डॉ. सोनाली खडके यांची शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा युवती सेनाप्रमुखपदी  नियुक्ती.

बातमी शेअर करा.

कोल्हापूर प्रतिनिधी :  खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील  डॉ. सोनाली सागर खडके यांची शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे)  युवती सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते त्यांना कोल्हापूर येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.
डॉ.सोनाली सागर खडके या खुटाळवाडी ( ता. शाहूवाडी) येथील रहिवासी असून तेथेच  त्या वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांचे पती सागर खडके हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून शाहूवाडी तालुक्यात सक्रीय आहेत. डॉ. खडके यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेची दखल घेऊन युवासेनेचे राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव किरण साळी,कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक तथा युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य व युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी मुरलीधर जाधव यांच्या सूचनेनुसार डॉ.खडके यांना शाहूवाडी व हातकणंगले तालुका विधानसभा क्षेत्राच्या जिल्हा युवती सेना प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.डॉ.खडके यांच्या नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यास युवा सेना जिल्हा प्रमूख राकेश खोंद्रे व निशीकांत पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा प्रमूखपदी नियुक्ती झाल्याबद्दल  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
   र.वि.माळापुडेकर 8691883214 यांस कडून 





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *