ऐतिहासिक घटनेला १३ ऑक्टोबर २०२६ ला ९१ वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित विशेष लेख

भारतीय संविधानचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे गणपती उत्सव, नवरात्रीचे घट बसवितात,ज्या देवीला जन्म देणाऱ्या आई वडिलांचा शिक्षणाचा पत्ता नसलेल्या देवीचा कडक उपासना किंवा पूजा करतात.हिंदू देव,देवीना मानतात ते उघड उघड विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या कष्ट,त्याग व जिद्दीला मूठमाती देऊन गद्दारी करतात. अशा हरामखोरांना स्थानिक आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी धडा शिकवला पाहिजे. त्यांना १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झालेल्या परिषदेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” ही ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.हे माहिती नसावी.त्याला १३ ऑक्टोबर २०२६ ला ९१ वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. १९८० नंतर जन्मलेल्या मागासवर्गीय समाजातील एस सी,समाजाच्या घरात डोकावून पाहिल्यास मनाला खूप वेदना होतात. जातीच्या सवलती आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नेहमी पुढे असतात. नंतर त्याचे श्रेय कोणा देव,देवीला देऊन मोकळे होतात.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झालेल्या परिषदेत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” ही प्रतिज्ञा केली होती या ऐतिहासिक घटनेमुळे येवला येथील या जागेला ‘मुक्तिभूमी’ (अधिकृत नाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) म्हणून ओळखले जाते. आणि याला धर्मांतराचा पाया मानले जाते. या घोषणेनंतर बरोबर २१ वर्षांनी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.या ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली त्याबद्दल किंवा ‘मुक्तिभूमी’ स्मारकाविषयी किती लोकांना माहिती आहे ?
“मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” हे विधान भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी घोषणा मानली जाते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ऐतिहासिक वचन दिले होते. या घोषणे विषयी सविस्तर माहिती किती लोक प्रेरणादायी लक्षवेधी मानतात,ठेवतात ?. ऐतिहासिक पार्श्वभूमी व घोषणा अशी आहे की दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आयोजित भव्य प्रांतीय महार परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा केली होती.कारण हिंदू धर्मातील विषमता, जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि अमानुष वागणूक यामुळे शोषित व दलित वर्गाला मानवी हक्क आणि समता मिळवून देणे हिंदू धर्मात राहून शक्य नाही, या निष्कर्षावर बाबासाहेब पोहोचले होते. त्यांनी स्पष्ट केले होते की, जोपर्यंत हिंदू धर्मात जातीव्यवस्था आणि असमानता आहे, तोपर्यंत अस्पृश्यांचा उद्धार होऊ शकत नाही.तेव्हा येवला येथील या घोषणेने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडवून दिली होती. या ऐतिहासिक घटनेमुळेच येवला येथील या वाड्याला ‘मुक्तिभूमी’ (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) म्हणून ओळखले जाते. या घोषणेचा परिणाम आणि प्रत्यक्ष कृती काय करावी यासाठी त्यांनी २१ वर्षांचा काळ बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना व समाजाला धर्मांतराचा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करण्यासाठी आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी २१ वर्षांचा अवधी दिला होता. या ऐतिहासिक घोषणेची पूर्तता बरोबर २१ वर्षांनंतर, म्हणजेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी वर
बौद्ध धम्मा ची धम्मदीक्षा घेऊन पूर्ण केली.त्या दिवशी त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धम्माची (धर्माची) दीक्षा घेतली आणि मानवी समता, बंधुभाव व करुणा देणाऱ्या धम्माचा स्वीकार केला.या ऐतिहासिक घोषणेमुळे भारतातील दलित व शोषित वर्गाला सामाजिक न्यायाचा नवीन मार्ग मिळाला आणि भारतीय समाजव्यवस्थेत एक मोठे वैचारिक परिवर्तन घडले.हे आज आपण पाहतो. इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो. आणि इतिहास विसरलो तर पुन्हा लाचारी पत्कारावी लागते,नाही तर आत्महत्या करावी लागते.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी पिण्या पासून शिक्षण घेण्यासाठी जो संघर्ष केला. त्याचा येवल्याची ‘मुक्तीभूमी’ हा बौद्ध धर्मांतर चळवळीचा पाया मानला जातो, तर २१ वर्षांनंतर १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे घेतलेली ‘दीक्षाभूमी’ हा त्याचा कळस मानला जातो.या स्मारकासाठी व त्याचा विकास करण्यासाठी त्यांच्या भिम सैनिकांनी जो संघर्ष केला त्याचा ही इतिहास लिहल गेला आहे.१३ ऑक्टोबर २००९ रोजी या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले आणि २ एप्रिल २०१४ रोजी याचे लोकार्पण करण्यात आले.वैशिष्ट्ये: येथे ५० फूट उंच स्तूप आणि ३ टन वजनाची बुद्ध मूर्ती आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या ठिकाणाला ६ डिसेंबर २०२१ रोजी ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. दरवर्षी नेहमी प्रमाणे १३ ऑक्टोबर, विजयादशमी (धम्मचक्र प्रवर्तन दिन), १४ एप्रिल आणि प्रत्येक पौर्णिमेला देशभरातून लाखो अनुयायी येवल्याच्या या ‘मुक्तीभूमी’ ला भेट देऊन अभिवादन करतात.

ज्यांच्या डोळ्यासमोर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आहे तेच लोक अशा स्मारकाला भेट देतात. आणि आज आम्ही जे काही आहोत ते यांच्यामुळे आहोत ही जाणीव ठेवतात. तर काही गद्धार हिंदू धर्माच्या रितीरिवाजांचे परंपरचे हिंदू देव देवीचे उत्सव बेशरम पणे घरात साजरे करतात. आपण पहिले असेल काही लोकांनी घरात पाच,दहा दिवस गणपती उत्सव साजरा केला.आता नऊ दिवस कडक देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतील. म्हणून त्यांची जात काही बदली झाली नाही,होणार नाही. घरात जन्म,मृत्यू आणि लग्न हे त्यांना जातीच्या रितीरिवाजानेच करावे लागते.तिथे हिंदू धर्माचे ठेकेदार त्यांना थारा देत नाही.
ज्यांच्यामुळे शिक्षणात आरक्षणाची सवलत घेतली,त्यामुळेच नोकरीत सवलत मिळाली,त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली आणि सेवा निवृती नंतर ही पेन्शन मिळते. ते ही केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे,हे जे लोक विसरतात आणि हिंदू धर्माच्या सणाचे उत्सवाचे दिवस घरात साजरे करतात त्यांच्या घरावर स्वाभिमानी समाजाने बहिष्कार घातला पाहिजे. कारण म्हातारी मेल्याचे दुख नाही काळ सोकावत चालला आहे. समाजातील लाखों असंघटित कष्टकरी शेतमजूर, शहरातील झोपडपट्टीत राहणारे असंघटित मजूर जेव्हा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतात.तेव्हा हे सुरक्षित नोकरी करणारे सुरक्षित ठिकाणी राहणारे सुरक्षित जीवन जगतात.पण हे गद्धार (काही अपवाद) त्यांचे सर्व श्रेय देव देवी ला देतात. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात शिक्षण घेऊन ३२ डिग्रा पदव्या घेतले. बडोदा येथे सयाजी महाराज यांच्या संस्थान मध्ये नोकरी करण्यासाठी गेल्यावर जो अपमान सहन केला आणि २३ सप्टेंबर १९१७ ला संकल्प केला. त्यानंतर ही त्यांनी २० मार्च १९२७ ला महाड च्या चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला.काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च १९३० रोजी नाशिक (पंचवटी) येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सुरू झालेला एक ऐतिहासिक लढा होता. आणि १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झालेल्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” ही ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.त्याला १३ ऑक्टोबर २०२६ ला ९१ वर्ष पूर्ण होत आहेत.हा इतिहास विसरणारा समाज स्वतःला काय समजते.म्हणूनच अशा लोकांना इतिहास सांगण्याची गरज आहे.यासाठी हा लेख प्रपंच करीत आहे. बाबासाहेबांनी जीवनभर जीवन संघर्ष केला. त्याच्या या संघर्षाला विसरणारा समाज हा गद्दारी करत असेल तर त्यांना योग्य समज देण्यासाठी कोणी तरी पुढे आले पाहिजे.“मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही घोषणा केली होती.कारण हिंदू धर्मातील विषमता,जातीव्यवस्था,अस्पृश्यता आणि अमानुष वागणूक यामुळे शोषित व दलित वर्गाला मानवी हक्क आणि समता मिळवून देणे हिंदू धर्मात राहून शक्य नाही, हे त्यांनी त्याकाळी अनुभवले होते.त्या नंतर आज ही साहिल वाकोडेला आत्महत्या का करावी लागते. याचा गांभीर्याने विचार न करता गणपती,नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्यांना काय म्हणावे?. “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही” ही ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती.त्याला १३ ऑक्टोबर २०२६ ला ९१ वर्ष पूर्ण होत आहेत.त्यात सहभागी झालेल्या ज्ञात अज्ञात अनुयायांना आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

