
आपण बौद्ध आहोत म्हणून अशा परंपरेतून आलेले किंवा असलेले सण- उत्सव साजरे करू नयेत.आपल्याला बाबासाहेबांनी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी नवयान बौध्द धम्माची दीक्षा दिली.या धम्माच्या आकलनासाठी स्वतः बाबासाहेबांनी आपाल्यासाठी बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहीला त्याचे आकलन करणे आणि आदर्श बौद्ध म्हणून इतर समाजा समोर आदर्श निर्माण करावा ही अपेक्षा बाबासाहेब धम्म दीक्षा दिल्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मा बदल सविस्तर मार्गर्शन करताना व्यक्त करतात.
बाबासाहेब सांगत आहेत. सिंबॉल ऑफ नॉलेज सांगत आहे
आपण याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो जणू काय आपण सिंबॉल ऑफ नॉलेज पेक्षा मोठे आहोत. म्हणजे बाबासाहेब नाकारतो आणि बाबासाहेबांचे न ऐकता आपण पारंपारिक बाबीत धम्म विचार- तत्वज्ञान शोधतो.याला काय म्हणावे?.( विस्तार भयास्तव सविस्तर देत नाही)
हे उचित नाही.
फार तर या
पौर्णिमेला बुध्दाला ज्ञान प्राप्ती झाली म्हणून हा दिवस साजरा करावा.
नाहक गुरु-पौर्णिमा उल्लेख करण्यात आणि सण उत्सव साजरा करण्यात काय हासील आहे?
‘गुरु पौर्णिमा’…. ब्राह्मणी व्यवस्था
“शिक्षण हक्क”
“पूर्वी शिक्षण देणे, आणि शिक्षण देणे हा 100% हक्क ब्राह्मणांचा होता.”
हजारो वर्षांपासूनची भारतीय ब्राह्मणी व्यवस्थेतून गुरूशिष्य परंपरा आली आहे,ही गुरुकूल शिक्षण पद्धतीतून येत असताना
गुरुला गुरुदक्षणा देण्याची रित,पध्दत, प्रथा होती.याच गुरुकूल शिक्षण पद्धतीतून ‘अंगुलीमाल’ ची निर्मिती झाली
गुरूची ‘गुरु-दक्षिणा एक हजार अंगुली’ (हाताचे शेवटची बोट म्हणजे उंगली) गोळा करण्याची अघोरी अट (गुरु-दक्षिणा) पूर्ण करण्यासाठी जो “अहिंसक नावाचा शिष्य” (विद्यार्थी ) होता
तो हत्यारा झाला,खुनी झाला, गुन्हेगार झाला.एका आंगळीसाठी त्याला एका माणसाची हत्या करावी लागत होती,आंगळी कापून त्याची तो माळ करून तो आपल्या गळ्यात ठेवत असे त्यावरून त्या अहिंसक शिष्याचे नांव “अंगुलीमाल” पडले. ( विस्तार भयास्तव सविस्तर देत नाही)
अश्या या गुरु – शिष्यांच्या असंख्य कहाण्या आणि किस्से या ब्राह्मणी व्यवस्थेत आहेत.
(माझे एक मित्र डॉ. इंगोले आर.जे.यांनी पुढील दोन उदाहरणे दिलीत)
पूर्वी
कुणी ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा ‘एकलव्य’ करून (जो एक आदिवासी ) घात या ब्राह्मणी व्यवस्थेकडून केला जात असे
हे महाभारत (काल्पनिक) या महाकाव्यात आपल्याला दिसून येते.
जर कुणी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा ‘शंबुक’ करून
(एक ओबीसी मधुन निर्माण झालेला ज्ञानदाता)
ब्राह्मणी व्यवस्था अशांचा खुन करत असे हे रामायण (काल्पनिक) या महाकाव्यातुन आपल्याला दिसून येते
गुरूंची भक्ती नाही.तर गुरुंना शिकवण्याची सक्ती केली पाहिजे.असे डॉ इंगोले आर. जे. म्हणतात.
‘गुरु पौर्णिमा’
बुद्ध आणि बाबा साहेबांचे हे असे काल्पनिक चित्र रंगवून धम्म समजणार आहे काय ?. हे विद्रुपिकरण होईल.त्यातही बाबासाहेबांना *चिवर* घातलेले दाखविणे किती विचित्र आहे.
हळू-हळू इतर धर्मा प्रमाणे काल्पनिक आणि भाकडकथा प्रमाणे मार्गक्रमण करणे सुरु आहे.
बुद्ध प्राकृत आहे, नैसर्गीक आहे.तुम्हा आम्हा प्रमाणे हाडा-मासाच्या आई वडिलां पोटी जन्मलेला सिद्धार्थ आहे Biological आहे याची आठवण/ जाणीव असू द्या तसेच आता हिंदू धर्माचे सण- उत्सव
हे बौद्धांचे कसे ही आंतराष्ट्रीय स्पर्धा सुरू होईल.सुरुवात गुरु पौर्णिमा
डॉ. मिलिंद तायडे- ९९६०४६०८९५ पुणे

