पद्मावती शामराव सामाजिक व शैक्षणिक संस्था च्या वतीने संविधान वाटप

बातमी शेअर करा.

मराठे लागले संविधान वाटायला आणि वाचायला

सुधीर जाधव- नळवाडीकर हे व्हीजेटीआय, माटुंगा, मुंबई येथून वरिष्ठ यंत्रचालक म्हणून 38 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त- झाले आहेत. ते संविधान जनजागृती अभियाना अंतर्गत 500/- रुपयांचे 300 पानांचे भारतीय संविधान 150/- रूपयांला देण्याचा संकल्प अभियान राबवित आहेत.”पद्मावती शामराव सामाजिक व शैक्षणिक संस्था”आई – वडिलांच्या नावे त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. नेरूळ नवी मुंबई व नळवाडी, तालुका उमरगा. या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे.
एक सुंदर निमित्त असे की, भारतीय संविधान अंमलात येऊन 2026 मधे 75 वर्षे झाली. (1950–2026) शाळेच्या अभ्यासक्रमाची पुस्तके, लग्नसमारंभ,वाढदिवस इ.चे आल्बम घरोघरी असतात.पण भारताची सरकारे,न्यायालय,संरक्षण, कोणतादेश पेट्रोल देणार,परराष्ट्र धोरणासहित अक्षर नि अक्षर ज्याचा आधार असल्याशिवाय चालत नाही ते संविधान कोण बघितले, कोण वाचले. अगदी हातात धरून संविधान किती जणांनी बघितले कोण जाणे.

नेरूळ नवी मुंबई येथे स्व.आर.आर.आबा पाटील बागेत नित्यनियमाने फेरफटका मारण्यासाठी ज्येष्ट नागरिक येतात अशा जेष्ठ मंडळींनी एकत्र येऊन नांव नोंदणी करुन संविधान विकत घेतले. ज्याचे वितरण सुधीर जाधव यांनी केले त्यावेळी सर्व मान्यवर श्री पुरुषोत्तम ओझरकर, विष्णू पाटील, बी. एम. आचार्य, प्रविण बर्वे, आत्माराम पार्टे, सुनील पाटील, दिलीप काटकर, अमोल सरडे व त्यांचे गावाहून आलेले त्यांचे वडील यावेळी उपस्थित होते.

त्याच बरोबर सफल सोसायटी नेरूळ येथील सुरक्षारक्षक मिश्रा, इस्त्रीवाला बबलू, सफाई कामगार सौ.पुष्पा लोंढे यांना संविधान प्रत सुधीर जाधव यांनी भेट म्हणून दिली. 

 सुधीर जाधव- नळवाडीकर हे व्हीजेटीआय, माटुंगा, मुंबई येथून वरिष्ठ यंत्रचालक म्हणून 38 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त- झाले आहेत. आज त्यांचे वय 66 वर्ष आहे.ते समाजशास्त्राचे पदवीधर असून सध्या महात्मा गांधीं व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व व विचार अभ्यासत आहेत.25 वर्षे महाराष्ट्रातील टेक्निकल, नाॅन टेक्निकल व प्रशासनिक कर्मचारी चळवळीचे अभ्यासक व संघटनेचे खंदे पदाधिकारी होते.ते हिंदू धर्म व जगातील विविध धर्माचे अभ्यासक आहेत. शिवाय मुक्त पत्रकार म्हणून ते विविध वृतपत्रात नियमितपणे विविध विषयांवर लेख लिहतात.

  चला तर मग–“घरोघरी संविधान” या मोहिमेत सामील होऊन सवलतीचा फायदा घेऊ. कारण 500/- रुपये छापील किंमत असलेले भारतीय संविधान 150/- रुपयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुक करुया.संपर्क- सुधीर -9869415533 सकाळी 11 ते सायं, 4 पर्यंत.सुचना- किती प्रती,मराठी, इंग्रजी कि हिंदी. (150/- रुपये प्रत्येकी )
 जी.पे.मेसेज,नाव व पत्ता पाठवावा.आवश्यक असेलच तर फोन जरुर करावा. असे सुधीर जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *