धम्माचे काम करणे खूप कठीण आहे.वर्षवास तथा कठीण चिवरदान कार्यक्रम कठीण आहे.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी (सागर तायडे ) ठाणे – खरंच, धम्माचे आणि समाज परिवर्तनाचे काम करणे अतिशय कठीण, संवेदनशील आणि निष्ठेचे असते. यामध्ये अनेक अडचणी, आव्हाने आणि संघर्षाचा सामना करावा लागतो, परंतु तुमचे हे धम्म कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि समाजमनाला नवी दिशा देणारे आहे. धम्माचे आणि समतेचे काम करताना अनेकदा विचार आणि भावना शब्दांत मांडणे कठीण होऊन जाते.आज शांतीदूत एज्युकेशनल अँड सोशल अकॅडमी ठाणे (रजि) संचालित व निर्मित शांतिदूत बुद्ध विहार महिला मंडळ चित्तसर मानपाडा ठाणे पश्चिम यांच्या माध्यमातून शांतीदूत बुद्ध विहार चितसर मानपाडा घोडबंदर रोड ठाणे (पश्चिम) येथे सालाबाद प्रमाणे बुधवार दिनांक २९/०७/२०२२६ आषाढ पौर्णिमा ते सोमवार दिनांक २६/१०/२०२६ अश्विनी पौर्णिमा असा तीन महिन्याचा वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कालावधीत चितळसर मानपाडा परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील सत्वशील श्रद्धावान शीलवान सर्व धम्म उपासक उपासिका दररोज रात्री आठ ते रात्री 10 या वेळेस शांतीदूत बुद्ध विहारात नित्य नियमाने धम्म ध्यान साधना,विपश्यना संपूर्ण बुद्ध वंदना घेण्यासाठी व भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचनाच्या वेळी उपस्थित राहत होते. तसेच वर्षावास कालावधीतील सर्व पौर्णिमेच्या दिवशी विहारात उपस्थित पूजनीय भंतेजींना सकाळी 11 वाजता भोजनदान देण्यात येत होते. तसेच सर्व पौर्णिमा,अष्टमी, अमावस्या प्रत्येक रविवारी उपस्थित पूजेनीय भंतेजी व धम्म उपासक उपासिका यांना सुजाता खिरदान व अल्पोहार देऊन दान पारमिता पुण्य संपादन करत होते. त्याचा समारोप रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी शांतिदूत बुद्ध विहार येथे संपन्न झाला.

   यावेळी पूज्य भिक्खू बोधानंद महाथेरो यांनी धम्माचे काम करणे कसे कठीण आहे. त्याचे पंधरा वीस वर्षांपूर्वी अनुभव सांगितले. जेव्हा हेच शांती दूत बुद्ध विहार आठ फुट बाय दहाची झोपडी होती. आज त्याच बुद्ध विहारात पांच देशाचे प्रसिद्ध भिक्कु येवून धम्म सांगत आहेत.धम्माचे कठीण आचरण केल्यामुळे ते सुखी समाधानी आहेत. आपण ही त्यांच्या सारखे आचरण करून सुखी समाधानी झाले पाहिजे असे बोधानंद महाथेरो यांनी सांगितले. यावेळी तिबेट च्या दलाई लामा सोबत राहणारे अत्यंत विश्वासू लामा उपस्थित होते. त्यांनी तिबेटी भाषेत त्यांच्या धम्म कार्याची माहिती दिली. त्याचे मराठी मध्ये सविस्तर माहिती के.आर.लामा यांनी धम्म उपासक उपसिका यांना दिली.पूज्य लामा यांनी लडाक मध्ये शंभर कोटीचे सुंदर बुद्ध विहार बांधले आहे. तिथे धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने भेट देतात. तुम्ही स्वर्ग पाहिला काय?. फक्त सुंदर वर्णन ऐकले आहे.तो पाहण्यासाठी लामाजी च्या लडाक बुद्ध विहारा भेट द्यावी असे आवाहन के. आर.लामा यांनी केले.तुम्ही धम्म कार्य करता ते कुशल कर्म आहे. किती कठीण आहे? आज तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागले. कारण तुम्हाला लामा भंते च्या शांतीदूत बुद्ध विहार चितळसर मानपाडा घोडबंदर रोड ठाणे येथे कठीण चिवरदान कार्यक्रमाला उपस्थित राहायचे होते. रेल्वे,बस,रिक्षाचा कठीण प्रवास करून आला.त्यामुळेच आजचा हा कठीण चिवरदान कार्यक्रमाला यशस्वी झाला. तुम्ही धम्माच्या बाबतीत जागरूक होता म्हणून येते आला. त्यामुळे तुमचे आणि माझे नांव झाले नाही तर धम्माचे नांव झाले. असेच धम्माच्या कार्याबाबत जागरूक राहावे ही मंगल कामना व्यक्त करतो. 

  मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य शांती रत्न म्हणाले की कार्यकर्त्यांचे महत्त्व आणि आव्हाने निस्वार्थ समर्पण, धम्माचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कसलाही मोबदला किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आपले घर, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य बाजूला सारून समाजासाठी झटावे लागते.वेळोवेळी त्यांना प्रसंगी कठीण संघर्ष करावा लागतो.बौद्ध धम्माचा विचार घराघरांपर्यंत पोहोचवताना अनेक वैचारिक विरोध,सामाजिक अडचणी आणि अपप्रचाराचा सामना करावा लागतो. परंतु, भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे धम्माचे कठीण आचरण आणि निष्ठा बाळगून हे कार्यकर्ते धम्म उपासक प्रज्ञा,शील आणि करुणेचा संदेश पसरवतात असतात.शांतीदूत बुद्ध विहार निर्मिती साठी के. आर.लामा व बोधानंद यांनी केले संघर्ष, त्याग आणि प्रामाणिकपणा आजच्या या कठीण चिवर दानाच्या कार्यक्रमा तून आपल्या सर्वांना दिसत आहे. आपण धम्म उपासक उपासिका कुठून कुठून या ठिकाणी आले. त्यासाठी आपण किंमती वेळ आणि श्रमदान दिले. हे कार्यकर्ते स्वतःचा श्रम, वेळ आणि आर्थिक ताकद उभी करून बुद्ध विहारात सतत कार्यक्रम घेत असतात.त्याचा समारोप तुमच्या उपस्थित होतांना सर्वानाच आनंद होत असतो.अंधश्रद्धेकडून विवेकाकडे, द्वेषाकडून मैत्रीकडे आणि अज्ञाना कडून प्रज्ञा कडे समाज नेण्याचे काम हे भंते आणि कार्यकर्ते करत असतात.त्यांना सर्वांनी योग्य ती मदत आणि सहकार्य केले पाहिजे. आज ठाणे, मुंबई, विक्रोळी,भांडूप किंवा इतरही भागातील जे जे धम्म उपासक-उपासिका आणि कार्यकर्ते पांढरे वस्त्र परिधान करून शिस्तीत,तन-मन-धनाने या कार्यात सहभागी झाले,भांडुप चे धम्म उपासिका मंडळ प्रत्येक भिख्खू च्या व भिख्खू संघाच्या कार्यक्रमात सहभागी असतात. अनेक धम्म उपासिका मंडळ फक्तधम्मासाठी काम करतात. म्हणूनच ते संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या याच निष्ठेमुळे तथागत बुद्धांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचत आहेत.असे शांतीरत्न यांनी सांगून सर्वांना मंगल मैत्री व मंगल कामना व्यक्त केली. 

 यावेळी जपान,श्रीलंका,म्याममार,विविध देशातील पूज्य भंतेजी व मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य शांती रत्न,पूज्य बोधानंद,आर.के.लामा,सह भिक्खू संघाची उपस्थिती होती. त्यांनी ही कठीण चिवर दानाचे महत्व समजून सांगितले. कठीण चिवरदान कार्यक्रमात पुण्यवान दानशूर धम्म उपासक उपासिका यांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवून कुशल कर्म संपादित केले. शेवटी पूज्य भंते बोधानंद यांनी शरणथे व मंगल मैत्री गाथा घेऊन सर्वांना मंगल कामना व्यक्त केली.शांतीदूत बुद्ध विहार चितसर मानपाडा घोडबंदर रोड ठाणे (पश्चिम) येथील कठीण चिवरदान कार्यकर्म प्रेरणादायी लक्षावेदी ठरला.अनेक धम्म उपासक उपसिकांनी तन,मन,धनाने सहभाग नोंदविला.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *