“बेटा हमारे जमानेमे,मकान तो कच्चे थे मगर इमान पक्के थे”

बातमी शेअर करा.
आज २० मार्च. शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब आपल्या लाखो अनुयायांसोबत महाडच्या या तळ्याचे ओंजळभर पाणी प्याले होते आणि हे तळेच नव्हे तर समग्र मानवमुक्तीचे क्रांतीपर्वच बाबासाहेबांनी चवदार केले होते.
या ऐतिहासिक घटनेचे एक जीवंत साक्षीदार मला पंचवीस वर्षापूर्वी भेटले होते. या आजोबांनी त्या घटनेची रोमहर्षक आठवण ऐकवताना आजच्या पिढीबाबत खंतही व्यक्त केली होती.आजोबा म्हणाले होते की, त्यावेळचा जोष,त्यावेळची निष्ठा आताच्या चळवळीत राहिली नाही.त्या वेळेस एका तरुण मुलाच्या प्रश्नाला उत्तर देताना आजोबांनी चार ओळी अशाही म्हटल्या होत्या. त्या अशा…….  


“बेटा हमारे जमानेमे,
मकान तो कच्चे थे मगर इमान पक्के थे.
और आपके जमानेमे,
मकान तो पक्के हो गये मगर इमान कच्चे हो गये!”
त्याच आजोबांच्या आठवणींवर लिहलेली ही गझल ‘ते दिवस आता कुठे?’ खाली देतो आहे.
ते दिवस आता कुठे, जेंव्हा तळे पेटायचे॥
त्या मनूला जाळताना जिंकलो वाटायचे॥
तो पुढे अन् मागे आम्ही जिद्दीने चालायचो॥
वाटेमधले रामकृष्ण बाजूला हटायचे॥
त्या मनूला जाळताना जिंकलो वाटायचे॥
ते दिवस आता कुठे!
जीवदान गांधीला दिले मग रस्तेही झाले खुले॥
घोष जयभिमचा गर्जता आभाळही फाटायचे॥
त्या मनूला जाळताना जिंकलो वाटायचे॥
ते दिवस आता कुठे!
हा देश कैसा चालवावा बाप माझा बोलला॥
देश माझ्या मालकीचा हे तेंव्हा पटायचे॥
त्या मनूला जाळताना जिंकलो वाटायचे॥
ते दिवस आता कुठे!
जींदगी लढण्यात गेली नाही मी नटलो कधी॥
जेंव्हा मी नटलो मज होते नागपूर गाठायचे॥
त्या मनूला जाळताना जिंकलो वाटायचे॥
ते दिवस आता कुठे!


विवेक मोरे- 8451932410,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *