कामगार चळवळ ही केवळ पदापुरती मर्यादित नसून न्याय हक्कांच्या संरक्षणाची ढाल असते : मा. सागर तायडे परखड मार्गदर्शन; 

बातमी शेअर करा.

मंगळवेढ्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर व कामगार नेते मोनेश्वर सुतार सह मान्यवरांचा जाहीर सत्कार.

मंगळवेढा (विशेष प्रतिनिधी): शासकीय विश्रामगृह, मंगळवेढा येथे सत्यशोधक कामगार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने भव्य संघटनात्मक बैठक, पदाधिकारी मेळावा व सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सागरजी तायडे साहेब आणि राष्ट्रीय सरचिटणीस मा.रविंद्र सूर्यवंशी साहेब यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संघटना बांधणी, कायदेशीर चौकट,शासकीय संघर्ष आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण यावर सविस्तर व मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला,तसेच मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मा.सागर तायडे व मा.रविंद्र सूर्यवंशी यांचा शाल, पुष्पहार घालून सन्मान केला.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी प्रदीप सुरेश परकाळे हे होते,तर प्रमुख मार्गदर्शक सागर तायडे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,रविंद्र सूर्यवंशी राष्ट्रीय महासचिव हे होते.


कामगार संघटना ही पदापुरती नसून कुटुंबासारखी असते : मा. सागर तायडे
बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष मा.सागर तायडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांवर परखड विचार मांडले.प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव: “संघटना केवळ पद मिळवण्यासाठी किंवा नावाचा फलक लावण्यासाठी नसते. संघटना म्हणजे एका कुटुंबासारखी सामाजिक बांधिलकी ठेवणारी आहे. पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जबाबदारी पार पाडली पाहिजे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
इतिहासाचा दाखला व कामगारांची ताकद: महात्मा जोतीराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ ते १८९० पर्यन्त ऐतिहासिक संघर्षातून कामगारांना १० जून १८९० रोजी रविवारची हक्काची साप्ताहिक सुट्टी व कामाचे आठ तास मिळाले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार,शेतमजूर आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा देऊन त्यांची कायद्यात तरतूद करून ठेवली.अनेक ठिकाणी कामगारांना संघटित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर कामा वरून काढल्यास कामगारांची एकजूट दिसली पाहिजे.नागपूर महानगरपालिकेत ७ हजार सफाई कामगारांच्या बैठकीनंतर युनियनची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पुढाकार घेतलेल्या दोन (कार्यकर्ते) कामगारांना कामावरून काढले असता, तेव्हा सर्व ८०० कामगारांनी काम बंद आंदोलन करून प्रशासनाला नमवले होते. हीच कामगारांची एकजूट संघटनेची खरी ताकद असते.असे सागर तायडे यांनी सांगितले. पुढे त्यांनी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शासकीय योजनांमधील बोगसपणा व दलालीवर प्रहार करतांना सांगितले की “राजकीय दबावातून वाटल्या जाणाऱ्या बोगस पेट्या आणि वाटपामुळे मूळ बांधकाम मजुरांचे नुकसान होते. मजुरांच्या नावावर जमा होणारा १% कामगार कल्याण उपकर (Cess) हा कंत्राटदारांच्या खिसेभरूपणासाठी नसून थेट मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी व कल्याणासाठीच खर्च झाला पाहिजे.त्यासाठी बांधकाम कामगारांनी संघटित झाले पाहिजे.


संघटना कायदेशीर व दफ्तरी जिवंत ठेवा: मा.रवींद्र सूर्यवंशी राष्ट्रीय सरचिटणीस साहेबांनी संघटनात्मक शिस्त व कायदेशीर पडताळणीबाबत मार्गदर्शन केले:

वार्षिक ऑडिट व कायदेशीर नोंदी: संघटनेची नोंदणी टिकवण्यासाठी आणि शासकीय समित्यांवर अधिकार मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे वार्षिक ऑडिट रिपोर्ट (Audit Report) आणि ‘जे-रजिस्टर’ (J-Register) अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे.असे रविद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. पुढे ते असे म्हणाले की व्यापक असंघटित मजुरांची एकजूट: संघटना फक्त बांधकाम मजुरांपुरती मर्यादित न ठेवता,महानगरपालिका,नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत,मधील कंत्राटी कामगार,रिक्षाचालक,घरकामगार महिला,फेरीवाले, हमाल व शेतमजूर सह असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना जोडले पाहिजे. “जात-पात विसरून “मी एक कष्टकरी कामगार हाच एक वर्ग मानून लढा उभा करा.” असे आवाहन त्यांनी केले. 


कामगार नेते मोनेश्वर सुतार यांच्या पत्रव्यवहारांची विशेष दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पंढरपूर व सोलापूर परिसरात बांधकाम मजुरांच्या हक्कासाठी लढा देणारे ‘जिद्द बांधकाम कामगार संघटने’चे जिल्हाध्यक्ष मा.श्री.मोनेश्वर आप्पासाहेब सुतार यांचा मा.सागर तायडे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला.मा.सागर तायडे यांनी भाषणात मोनेश्वर सुतार यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करत सांगितले: “अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आणि असंघटित मजुरांच्या हक्कासाठी स्वतः पुढाकार घेऊन माहिती अधिकारात (RTI) पुरावे गोळा करून लढा देणारा खरा कामगार कार्यकर्ता म्हणजे मोनेश्वर सुतार सारखा असावा असे त्यांनी सांगितले. मोनेश्वर सुतार यांनी सादर केलेल्या पत्रव्यवहारची दखल घेत मा.सागर तायडे यांनी खालील मागण्यांवर राज्यव्यापी लढा देण्याची घोषणा केली.१३ जुलै २०२६ चा अन्यायकारक शासन निर्णय (GR) तात्काळ रद्द करणे: १ ली ते ८ वी थेट रोख शिष्यवृत्ती बंद करून वस्तू संच (Kit) लादणारा निर्णय रद्द करून ३० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्राप्रमाणे थेट रोख शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी.पोर्टलवरील विलंब बंद करा: ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरणाची अपॉइंटमेंट जास्तीत जास्त ३० दिवसांत मिळावी आणि तिथून पुढील ६० ते ९० दिवसांत सर्व अर्ज मंजूर करून लाभ थेट बँक खात्यात जमा व्हावा.

अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांबाळणारे मान.प्रदीप सुरेश परकाळे यांची पश्चिम महाराष्ट्र महासचिव पदी निवड करण्यात आली.
बैठकीत जाहीर करण्यात आलेली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरवण्यात आले. त्यात गेली अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांबाळणारे मान.प्रदीप सुरेश परकाळे यांची पश्चिम महाराष्ट्र महासचिव पदी निवड करण्यात आली.विजय राजेंद्र शिकतोडे – जिल्हाध्यक्ष,सोलापूर जिल्हा,मसूद बजरंग कळकुंबे – उपजिल्हाध्यक्ष, सोलापूर,दत्ता इंगळे – सचिव, सोलापूर,मुबारक मनेरी – सचिव, सोलापूर,वैभव सायबु सोनवले – युवक जिल्हाध्यक्ष, सोलापूर,अजय अरुण माळी – युवक जिल्हा उपाध्यक्ष, सोलापूरइन्नुस इस्माईल खतीब – तालुकाध्यक्ष, मंगळवेढा,सचिन मधुकर कोंडुभैरी – तालुका सचिव,मंगळवेढा,संभाजी नंदकुमार इंगळे – युवक तालुकाध्यक्ष, मंगळवेढा,अभिषेक बिबीशन माने – शहराध्यक्ष, मंगळवेढा,प्रवीण ताड – तालुकाध्यक्ष,पंढरपूर, सिद्धार्थ तावरे – तालुकाध्यक्ष, माळशिरस या संघटनात्मक बैठकीस सोलापूर,पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील किर्याशील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन
वैभव सायबु सोनवले यांनी केले. तर विजय राजेंद्र शिकतोडे यांनी आभार मानले.

अजय अरुण माळी ७२६०००७२७७,मंगळवेढा यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *