धम्माच्या मार्गावर कसं आणायचं? लोकांना?

बातमी शेअर करा.

हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.याच कारण इतर सर्व प्रकारच्या धर्मातील लोकांना त्यांच्या प्रमुखांनी काही मार्ग सांगितला आहे.तो मार्ग ते स्विकारून त्याप्रमाणे ते आपल्या धर्माच पालन करतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास समजावून सांगितलेला धम्म मार्ग त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपणास दिला आहे.अस म्हणण्यापेक्षा तो सध्याच्या काळात जगातील सर्व लोकांना समजावून सांगितला आहे.हा केवळ आपल्या च बांधवांसाठी लिहिला नाही.म्हणून तर हिनयान,महायान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ नवयान आज जगाला प्रेरणा देत आहे.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास आपला गौरवशाली उज्ज्वल इतिहास आणि भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म मार्ग समजावून सांगितला आहे.यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी अत्यंत विचारपूर्वक हा ग्रंथ लिहिताना जगातील सर्व लोकांना समजावून सांगताना हा विषय आणि विचार मांडला आहे की,आजच आधुनिक जग आणि या जगातील आजचा वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे.यानुसार त्यांनी या ग्रंथाची रचना केली आहे.यातील प्रत्येक शब्द, विचार आणि विषय हे आपला शास्त्रीय दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे.

    आपली समस्या हि आहे की, ज्यांना हा शास्त्रीय दृष्टिकोन नाही,अशा अनेक लोकांना हा संपूर्ण सत्यतेचा पाठपुरावा करण्यासाठी भयंकर अडचणी येत आहेत.त्यांना अनेक शब्दांचा, विचारांचा,त्या ग्रंथातील एकूणच रचनेचा आराखडा लक्षात न आल्याने ते आपल्या परिने हा विषय आणि विचार आपल्या ज्ञानाचा उपयोग करून लोकांना धम्म मार्ग समजावून सांगत आहेत.या चुका होणारच कारण मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, विषय आजही अनेक मोठ मोठ्या विचारवंतांना आतून बाहेरून पार हादरून टाकत आहेत.अस असताना सामान्य माणसाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार,विषय जसेच्या तसे कसे समजणार आहेत.आता मी माझेच याबाबत अज्ञान सांगतो.मी अनेक वर्षांपासून प्रथम त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापोडी येथील विहारात जाऊन माझी मजल धम्म मित्र पर्यंत झाली.पुढे सतत माझे थोरले बंधू धम्मचारी धर्मोदय ज्यांचा संबंध या विहाराचे पायापासून ते अनेक ठिकाणी जी विहार बांधली गेली त्यांचे ते आणि त्यांचे वडिल माझे काका वसंतराव दादासाहेब इनामदार यांनी याबाबत प्रचंड कष्ट घेतले आहेत.


   इतका प्रदीर्घ अनुभव त्यांचा आहे.त्यांच्यामुळेच मला हा धम्म मार्ग समजला आहे.याबाबत मी तेथील अनेक शिबीरात सहभागी होऊन धम्म मार्ग समजावून घेतला.पुढे गोएंका गुरुजींच्या हातकणंगले तालुक्यातील विहारात जाऊन एकदाच दहा दिवसांचे शिबीरात सहभागी होऊन धम्म मार्ग समजावून घेतला.अनेक धम्म परिषदा, धम्म व्याख्यान, धम्म विचार, धम्म विचारवंत, धम्म अभ्यासक आणि संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, विषय समजून घेण्यासाठी आवश्यक प्रयत्न करत आहे.माझे अनेक मित्र हे धम्मचारी आहेत त्यांच्याशी संवाद होत असतो.मला या बाबतीत सर्वात जास्त माझ्या याबाबत विचारांवर मा.आयु.सी.आर.सांगलीकर सर यांचा प्रभाव पडतो आहे.कारण एकच आहे.त्यांचा धम्म मार्ग आणि विचार याबाबत मी जेव्हा पासून म्हणजे 2018 पासून जसा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा पासून आजतागायत मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे की, जगातील सर्व मोठ मोठ्या धम्म मार्गावरील लोकांकडून त्यांना मार्गदर्शन मिळत आहे आणि ते सतत ते घेत आहेत असं असताना ही ते बोलताना म्हणतात की मी अजिबात याबाबत ज्ञान प्राप्त केले नाही त्यांना कोणताही अहंकार नाही कि मी याबाबत ज्ञान प्राप्ती केली आहे.ते सतत यासाठी चोवीस तास स्वतःला या कामासाठी सजग ठेवत आहेत.त्यांनी गुगवाडला महाराष्ट्र येथे वीस कोटींपेक्षा जास्त स्वखर्चाने मोठे विहार बांधले आहे ज्याचा 12 नोव्हेंबर 2026 रोजी चौथा वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे.याचे नियोजन झाले आहे.सांगायचं तात्पर्य हे आहे की,इतका मोठा माणूस पण अहंकार नाही.हे विहार तुमचे आहे.तुंम्हीच ते सांभाळातुम्हीच हा धम्म मार्ग लोकांना समजावून सांगण्यासाठी सतत प्रयत्न करत रहा मी तुमच्या सोबत आहे. याविषयावर मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे.
धन्यवाद.

सुभाष भाऊसाहेब इनामदार-९०९६१९००९६ (वीर शिदनाकांचे वंशज.)

मु.कळंबी.ता.मिरज.जिल्हा -सांगली.वीर शिदनाक बहुउद्देशीय संस्था कळंबी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *