विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय क्रमांक २०२४/प्र/क्र २५ महामंडळे दिनांक १६/०३/२०२४ अन्वये सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेले असून डिसेंबर २०२३ मध्ये सकल सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात आळंदी देवाची पुणे येथील समाजाच्या महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून सुमारे ५० (पन्नास) कोटी रुपये आर्थिक निधीची तरतूद करण्याची घोषणा केलेली आहे सरकारने त्याची तातडीने पूर्तता करावी.
विश्वकर्मीय सुतार समाजाची लोकसंख्या राज्यात लक्षणीय असल्याने समाजातील तळागाळातील उपेक्षित कारागीर कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून उद्दोग व्यवसाय उभारणी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे विश्वकर्मीय सुतार समाज बाराबलुतेदार समूहात मोडतो सुतार समाज आपल्या पारंपरिक व्यवसायात कलाकुसर आहे विश्वकर्मीय सुतार समाज कष्टकरी मेहनती आहे.
उद्दोग व्यवसाय उभारणी करणे हा सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी महत्वाचा आधार ठरतो उद्दोग व्यवसायाला आर्थिक कणा म्हटलं जाते.देशातील विकासात विश्वकर्मीय कारागीरांचे भरीव योगदान असते शेतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू तसेच घरासाठी लागणारे फर्निचर आणि शोभेच्या वस्तू बनविण्यात सुतार कारागीर पारंगत आहे आर्थिक महामंडळ कार्यान्वित झाल्यास त्या माध्यमातून समाजात हजारोंच्या संख्येने उद्दोजक तयार होतील यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्यास सुशिक्षित बेरोजगार युवक आणि होतकरू कारागीर वर्गाला छोटे मोठे उद्दोग व्यवसाय उभारणी करण्यासाठी मोठा हातभार लागेल आणि विविध वस्तूंची उत्पादन निर्मिती होईल या निमित्ताने विश्वकर्मीय सुतार समाज देशाच्या उत्पादन निर्मिती क्षेत्रात अर्थात औद्योगिक क्षेत्रात निश्चितच आपलं भरीव योगदान देऊ शकतो असा विश्वास आहे.
समाजातील गरजवंत होतकरू समाज बांधवांना उद्दोग व्यवसाय उभारणी करण्यासाठी सुतार समाज आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक भांडवल उपलब्ध झाल्यास समाजात असंख्य सुशिक्षित बेरोजगार युवकांना आणि कारागीर वर्गाला त्याचा लाभ घेता येईल जेणेकरून समाजात उद्दोग व्यवसायाला चालना मिळेल त्याचा परिणाम आर्थिक उत्पन्न निर्माण होईल आणि सुतार समाजातील होतकरू समाज बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील सोबतच आर्थिक विवंचनेत सापडलेला विश्वकर्मीय सुतार समाज सावरण्यास हातभार लागेल आणि ओबीसी सुतार समाजातील बेरोजगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.
मी सरकार दरबारी सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात पाठपुरावा म्हणून संबंधित इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार करून नंतर माहिती अधिकारात माहिती मागविली असता मला उत्तरादाखल दिनांक ३ जुलै २०२४ रोजीच्या पत्राद्वारे सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली असून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठीची आवश्यक कारवाई शासन स्तरावर प्रगतीपथावर आहे अशा स्वरूपाची लेखी माहिती मला संबंधित विभागाकडून मिळालेली आहे.
राज्यातील सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन निःपक्षपातीपणे सर्वांना समसमान न्याय देण्याची सरकारची भूमिका असते.तळागाळातील उपेक्षित,कष्टकरी,कारागीर,शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार युवकांना तसेच महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असते म्हणूनच जनता सरकारला मायबाप सरकार अशा शब्दात संबोधन करते.राज्यातील शेवटच्या घटकांना विकासात्मक योजनांचा फायदा झाला पाहिजे याला प्राधान्य देणे आणि समाजातील शेवटच्या घटकांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे सरकारचे ध्येय असते.जनतेचा विकास करणे यालाच सरकार प्राधान्य देत असते जनतेच्या सरकार कडून विकासात्मक अपेक्षा असतात यात अजिबात शंका नाही राज्यातील जनता सरकारकडे मोठ्या अपेक्षेने,आशाळभूत नजरेने बघत असते.
विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे समजताच संपूर्ण विश्वकर्मीय सुतार समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतःसुतार समाजातील ज्या ज्या मान्यवरांनी सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची मागणी सरकार दरबारी लावून धरली होती अशा सर्वांचे आणि सरकारचे सुद्धा अभिनंदनाचे आणि धन्यवादपर शुभेच्छा देण्याचे विश्वकर्मीय सुतार समाजाला विसर मात्र पडला नाही कारण विकासाच्या दृष्टीने समाजहितासाठी केलेले प्रयत्न त्या बद्दल संपूर्ण विश्वकर्मीय सुतार समाजाच्या वतीने आभार प्रदर्शन करणे,धन्यवाद आणि शुभेच्छा देणे नैतिक दृष्टीने क्रमप्राप्त ठरते.
विश्वकर्मीय सुतार समाजातील गरजवंत तळागाळातील,उपेक्षित,कष्टकरी आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांचा उद्दोग व्यवसाय उभारणी करण्याचा पर्यायाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्थातच समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवलाची आवश्यकता असते आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केली जाते म्हणूनच समाजाची स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती त्याचीच फलप्राप्ती होण्याच्या मार्गावर बघायला मिळते.
विश्वकर्मीय सुतार समाजातील गरजवंत कष्टकरी होतकरू कारागीर सुशिक्षित बेरोजगार युवकांना सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाला मागील सरकारच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याने आशेचा किरण दिसायला लागला त्यामुळे विश्वकर्मीय सुतार समाजाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.करीता विश्वकर्मीय सुतार समाजाच्या भावना समजून विद्यमान सरकारने लवकरात लवकर सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात त्यासाठी सरकारने भरघोस आर्थिक निधी उपलब्ध करून विश्वकर्मीय सुतार समाजासाठी स्थापन झालेले सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे.
-प्रमोद सूर्यवंशी, चिखली मातृतीर्थ बुलडाणा
८६०५५६९५२१.