
जन्माला आल्यानंतर त्याच्या संपर्कात येणारे लोक,अवतीभवतीची परिस्थिती, समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या सदगुण अथवा अवगुणांची पेरणी करत असतात. ज्यांना सदगुणांची वाढ करायची असेल त्यांनी सतत चांगल्या विचारांच्या लोकांचा संपर्क जपला पाहिजे,आपल्या अवतीभवतीची परिस्थिती विधायक बनवण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि समाजाकडे पाहण्याचा विवेकी दृष्टिकोन वाढवत नेला पाहिजे.सदगुणांची कमतरता अथवा उणीव ही अवगुणांना जागा उपलब्ध करून देते.अवगुणांचा सहवास लवकर मिळतो आणि उशीरात उशिरा तो सहवास सुटत देखील नाही हे कटू वास्तव आहे.अशावेळी विवेकी व जबाबदार व्यक्तीनी सदगुणांची वाट अधिक व्यापक करत राहिले पाहिजे.सदगुण कुणालाही वरुन पेरता येत नाहीत की सदगुण विकत घेता येत नाहीत.सदगुणांची पेरणी ही प्रामुख्याने वैयक्तिक भरणी असते अन् त्यांची किंमत देखील आपल्यालाच पुरवायची असते.म्हणून सदगुणांची वाट चालत रहा. यासाठी श्रामनेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिर (२ मे ते १२ मे २०२५) स्थळ जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी,पैठण येथे आयोजित करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी संपर्क साधावा.
भंते शाक्यपुत्र राहुल 9834050603 पैठण.