
विशेष प्रतिनिधी मलकापूर – आषाढी पौर्णिमेच्या दिवशी धम्मातील वर्षावास या मंगल पर्वाला प्रारंभ झाला.संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुळधाम वाकोडी द्वारा संचालित संबोधी बुद्ध विहारात आदरणीय भाई अशांतजी वानखडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावासा पर्वाला उत्साहात सुरुवात झाली.या पर्वात उपासक जी डी झनके सर यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्याचा धम्म” या ग्रंथाचे वाचन सुरु केले.संबोधी बुद्ध विहारात सालाबादप्रमाणे वर्षावासात ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाला जवळजवळ पाच वर्ष होत आहेत. ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुळधाम वाकोडी तर्फे घेण्यात येतो. आषाढ पौर्णिमेच्या निमित्त वर्षावासाच्या निमित्त साधून संदीप वानखडे सर यांनी खिरदान दान वाटप केले.

या प्रसंगी धम्म उपासक जी डी झनके सर,डॉ.एस वाय ढाले,पी जी इंगळे सर,डी एस हेलोडे साहेब,एस के वले सर, एन एम इंगळे सर,एन एन मनवर साहेब,एम डी इंगळे सर,एन डी इंगळे सर,आर के उमाळे सर,डॉ.पी आर भोगेसर,अनंता तायडे सर,रोकडे साहेब आणि महिला मंडळाच्या धम्म उपासीका अलकाताई झनके,संगीताताई ढाले, अलकाताई हेलोडे,उषाताई इंगळे,पुष्पाताई बिऱ्हाडे,वंदना ताई झनके,शोभाताई भोंगे, मालाताई उमाळे,कविता ताई वले,संगीता ताई जाधव,वैशाली ताई वानखडे, व कुमारी अधिरा झनके,आदींची प्रमुख उपस्थिती होती.संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुळधाम वाकोडी द्वारा संचालित संबोधी बुद्ध विहारात आदरणीय भाई अशांतजी वानखडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ महाराष्ट्र राज्य यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन आयु.संदीप वानखडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.शरद झनके यांनी केले.व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तीन महिने नियमित पणे संबोधी बुद्ध विहारात ग्रंथ वाचन करण्यात येणार आहे.
जी डी झनके,९०११५६०१४९,अध्यक्ष संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुळधाम वाकोडी,मलकापूर
