गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

घेऊनी लेखणी हाती
ती शब्द फुला गुंफितो प्रांजल मना स्मरुनी…
सु मनाने सुमने वाहतो
प्रिय तायडे गुरुजीस ओंजळ भरुणी…
दादांच्या वैचारिक
प्रतिभेची छाया बैसली त्या अंतरमनी..
जवळून पाहिले तया मी
असा शब्द सम्राटचा धनी…
गुणगान गाण्या, शब्द पडे अपुरे
अशी ममता ठेवली पेरूनी….
सु मनाने सुमने वाहतो
प्रिय तायडे गुरुजीस मी ओंजळ भरुणी….
ती,श्रवणीय लेखणी दादांची
चेतना हीनाना चेतना देई..
ढगधगता निखरा कधी सम्यक
स,विचार त्या ठाई…
ती प्रभावी प्रेरणा मन लाभली,
प्रतिमा वाटे ठेऊ हृदयी कोरुनी..
सु मनाने सुमने वाहतो,
प्रिय तायडे गुरुजीस मी ओंजळ भरुणी….
अप्रकाशितांना प्रकाशित आणिले,
मार्ग खरा दावीला..
जणींले कुणी, माणिले, विसरले
त्यांना ही ना रागावीला..
नमःवी माथा गुरु चरणी गौतम मोरे वंदन हे करुनी..
सु मनाने सुमने वाहतो
प्रिय तायडे गुरुजीस ओंजळ भरुणी….
कवी /गायक-गौतम भीमराव मोरे
भांडुप (पच्चिम) मो. 9604702659
माझे गुरुवर्य पत्रकार आदरणीय सागरजी तायडे गुरुजी यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…


