सरकारी कर्मचाऱ्यांस न्याय देण्यास प्रशासकीय अधिकारी असमर्थ.कोपरगांव तलाठी रवी इंगळे यांच्या मूत्यूनंतर कुटुंबाला लाभ मिळेना?.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी :- गोरगरीब कष्टकरी असंघटित मजुरचे आर्थिक शोषण करण्यासाठी अडवणूक करण्याचे काम सरकारी नोकरी करणारे कर्मचारी अधिकारी इमानदारीने करत असतात. त्यातून त्यांच्या बिरादरीतील खात्यातील कर्मचारी तलाठी सुद्धा सुटत नाही. एका गावातील तलाठी रवी इंगळे यांच्या पत्नीला प्रशासनाकडून नियमांचा खेळ खेळून बेजार केल्या जात आहे.सरकारी नोकरी करणाऱ्या तलाठीच्या पत्नीला मूत्यू नंतर कोणताही लाभ तात्काळ मिळत नसल्याने उपासमारीची वेळ कशी येते यांचे जीवंत उदाहरण म्हणजेच कोपरगांवचे तलाठी रवी इंगळे यांची पत्नी व कुटुंब होय. 

कोपरगांवचे तलाठी रवी इंगळे यांचे 9 ऑक्टोमबर 2024 रोजी निधन झाले.तरी त्यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभा रवी इंगळे यांना नियमानुसार मिळणारा कोणताही सरकारी लाभ मिळाला नाही.त्यासाठी सतत पत्र व्यवहार करून पाठपुरवठा केला जात आहे. पण प्रशासनाकडून नियमांचा खेळ सुरू असलेल्यामुळे या कुटुंबाला अजूनही न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की या संदर्भात कोपरगांव तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला लिहिलेले पत्र अतिशय बोलके आहे.या पत्रात म्हटले आहे की कोपरगांव येथील तलाठी रवि सुखदेव इंगळे १५ डिसेंबर २०२३ पासून ते ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत वैद्यकीय रजेवर होते.सदर रजेनंतर ते ९ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यालयात हजर झाले. मात्र रजेचा कार्यभार न स्वीकारता व कार्यालयास कोणतीही पूर्वकल्पना न देता विनापरवानगी पून्हा गैरहजर राहिले.आणि गैरहजेरीच्या कालावधीत त्यांची बदली बिरेवाडी येथे संगमनेर तालुक्यात करण्यात आली. मात्र ते संगमनेर येथे रुजू झाले नाही. तथापी ते संगमनेर येथे रुजू होण्यासाठी एकतर्फी निर्णय घेण्यात आला होता.ते रुजू झाले नाही.या गैरहजेरी च्या कार्यकाळात त्यांचा दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे तलाठी रवि सुखदेव इंगळे यांच्या पत्नी प्रतिभा रवि इंगळे यांना गटविमा योजनेचे १९८२ चे लाभांश व अन्य प्रकारचे लाभांशची रक्कम मिळाली नाही. विशेष ही लाभांश रक्कम कोणत्या कार्यालयाने दिली पाहिजे याची विचारणा कोपरगांव तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  केली आहे. वास्तविक पाहता तलाठी रवि सुखदेव इंगळे यांचा मूत्यू 9 ऑक्टोबर महिन्यात होऊन सदर पत्र 23/12/2024 डिसेंबर महिन्यात लिहिले जाते.म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांस न्याय देण्यास प्रशासकीय अधिकारी का असमर्थ आहेत.असा सवाल उपस्थित होत आहे.कोपरगांव आणि संगमनेर या तहसील कार्यालयाच्या नियमाच्या फेऱ्यात असाय्य प्रतिभा रवि इंगळे या कुटुंबीय रस्त्यावर आले आहे.तलाठी रवि इंगळे यांचे स्वताचे कुठेही घर नाही,त्यामुळे प्रतिभा इंगळे ह्या भाडेतत्वावर राहत असून दोन मुलांचे शिक्षण व सांभाळ करून उदरनिर्वाह करण्यासाठी तारेवरील कसरत त्या करीत आहेत.दररोज तहसील कार्यालयात चक्कर मारणे आर्थिक दुष्टिने शक्य नाही. या सर्व बाबीमुळे प्रचंड मनस्ताप एका महिलेला होत आहे. जिल्हा प्रशासनाने आणि कोपरगांव संगमनेर तहसील कार्यालयाने मानवतेच्या दुष्टिने तलाठी रवि इंगळे यांच्या पत्नी प्रतिभा रवि इंगळे यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा एक कुटुंब उधवस्त होण्यापासून रोखावे. त्यांना शासकीय लाभ देऊन धीर देण्यात यावा. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. 

विशेष चौकट 

आजचा काळ आधुनिक डिजिटल विज्ञानकाळ आहे.सर्वच काम ऑन लाईन होत असतांना मा.जिल्हाधिकारी (महसूल शाखा),अहमदनगर यांच्या कडून व्हॉट्सअपचे माध्यम,ईमेलचे माध्यम,प्रत्यक्ष मोबाईल फोन द्वारे तलाठी रवि सुखदेव इंगळे यांच्या पत्नीला शासकीय लाभ का मिळत नाही हे विचारले जात नाही. अहमदनगर ते कोपरगाव हे अंतर भीषण आहे का की तुम्ही प्रत्यक्ष भेटून हे मार्गदर्शन घेवू शकत नाही. विधवा स्त्रीची परिस्थती आपत्कालीन emergency आपल्याला वाटतं नाही का? संचार माध्यमे प्रकाश गतीची झाली आहेत तरी पण या साध्या कामाला महिने,वर्षे लावणार असे स्पष्ट दिसते.विधवेचा विनंती अर्ज केल्या शिवाय सदर स्थितीत मृतक श्री. रवी इंगळे यांच्या विधवा पत्नी श्रीमती प्रतीमा इंगळे यांना शासन नियमांनुसार गट विमा योजना व इतर लाभ तात्काळ देण्यात यावा.सरकारी कर्मचाऱ्यांस न्याय देण्यास प्रशासकीय अधिकारी असमर्थ नाही तर समर्थ आहेत हे दाखवून द्यावे.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *