समता भूमी फुले वाड्यात विचारांचे दीप प्रज्वलित

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी पुणे -महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गेले ५२ वर्षे अखंडित सुरू असलेली प्रबोधनाची परंपरा म्हणजे ‘फुले,आंबेडकर व्याख्यानमाला’ दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून हे ५२ वे वर्ष आहे.या वर्षीच्या व्याख्यानमाले दरम्यान लेखक व व्याख्याते भारत पाटील यांनी ‘तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता आणि उद्रेक’ या अत्यंत महत्वपूर्ण विषयावर प्रभावी मांडणी केली. या सत्राचा अध्यक्ष म्हणून विचार मांडण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे.असे कामगार नेते काशीनाथ नाखाते यांनी सांगितले.

कोरोनासारख्या कठीण काळातही अविरत सुरू राहिलेल्या या प्रबोधन पर्वाचा भाग होण्याची व विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार.कार्यक्रमाला ॲड.शारदा वाडेकर, ॲड.मोहन वाडेकर,ओमकार मोरे यांसह परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. समता,शिक्षण आणि प्रबोधनाचा दीप असाच तेजाने प्रज्वलित राहू दे !

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *