
तुम्ही बौद्ध आहात काय?. तुम्ही स्वताला बौद्ध समजता पण आचरण कसे करता. बुद्धाच्या पाय पडून पुजा केली पाहिजे की प्रचांग प्रणाम?. किती लोकांना यातील फरक माहिती आहे. म्हणूनच आज मी आपल्या समोर घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा हे सांगण्यासाठी उभा आहे.भांडुप विभागातील धम्म उपासिका महिला संघाच्या बैठकीत सागर तायडे धम्म प्रचारक घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?. याबाबत ते बोलत होते.
घरात बसून बुद्ध उत्सव साजरा केला तर त्रिसरण,पंचशील यांचा अर्थ समजून घेता येईल.आणि त्यांचे आचरण घरातुन सुरू झाले तर तुम्ही कुठेही गेला तर ते संस्कार आपण विसरुच शकत नाही. हे संस्कार नसल्यामुळेच बुद्ध विहारे परिवर्तनांचे केंद्र झाले नाही. कारण विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.दुःख आहे,त्याला कारण आहे त्यांचे निवारण करण्यासाठी उपाय सुद्धा आहे.त्यासाठी बुध्दांनी दाखविलेल्या मानवमुक्तीच्या मार्गाने आपणांस जावे लागेल. सात दिवस घरात बुद्ध उत्सव साजरा केला तर अनेक समस्यांचे निवारण करता येते. कसे ते समजून घेणे महत्वाचे असते. यानिमित्ताने मित्रमंडळी हितचिंतक नातलगांना आपल्या घरी बोलवा त्यांनी घरातील वातावरण पाहिल्यावर हमखास कुटुंबातील व्यक्तीची चौकशी केल्या शिवाय राहणार नाहीत.मग मुलामुलींचे,शिक्षण,नोकरी,आणि लग्न यांची माहिती विचारल्या शिवाय घरी आलेला माणूस शांतपणे जाऊच शकत नाही.हीच बुद्धांच्या विचारांची शक्ती आचरणातून दिसते. तीच सर्वश्रेष्ठ आचरण इतरांस प्रेरणादायी व लक्षवेधी ठरते. बुद्ध उत्सव घरात साजरा करणे निश्चितच हे एक लहान वाटणारे पण महान कार्य आहे. ह्यातून बौद्ध उपासक प्रेरणा घेऊन आपल्या घरी दररोज वंदना घेऊन आपल्या मुलांवर,नातूनातवांवर संस्कार करतील की आपण बौद्ध आहोत. बौद्धांच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे.त्याने त्यांना धम्माचे संघांचे महत्व पाटल्या शिवाय राहणार नाही. जगातील एकशे चाळीस देशात सम्राट अशोक कालीन बुद्ध उत्सव घरात साजरा केला जातो.त्यामुळे त्या देशातील धम्म उपासकांची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. आपले आपल्या जिल्ह्यातील गांवचे काय?. बाबासाहेबांनी सांगितले होते खेडे सोडा,शहर गाठा.गावात लाचारीने मिळणारी भाकरी,आणि शहरातील स्वाभिमानाने मिळविलेली कष्टाची भाकरी फरक पडला की नाही.
जगातील बुद्ध धम्माचे उपासक हेच आचरण करत आहे.पण ते आपणास कळत नाही,कोणी सांगत असेल तर त्यावर आपण विश्वास ठेवत नाही.वंदना घेत नाहीत. अनेक लोक बौद्ध तत्वज्ञानाचा लाभ घेतात पण बुद्धाला वंदन करत नाहीत.आपले तसे नाही. संपूर्ण विश्व सुखी व्हावे हे आपले उद्दिष्ट आहे.ज्यामुळे सर्व सुखी होतील.पण घरात आपण शुद्ध बुद्ध नसलो तर बाहेर आपली ओळख काय करून ठेवली यांचे आत्मचिंतन करण्यासाठी घरा घरात सम्राट अशोक कालीन बुद्ध उत्सव घरात साजरा केला पाहिजे.कोल्हापुरच्या सिद्धार्थ नगर मधून आयु.देवदास बानकर संपादक दैनिक मुक्तनायक यांनी २०१५ पासून दहा वर्षापूर्वी सुरवात केली होती.गेल्या वर्षी तो घरा घरात बुद्ध उत्सव १८ जिल्ह्यात साजरा केला गेला.आता त्याचा जस जसा प्रचार व प्रचार होईल तस तसे धम्म उपासक उपासिका तो घरा घरात उत्सव साजरा करतील यावर्षी २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२५ असा सात दिवस हा बुद्ध उत्सव घराघरात साजरा केल्या जाणार आहे असे धम्म प्रचारक सागर रामभाऊ तायडे यांनी सांगितले.
भांडुप विभागातील धम्म उपासिका महिला संघाच्या वतीने घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?. ही जन जागृती अभियान सागर तायडे धम्म प्रचारक अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित आहेत. त्यात तुळजाबाई इंगळे,चंद्रकला तायडे, सुनीता तायडे,कोकिळा बांगर,ज्योती थाटे,सुनीता गौतम तायडे,वंदना हिवराळे,विजया वानखडे,ह्या घरो घरी महिलांना एकत्र करून धम्मातील संघाचे महत्व सांगण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.गेल्या वर्षी माता रमाबाई आंबेडकर नगर,मध्ये आयू. सुनिल सोनताटे बौद्धाचार्य यांच्या नेतृत्वाखाली चाळीस पंचेचाळीस घरात आणि भीमनगर आंबेडकर नगरातील काही घरात बुद्ध उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता.यावर्षी त्यात मोठ्या संख्येने भर पडणार आहे. त्या दुष्टिने जन जागृती सागर तायडे धम्म प्रचारक अभ्यासक,आयु.सुनिल सोनताटे बौद्धाचार्य भांडुप विभागातील धम्म उपासिका महिला संघाच्या वतीने केला जात आहे.
आयु.सुनिल सोनताटे बौद्धाचार्य ९९८७८१९६१५ भांडुप यांस कडून

