिकडचे फोटो टाकत असते ना मी…
पप्पा : स्टेटस राहू दे बाजूला… तू सांग…
मुलगी : पप्पा काळासोबत बदला… टेक्नॉलॉजी शिका… माझ्या मैत्रिणींचे पप्पा बघा कसे मस्त स्टेटस ठेवतात…
पप्पा : आलोच फ्रेश होऊन.
मुलगी : थांबा.
पप्पा : आता काय?
मुलगी : असे कुत्सित हसून पळू नका.
पप्पा : मग काय करू?
मुलगी : Accept the reality…
पप्पा : तुला वास्तव सहन होईल?
मुलगी : म्हणजे?
पप्पा : म्हणजे तू Reality Accept करशील?

मुलगी : काय ते स्पष्ट बोला…
पप्पा : सुप्रियाचा संसार कसा सुरू आहे?
मुलगी : माझी बेस्ट फ्रेंड ना?
पप्पा : हो.
मुलगी : अगदी सुखात आहे ती…
पप्पा : नक्की?
मुलगी : अहो रोज स्टेटस बघते ना मी…
पप्पा : मग हा व्हिडिओही बघ…
मुलगी : कुणाचा आहे?
पप्पा : तूच ओळख…
मुलगी : हे दोघे… सुप्रिया आणि तिच्या नवऱ्यासारखे दिसत आहेत.
पप्पा : मागच्या आठवड्यात सुप्रियाने Domestic Violence ची केस केली तिच्या नवऱ्यावर…
मुलगी : आई शपथ…
पप्पा : हा मारहाणीचा व्हिडिओ त्यांचाच आहे.
मुलगी : यात तर दोघेही एकमेकांना मारत आहेत.
पप्पा : बघ तूच…
मुलगी : विश्वासच बसत नाहीये.
पप्पा : नाहीच बसणार…
मुलगी : म्हणजे?
पप्पा : हा व्हिडिओ स्टेटसला नव्हता ना.. त्यामुळे तो तुला खरा नाही वाटणार.
मुलगी : पप्पा टोमणे नका मारू…
पप्पा : बरं आणखी एक…
मुलगी : काय?
पप्पा : शांताराम काकांचं काय चाललंय?
मुलगी : त्यांचं तर मस्त चाललंय. रोज देवाचे स्टेटस असतात त्यांचे… साधा सरळ माणूस…
पप्पा : शेवटचं कधी बोलणं झालेलं?
मुलगी : माझं तर नाही, पण आपल्या सोसायटीमधली वर्षा आहे ना…
पप्पा : तिचं काय?
मुलगी : तिने सांगितलं होतं…
पप्पा : काय?
मुलगी : हेच की, शांताराम काकांकडे भारी फायनान्स स्कीम आहे. शेअर मार्केटमधून बराच प्रॉफिट कमवून देतात ते सर्वांना…
पप्पा : हे बघ जरा…
मुलगी : ९० लाखांची आर्थिक फसवणूक?
पप्पा : खालचं नावही वाच…
मुलगी : निवृत्त बँक कर्मचारी शांताराम…
पप्पा : तुमच्या देवमाणसाने २२ कुटुंबांना देशोधडीला लावलं…
मुलगी : पण ते तर माळकरी…
पप्पा : गळ्यात माळ पोटात काळ….
मुलगी : लोकांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय…
पप्पा : तुझा तो क्लासमेट…
मुलगी : कोण?
पप्पा : विक्रम…
मुलगी : अहो तो तर फेमस मोटीव्हेशनल स्पीकर झालाय आता…
पप्पा : खरंच?
मुलगी : त्याचे फोटो आणि व्हिडिओ असतात ना स्टेटसला…
पप्पा : कोणते?
मुलगी : इव्हेंट अन् सत्काराचे…
पप्पा : कर्जामुळे टेन्शनमध्ये होता काय तो?
मुलगी : तो इतरांना डिप्रेशनमधून बाहेर काढतो. टेन्शन तर क्षुल्लक आहे त्याच्यासमोर…
पप्पा : हे बघ जरा…
मुलगी : बाप रे… कधीचा फोटो आहे हा?
पप्पा : अर्धा तासापूर्वीचा…
मुलगी : त्याने आत्महत्या केली?
पप्पा : हो…
मुलगी : कसं शक्य आहे?
पप्पा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात… काहीही शक्य आहे बेटा…
मुलगी : म्हणजे?
पप्पा : मागे मी तुला कॅमाफ्लाज बद्दल सांगितलेलं…
मुलगी : हो… आठवतंय…
पप्पा : काय सांगितलं होतं?
मुलगी : सरड्याला निसर्गाने वरदान दिलं आहे…
पप्पा : कसलं?
मुलगी : स्वतःचा रंग बदलण्याचं…
पप्पा : त्यामुळे काय होतं?
मुलगी : त्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकतो.
पप्पा : म्हणजेच तो इतरांना मुर्खात काढू शकतो…
मुलगी : बरोबर.
पप्पा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, हा स्टेटसही कॅमाफ्लाजसारखा वापरला जातोय.
मुलगी : म्हणजे?
पप्पा : म्हणजे वास्तव लपवून… आभासी जग दाखवलं जातंय.
मुलगी : पण सगळेच तर…
पप्पा : तेच तर अधिक धोकादायक आहे.
मुलगी : का?
पप्पा : कारण या व्हायरल पोस्ट आणि ट्रेंडच्या भाऊगर्दीत, वास्तव ओळखणं कठीण होऊन बसलंय…
मुलगी : मग काय करायला हवं?
पप्पा : डोळ्यांना दिसणाऱ्या सर्वच गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही.
मुलगी : नेमकं करायचं तरी काय?
पप्पा : खातरजमा करायची…
मुलगी : कशी?
पप्पा : मी केली तशी…
मुलगी : नाही समजलं…
पप्पा : तुझ्याकडे तुझ्या संसाराची चौकशी केली ना मी…
मुलगी : हो.
पप्पा : अशावेळी काय असेल ते स्पष्ट बोलून टाकायचं.
मुलगी : समजलं.
पप्पा : मी आठवड्यातून एकदा तरी, कॉल करून तुझ्याशी बोलतो…
मुलगी : हो.
पप्पा : बेटा मी आयुष्याकडून एकच गोष्ट शिकलो…
मुलगी : कोणती?
पप्पा : गर्दीपेक्षा वेगळा विचार करण्याची…
मुलगी : असं का?
पप्पा : तुला माझी फेवरेट म्हण माहीत आहे ना?
मुलगी : हो.
पप्पा : कोणती?
मुलगी : दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं…
संकलन :- पी. एस तायडे. मुंबई.
