
कालकथित सुरेश बारसिंग हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सचिव होते. तसेच मा.रामदास आठवले साहेबांचे खंदे समर्थक होते. आणि पॅन्थर चळवळीत ही त्यांचा सक्रिय सहभाग होता.काही काळ ते सिध्दार्थ होस्टेलमध्ये विद्यार्थी दशेत वास्तव्यास होते.अलिकडे ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असत.कालकथित सुरेश बारसिंग हे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन उपाध्यक्ष ही होते.अशा अनेक विविध पदांवर ते कार्यरत होते.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आपण एक लढवय्या व निष्ठावान नेत्या ला मुकलो आहोत.
कालकथित सुरेश बारसिंग यांच्या निधनामुळे पक्षात व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन मध्ये एक न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.आम्ही समस्त कामगार कर्मचारी व अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत समस्त रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कर्मचारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.
सिद्धार्थ रणपिसे ९६६४८०९०६९,कल्याण



