
उल्हासनगर:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भिम कॉलनी ओटी चौक उल्हासनगर-४ येथील महात्मा फुले नगर लुबिंनी बुद्ध विहार याठिकाणी बुद्ध मूर्तीस पुष्प अर्पण करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध जयंती निमित्त बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच उपस्थित असलेल्या अनुयायांना बुद्ध पौर्णिमा निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते खिरदान तसेच पेन वाटप करण्यात आले.
१ मे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्णक्षण अर्थात ‘महाराष्ट्र दिन’ आणि कष्टकरी वर्गाचा सन्मान करणारा ‘जागतिक कामगार दिन’ आज १ मे रोजी उल्हासनगर येथे अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अतिथींच्या हस्ते आम्ही रिपब्लिकनवादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे मानकरी क्रांतिकारी भीम शाहीर राजरत्न राजगुरुजी,डॉक्टर प्रभू अहुजा,नाका कामगार दिलीप गरड,माझी कामगार सोनवणे बाई,रिपब्लिकन वादी नेते नरेंद्रभाई मोरे,रिपब्लिकनवादी नेते संजयभाऊ जाधव
दिवंगत रिपब्लिकन नेते सुरेश दादा निकम,दिवंगत नगरसेवक अशोक ठाकूर,पोलीस अधिकारी सूर्यवंशी साहेब,एस टी कामगार नेते चंद्रकांत सोनवणे,ऍड यशवंत जाधव,रिपब्लिकन नेते शशिकांत भालेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ११ वाजता झाली. यावेळी क्रांतिकारी भिम शाहीर राजरत्न राजगुरूजी,क्रांतिकारी भीम शाहीर अशोक कांबळे,रिपब्लिकन नेते नरेंद्र भाई मोरे,रिपब्लिकन नेते संजय भाऊ जाधव,रिपब्लिकन सेना नगरसेविका मायाताई कांबळे,सांगली जिल्हा अध्यक्ष भगवान जावीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश दादा तरे, डॉक्टर अहुजा, एसटी कामगार नेते चंद्रकांत कांबळे,मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश उमाळे, मुंबईचे संघटक संतोष शिरसाठ,भांडुप तालुका अध्यक्ष धम्मा जाधव,ठाणे जिल्हा अध्यक्ष राजू दादा दोंदे, ठाणे जिल्हा संघटक हरिश्चंद्र होगाडे,रिपब्लिकन नेते जीवन भाई सुरडकर,नाका कामगार दिलीप गरड, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी युवराज बनसोडे ,राज्य सचिव अरविंद पांडे, राज्य समन्वयक विक्रम भाई खरे, कोकण प्रदेश अध्यक्ष समसूदिन भाई मन्सुरी,रिपब्लिकन सेना प्रसिद्धीप्रमुख भीम पॅंथर पत्रकार राजेश गवळी,भीम आर्मी कल्याण शहराध्यक्ष जयस्वाल साहेब,कार्यक्रमाचे आयोजक हनुमंत वाघमारे,ताराबाई साळुंखे,फर्निचर बाजार अध्यक्ष दिनेश घाणेकर,उपाध्यक्ष प्रकाश चंदनशिवे,समाजसेवक राजू दादा धावारे पिंटू दादा कांबळे भालेराव साहेब शहर सचिव शांताराम दाभाडे, समाजसेवक प्रकाश शिंदे, युवा नेते सूर्या भाई निकम, विलास खैरनार, बुद्धिस्ट मिशनचे जिल्हाध्यक्ष विशाल भाई पडघाने,बी एम पी नेते किशोर भाई खांडेकर किरण वाघमारे इत्यादी उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून हुतात्म्यांना अभिवादन केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राची निर्मिती झाली,त्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुण्यांनी, “महाराष्ट्र दिन हा मराठी अस्मितेचा आणि प्रगतीचा दिवस आहे. कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या योगदानातूनच महाराष्ट्र समृद्ध झाला आहे,” असे प्रतिपादन केले.कामगार दिनाचा सन्मान १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनातील व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य वेतनासाठी झालेल्या लढ्याचे स्मरण या वेळी करण्यात आले.यावेळी नगरसेवक,अधिकारी,विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम खरे समनव्यक यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत वाघमारे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपला नम्र
समन्वयक विक्रम भाई खरे 93208 76176,रिपब्लिकन कामगार सेना यांस कडून
