
पुरुषाचा बरोबरीने नव्हे तर चार पटीने काही महिला पुढे आहेत. तर काही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सत्यनारायण महापूजा दिन आणि हळदीकुंकू करण्याचा दिवस असेच बहुसंख्य महिलाच्या मनावर पक्के कोरले गेले आहे.त्यात ही बहुसंख्य सुशिक्षित महिला हिरीरीने सहभाग नोंदवतात. अशात ही काही तरुण सुशिक्षित महिला रिती रिवाज परंपरा यापासून कोसो दूर असतात. अशीच एक महिला मला रात्री 7.45 ची खपोली लोकल रेल्वेत बदलापूर येथे भेटली. सत्यशोधक घरेलू कामगार संघटनेचा राजमाता जिजाऊ व सावित्री यांचा क्रांतिकारी जीवन संघर्ष आणि आजच्या महिलांची जबाबदारी या विषयावर सागर तायडे यांचे व्याखायन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम संपून भांडुप मुंबईकडे निघालो असता. बदलापूर स्टेशनवर लोकल लेट असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. सोबत सात महिला पदाधिकारी होत्या. त्यांना लेडीज डब्यात जबरदस्तीने घुसवले. आणि मी व कालिदास रोटे मालवाहतूक डब्यात घुसलो.त्यात सायकल उभी दिसली बाजूला डोक्यावर हॉलमेंट टोपी घातलेली तरुण महिला दिसली. आणि कुतूहल जागे झाले. माझ्यातील शोध पत्रकारिता करणारा पत्रकार जागी झाला.मी विचार पुस केली असतात. ममता सकाळी सहा वाजता डोंबिवली वरुन सायकलने निघाली ते पनवेल,पेण,वडखळ,नागोठणे वरुण पाली ला गेली तिथे प्रसिद्ध गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तेथून खपोली गाठली.6 वाजताची सिएसएमटी लोकल पकडली.अशी ही ध्येयवादी महिला प्रजासत्ताक दिनी काय करू शकते?. ही तिने करून दाखवले.

आता तिच्याच शब्दात मी ममता परदेशी, डोंबिवली या सांस्कृतिक नगरीत राहणारी! या नगरीचे वैशिष्ठय असे की येथील अनेक लोक आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. मी ही त्याच समुहातली.सन २०१५ मध्ये मी सायकलिंग कडे वळले. त्याआधी सह्याद्री मध्ये किल्ले भटकंती आणि हिमालयात ट्रेकिंग करायचे.निसर्गात मनसोक्त रमायचे. पण व्यवसायामुळे किल्ले भटकंती साठी वेळ मिळणे कठीण झाले. मग मी सायकलिंग करायला सुरुवात केली. निसर्गाच्या जवळ जाण्याचा अजून एक मार्ग मिळाला. दररोज एक ते दीड तास डोंबिवलीच्या जवळचा परिसर सायकल चालवत पिंजून काढला. मात्र अपेक्षा वाढत गेल्या लांब जाण्यास सुरुवात केली.१) २५ एप्रिल २०१६ मुंबई ते गोवा सोलो सायकलिंग केले.२) १२ ऑगस्ट २०१६ लेह लडाख सायकलिंग केल.३) डिसेंबर २०१६ सह्याद्री वाचवा मोहिमेत सहभाग घेतला.४) नोव्हेंबर २०१८ मुंबई (डोंबिवली) ते कोल्हापुर सोलो सायकलिंग केले.अशी अनेक दोन तीन दिवसांच्या सायकलिंग मोहिमा केल्या. या मोहीमांमुळे जवळपासचे घाट सायकलिंग करत चढून जाता आले. उदा.माळशेज घाट,कसारा घाट, माथेरान वगैरे. हे घाट सायकलने चढून जाणे आव्हानात्मक आहे.५) ३१ मार्च २०१९ नेपाळ मधील अन्नपूर्णा सर्किट सायकलिंग (१७९८० फूट उंचीवर) आणि अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक (१५००० फूट) साहसी मोहीम २५ दिवस श्री महाडिक काका यांच्या बरोबर पूर्ण केली.६) २७ डिसेंबर २०२१ डोंबिवली ते शिर्डी २२३ किमी सोलो सायकल एका दिवसात पूर्ण केले.७) २२ फेब्रुवारी २०२२ सोलो सायकलिंग करून शिवाजी महाराजांच्या राजमाची किल्ल्याला भेट दिली. अश्या मोहिमा हरिश्चंद्र गड, रायगड साठी केल्या आहेत.८) २६/११ च्या वेळेस कमांडो नी दाखवलेल्या धैर्या साठी समर्पित अशी विशेष मोहीम आखली होती. त्यात ठाणे क्यू आर टी ऑफिस ते स्टॅचु ऑफ युनिटी आणि लगेच परत अशी न थांबता सायकलिंग केले. ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२३ सलग तीन दिवस आठ तास ८०० पेक्षा अधिक किमी अंतर सायकलवर पार केले.९) २० ऑगस्ट २०२३ सर्वात उंच मोटर रोड १९०२४ फूट (जगातील सर्वात उंच उमलिंगला पास ) ही अत्यंत खडतर आणि साहसी मोहीम यशस्वी रित्या पूर्ण केली.

अश्या प्रकारे आतापर्यंत एक लाख किमी अंतर सायकल ने पार केलं.गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली ह्या अल्ट्रा रनर स्पर्धेमध्ये सहभागी झाले. नऊ तास न थांबता पळत ही स्पर्धा मी पूर्ण केली.
मी गेली पाच वर्ष सायकल ने होम टू वर्क करते.मला सन २०१९ साठी आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार प्राप्त झाला.गेली दोन वर्षे ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने डोंबिवली मध्ये महिलांसाठी सायकलिंग चे नियोजन करते. सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे पण आता मी सायकलिंग आणि ट्रेकिंग दोन्ही एकत्र करते. असे १८ गड किल्ले मी पूर्ण केले आहेत.10) 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2025 आधी कैलास आणि ओम पर्वत पहिली महिला सोलो सायकलिंग सेल्स सपोर्ट मोहीम पूर्ण केली. अशी हीध्येयवादी महिला ममता परदेशी,डोंबिवली 9870425795, प्रेरणादायी लक्षवेधी आहे. तिचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे 9920403859,भांडुप मुंबई.
