
भारत देशांवर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.भारत देश गुलामीत होता.या इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी भारत देशातील अनेक थोरांना तुरुंगवास, जन्म ठेप व प्राणास मुकावे लागले.त्यावेळेस कुठे भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.देशात चहूकडे आनंदोत्सव होण्यास सुरुवात झाली.आनंदोत्सव साजरे तर झालेच.पण तत्कालीन राज्यकर्ते, मान्यवर मंडळींना चिंता होती.ती भारत देशाचा कारभार कसा करावा.सर्वांसमोर मोठा प्रश्न आव करून उभा होता.वेगवेगळे विचार मंथन सुरू झाले.पण प्रश्न सुटेना.तत्कालीन राज्यकर्ते मान्यवर यांच्या बैठका झाल्या.आणि देशाची घटना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली.सदस्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या.आणि घटना समितीचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली.तर मसूदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड बहूमताने झाली.समितीमध्ये अनेकांची वर्णी लागली. घटना समितीच्या बैठकाही होण्यास सुरुवात झाली.बैठकीला सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे अगत्याचे असतांनाही समिती सदस्य अनुपस्थित राहत होते. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने घटना बनविण्याची संपूर्ण जबाबदारी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर येवून पडली.कारण घटना समितीचे काही सदस्य हे आपआपल्या कामात व्यस्त, तर काही विदेशी गेलेले,काहीचे निधन झाले.पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ब्रीदवाक्य होते मी प्रथम भारतीय व अंतीमही भारतीय हे ब्रीदवाक्य समोर ठेवून दिवस रात्र सखोल अभ्यास करून २ वर्षे ११ महीने १८ दिवसांत देशांचे संविधान लिहून देशातील सर्व समाजाला समान हक्क प्रदान करणारे समता, स्वातंत्र्य, बंधुता,व न्याय देणारे संविधान की, ज्या संविधानाने स्री-पुरुष समानता आणून गरीब व श्रीमंतांना मतदानाचा एक अधिकार देवून देशाचा राजा बनविणारे तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचशील तत्वांवर आधारित संविधान दिले.
तरीही मनु विचारसरणीच्या लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्ध समाजाचे असल्याने देशातील मनुवादी विचाराने प्रेरीत असलेल्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एलर्जी आजही दिसून येते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान पूर्ण करून संविधानाची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल, वल्लभभाई पटेल,व इतर मंत्रीमंडळात असणार्या मान्यवरांना अर्पण केली.संविधान अर्पण करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,हे संविधान कीतीही चांगले असले तरीही चालविणारी मंडळी जर कुचकामी असेल तर हे संविधान पण कुचकामी ठरेल.
पूर्वी संविधान निर्माण होण्याच्या अगोदर मनुस्मृती होती.आणि त्या मनुस्मृती मध्ये फक्त ठराविकांनाच बोलण्याचा, जगण्याचा,राहण्याच्या व जमेल तसे वागण्याचा अधिकार होता.आणि बहुजन व इतरांना म्हणजे. मनुस्मृतीने ठरवून दिलेले चार वर्ण होते.ब्राम्हण,वैश्य, क्षत्रिय व शुद्र या प्रमाणे अधिकार होते.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अस्तित्वात आले.आणि तेंव्हापासूनच देशातील वर्ण व्यवस्था संपुष्टात आली.देश गुण्यागोविंदाने नांदत राहणार म्हणून देशातील मनुवादी व्यवस्थेल सुरंग लागल्याने आजही हे मनु विचार सरणीच्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एलर्जी वाटायला लागली.म्हणून संविधानाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने निवडून येणारे जर म्हणजे देशांचे तत्कालीन मंत्री अरुण शौरी व आणखी काही मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमान जनक गरळ ओकतांना पहावयास मिळाली.आणि अलीकडे सध्याचे देशांचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल अशी अपमानास्पद गरळ ओकली होती की, आंबेडकर -आंबेडकर- आंबेडकर यांचे नाव घेण्यापेक्षा एकदा जर इश्वराचे नांव घेतले तर तुम्हाला स्वर्ग मिळेल असे अंध विश्वासाचे, अंधश्रद्धा असलेले बालीशपणाचे बोलणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्ध समाजाचे आहेत.म्हणूनच त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करून अपमानास्पद बोलणे होय.
आणि या अगोदर आणि आजरोजी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान जनक गरळ ओकणे सुरूच आहे.एवढेच काय तर देशाला संविधान देवून ७५ वर्षे लोटली.शासनाने फक्त नावालाच संविधाननाचा अमृतमहोत्सव साजरा केला.७७ वा प्रजासत्ताक दिन नुकताच २६ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण देशात आणि देशाबाहेर साजरा होत असताना मात्र संविधानाच्या माध्यमातून देशावर,व राज्यांवर राज्य करणारी मंडळी आजच्या दिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी मुद्दामहून भारतीय घटनाकाराचे भाषणात नाव विसरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करीत असून आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवत आहेत.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनी,फोटो.न लावणे, त्यांच्या नावांचा उल्लेख मुद्दामहून टाळणे असे प्रकार घडत आहेत.म्हणून या देशाला जगाला लाजवेल असे संविधान दिले.त्यामध्ये सर्व समाजाला समानतेची वागणूक देणाऱ्या घटनाकाराबद्द देशाला एलर्जी का असावी.असा प्रश्न राजकुमार पडघान यांनी उपस्थित केला आहे.ज्या ज्या वेळेस राष्ट्रीय उत्सव येतात त्या त्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावून त्यांचा सन्मान करण्याऐवजी अपमानच केला जातो.वास्तविक पहाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला महान असे संविधान देऊनही आज त्यांचा अपमान केला जात आहे.एकीकडे राष्ट्रीय सण साजरे करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावून सन्मान करावा.असे शासन निर्णय फक्त नावालाच कागदावर काढून त्यांचा शासनकर्त्या कडूनच अपमान चालू आहे.
२६ जानेवारी २०२६ हा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात साजरा होत असताना की, ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी १९५० ला संविधान अंमलात आले.तेंव्हापासून देश मोठ्या आनंदाने नांदण्याऐवजी द्वेषाच्या गर्दीत दिसून येत आहे.देशातील जनता देशाला न मानता आपआपल्या धर्माला देशांपेक्षा प्रथम स्थान देत असतांना दिसत आहे.त्यामुळे देश प्रगतीपथावर जाण्याऐवजी अधोगतीकडे जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत धर्मापेक्षा देशाला महत्व दिले तर देशाची सर्व बाजूंनी प्रगती होईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात धर्म स्वातंत्र्य दिले.परंतु धर्म स्वातंत्र्य सांभाळून देशाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.तरच देशाची प्रगती होईल.परंतु संविधान निर्माते हे बौद्ध समाजाचे असल्याचेच त्यांचा शासनकर्ती जमातीला एलर्जी होत आहे.२६ जानेवारी हा दिवस देशासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहीला तरी कमीच आहे.एवढे महत्व या दिवसाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त करून देवूनही २६ जानेवारी या दिवशी नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्री महोदय गिरीश महाजन अनावधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणात नाव विसरतात.आणि उलट दिलगिरी व्यक्त करतात.तर राज्यात बहूताश ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोच नसणे म्हणजे देशातील मनुवादी व्यवस्थेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची एलर्जी आहे हे सिद्ध होते.
जयभीम – जय संविधान
राजकुमार पडघान,मो.नं.9623515032,वाशिम.

