पंचशील नगर,सायन कोळीवाडा येथे प्रजासत्ताक दिनी महिला मेळावा संपन्न:

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी सायन मुंबई (दिनांक 27 जानेवारी 2025) भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचशील नगर पाईप लाईन सायन कोळीवाडा येथे आम्रपाली महिला महिला मंडळ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक महिलांचा मेळावा घेण्यात आला.या महिला मेळावा प्रसंगी पंचशील नगर नंबर १,२,३ आणि सावित्रीबाई फुले वसाहत या नगरातील सुमारे २०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या.या निमित्ताने भेटरूपी वस्तूचे वाटप करण्यात आले.

सदर महिला मेळाव्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते श्री.प्रतीक पवार करुळकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये त्यांनी असे प्रतिपादन केले की,ज्योतिबांच्या सोबत आणि नंतरही सावित्रीबाईंनी चालवलेला शिक्षणाचा वसा आणि अशिक्षित रमाईचा त्याग आणि करूणे पलीकडचा लढा जोपर्यंत महिलांना सांगितला जात नाही, तोपर्यंत महिलांना खऱ्या सावित्रीबाई आणि खरी रमाई कळणे कठीण होऊन जाईल.म्हणून स्त्रियांना आता फक्त मातृत्व,करुणा,दया, सोशिक यांसारख्या संकल्पनांच्या बाहेर पडून सुशिक्षित आणि प्रतिभाशाली सुद्धा होणे गरजेचे आहे असे सांगितले .

 सौ.धनश्री ध.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर महिला मेळाव्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस अस्मिता प्र.पवार आणि त्यांच्या कार्यकारिणीने मेहनत घेतली. त्याचबरोबर स्थानिक बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 663 आणि पंचशील गृहनिर्माण संस्था चे पदाधिकारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केल्याचे दीपक जाधव यांनी सांगितले.

जगदिश पाटणकर 9867551952, यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *