नागपुरात ‘महा एनजीओ महासंघटन भारत’चा पदाधिकारी मेळावा व सीएसआर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

विशेष प्रतिनिधी नागपूर, दि. १ नोव्हेंबर २०२६ : महा एनजीओ महासंघटन भारत, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे पदाधिकारी मेळावा, पदनियुक्ती सोहळा व सीएसआर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १२ हून अधिक जिल्ह्यांतील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. संघटनेचे कार्य विस्तार, जिल्हास्तरीय समन्वय आणि स्वयंसेवी संस्थांचे सक्षमीकरण यावर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष दिलीपजी तांदळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पांडुरंग हिवाळे आणि राज्य सचिव नंदकिशोर हत्तीअंबिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेत सीएसआर निधी मिळविण्याची प्रक्रिया, संस्थेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प अहवाल (DPR), बजेट, संस्थेचा प्रोफाइल आणि प्रभावी प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणून त्यांना योग्य मार्गदर्शन, नवीन प्रकल्पांच्या संधी आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.‘एनजीओ सक्षम तर समाज सक्षम’ या ध्येयाने महाराष्ट्रातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे सामाजिक विकासासाठी कार्य करावे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सागर तायडे यांस कडून


