
छत्रपती शिवरायांचे आरमार बुडवून पेशवाई आली. यामुळेच कोकणात खोत सावकारी आली.आगरी कोळी भंडारी कुणबी कराडी आणि बारा बलुतेदार उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे गुलाम झाले.महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ अभ्यासकांनी संदर्भ म्हणून वाचावा.त्यातील वर्णनापेक्षा भयानक कोकणातली परिस्थिती होती.ओबीसी लोकांना या मनुस्मृतीच्या शोषणाचा धार्मिक रूढींचा प्रचंड वाईट अनुभव होता.ओबीसी जाती आज जशा हिंदू वैदिक धर्माच्या मानसिक गुलाम आहेत.तशीच किंवा अधिक वाईट परिस्थिती त्या काळात कोकणात होती.जागतिक गुलामी काय होती? आणि भारतीय स्त्री शूद्र अतिशूद्र गुलामीचा अभ्यास महात्मा जोतिबा फुले यांनी केला होता.याच महात्मा जोतिबा फुले यांना गुरु म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे कार्य केले. शेतीच्या सातबाऱ्यावर मालक नसलेल्या,परंतु १००टक्के शेती करणाऱ्या,भूमिहीन,शेतमजूर आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी शेतकऱ्यांच्या,उच्चवर्णीय “शोषणाचा” शास्त्रीय अभ्यास केला.ही गुलामी केवळ आर्थिक नव्हती.तर तिला हिंदू विषमता धर्माचा पायाभूत आधार होता.हजारो वर्षे अशी धार्मिक गुलामी असूनही त्याविरोधात बंड करणे शूद्र (ओबीसी) शेतकऱ्यांना धर्माच्या कडव्या श्रद्धेमुळे शक्य होत नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शूद्रांची गुलामी समजलेले महान विचारवंत नेते होते.आजच्या काळात ओबीसी जातीना ही गुलामी जरी मान्य होत नसली ?तरीही वर्तमान काळात अशी गुलामी पुन्हा येत आहे.त्यासाठीच हा लेख आहे.
माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला,शेतमजूर ओबीसी जातींची गुलामी समजाऊन सांगताना प्रचंड विरोध उच्चवर्णीय जातींकडून होत आहे.परंतु आजच्या सारखी प्रसार माध्यमे, प्रवासाची साधने जवळ नसताना. स्वातंत्र्य पूर्व काळात आगरी नेते नारायण नागू पाटील यांना आणि सर्व शेतकऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३२सालचा विश्व विक्रमी शेतकरी संप करण्यास कसे जागविले असेल?.म्हणूनच आगरी कोळी ओबीसी शूद्र जातींचा आजचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या विचारांना मी नुसते वंदन करीत नाही,तर या मार्गावर त्यांचे कुळ कायद्यांमध्ये लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य अभिमानाने करीत आहे.लोकांचा २००५ सालापासून या जमीन हक्कांसाठी सक्रिय पाठिंबा मिळत आहे.म्हणूनच या संघर्षमय जीवनात मी टिकून आहे.त्यासाठी मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे.
कोकणातल्या उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जमीनदारांविरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील जे आंदोलन केले.त्यांचा विचार दोन शब्दात असा होता.”कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर.” यावर आजच्या आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी बारा बलुतेदार स्त्री शूद्र अतिशूद्र यांची नव्या भारतीय राष्ट्रवादाची उभारणी झाली आहे.जर आमच्या निष्क्रियतेने “हिंदुराष्ट्र” झाले? तर आजच्या आमच्या घरा खालची आणि शेताची जमीन आमच्या मालकीची राहणार नाही.SRA प्रकल्पात घरांचा अनुभव आलाय.सिडको नैना एमआयडीसी एम एम आरडी विमानतळ प्रकल्प तिसरी मुंबई यात आपण भयानक अनुभव घेत आहोत.या पुढील कटू सत्याची सुरुवात भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांनी केली आहे. “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” या म्हणीनुसार स्वतः शूद्र ओबीसी असलेल्या आणि नावात “बावन्न कुळे” असलेल्या या मंत्र्याने कुळ कायद्यातील महत्वाच्या (७० ब) या “कुळ अस्तित्व” सांगणाऱ्या कायद्याला धोका निर्माण केला आहे.मी त्याचा जाहीर निषेध करतो.

अर्थात मा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी विरोधी भूमिका घेऊन,पुन्हा (पेशवाई) खोत सावकारी ब्राह्मण,मराठा,वैश्य लोढा अदानी यांची (मनुस्मृती) घेऊन येणारी ही गद्दारी,शेतमजूर भूमिहीन ओबीसींचा सर्वनाश करणार आहे.कोकणातील खोत जमीनदार हे कधीच प्रत्यक्षात जमीन कसत नव्हते.जमीन प्रत्यक्ष करणारे शेतकरी हे शूद्र ओबीसी शेतकरी आहेत.तर जमीनदार उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य हे उच्चवर्णीय आहेत.अशी हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्याची विभागणी कोकणातल्या शेतीतही आहे.ही विषमता दूर करून,जमीन हक्कांमध्ये “शूद्र “ओबीसी शेतकऱ्यांना जमीन मालकी देणारा कुळ कायदा १ एप्रिल १९५७ साळी अस्तित्वात आला.
ओबीसी एससी एसटी यांच्या सामाजिक मागासलेपणाचे आरक्षण संपविण्यासाठी आलेली सर्वपक्षीय सरकारे ही नेहमी त्यांच्या फायद्यासाठी कर्तव्यदक्ष आहेत.त्याचप्रमाणे ओबीसी एससी एसटी या शेतमजूर,भूमिहीन लोकांना जमीन मिळूच नये.मिळाली ?तर ते सेझ सिडको एमआयडीसी या सरकारी भूसंपादनातून पुन्हा पुन्हा भूमिहीन व्हावेत,ही उच्चवर्णीय खेळी आजही प्रशासनात चालू असते.आरक्षणाच्या बाबतीत शिकलेला वर्ग थोडा जागृत आहे.परंतु कुलकायद्यातील पळवाट शोधून आपली जमीनदारी कायम ठेवण्यासाठी मराठा ब्राह्मण जमीनदार वर्ग कायम राजकारण प्रशासन मिडियायात तत्पर आहे.
स्वातंत्र्यानंतर कुळ कायद्याची अंमल बजावणी व्हावी. यासाठी आरक्षणास अनुकूल जशी जनआंदोलन झाली .तशी जमीन हक्कांची आंदोलने झाली नाहीत.लोक यासाठी मदत करायला तयार नाहीत.आता मात्र शासन निर्णयाविरोधात ओबीसी शेतमजूर,भूमिहीन लोकांनी कुळ कायद्यासाठी लढायचे आहे.त्यासाठी सक्रिय सहभाग आणि आर्थिक सहकार्य आवश्यक आहे.अन्यथा आमच्यावर पुन्हा गुलामी आहे.
आमचे महसूल मंत्री म्हणतात.कोकणातील कलम ७०ब च्या गैरव्यवहाराची चौकशी होणार.?कोकण किनारपट्टी भागातं महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मधील कलम ७०ब चा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे.त्याच्या तक्रारीची शासनाने दखल घेतली आहे.अर्थात या तक्रारी पूर्वीच्या जमीनदार खोत सावकार यांच्याच असणार आहेत.भाजपचे शासन म्हणजे पेशवाई ब्राह्मण हित साधणारे सरकार.भूमिहीन ओबीसी कुळांना ते भूमाफिया म्हणते.शेतकऱ्यांची लढाऊ चळवळ संपल्याने, भाजपा सरकार हे धाडस करते आहे.
१९९६ साली शिवसेना भाजपा सरकार मध्ये मनोहर जोशी हे ब्राह्मण मुख्यमंत्री असताना .आपल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींच्या आग्रहाने कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबवा असे गुप्त आदेश प्रशासनाला काढले होते.पीक पाणी नोंद थांबविली गेली होती.आताही तहसील,प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी कोकण आयुक्त “७० ब “दावे स्वीकारायला तयार नाहीत.ते सांगतात “आम्हाला वरून आदेश आहेत.”अर्थात आताही पेशवाई खोत सावकाराचे ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.या प्रकरणावर प्रत्येक गावी प्रलंबित असणारे ७० ब दावे सादर करण्यासाठी मी अनेक लढाऊ वकील आणि पत्रकार घेऊन ग्रामसभा लावणार आहे.हा प्रश्न गावठाण आणि घर हक्कांचा देखील आहे.नवी मुंबई महानगर पालिकेतील गावठाण घरांना हजारो नोटीस लागल्या आहेत.लोकांना हल्ला कुठून? कसा? होतोय हे समजत नाही.
कुळ कायद्याची अंमलबजावणी व्हावी.यावर चर्चा व्हावी.आंदोलनाची दिशा ठरावी.असे मला वाटते.लोकांनी सावध व्हावे.ज्यांना शक्य असेल.त्यांनी या कायद्या सादर्भात लोकांना आपल्याकडील आवश्यक ती माहिती पुरवावी.अशी कुळ कायद्याची चळवळ मी सुरू करीत आहे.ज्यांच्या कडे अशा जमिनी कसायला असतील.पण सावकाराचे नाव सातबाऱ्यावर असेल.असा सावकार शेतात आला तर त्याला अडवा.जमिनीचा ताबा सोडू नका.आज रायगड जिल्ह्यात प्रति गुंठा भाव सात ते दहा कोटी रुपये आला आहे.समुद्र किनारी भागात हा भाव गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात असाच आहे.तो शेतकऱ्यांना सांगितला जात नाही.फसवणूक होत आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत.आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे.आगरी कोळी कुणबी भंडारी कराडी बारा बलुतेदार बौद्ध,मुस्लिम,ख्रिश्चन यांनी एक होऊन ही लढाई लढायची आहे.
राजाराम पाटील ८२८६०३१४६३
उरण जिल्हा रायगड.

