
विशेष प्रतिनिधी दादर मुंबई- महामानवांसोबत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्याजयवंता बाई अंभोरे या माऊलीस आज आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे केंद्र स्थान प्रेरणा स्थान आंबेडकर भवन दादर मुंबई येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्राचे बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी समाज मंडळ मुंबई च्यावतीने सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे रक्ताचे वारसदार रिपब्लिकन सेना सरसेनापती आनंदराज आंबेडकर,शासनाच्या प्रशासनात एकेकाळी बुलढाणा जिल्हा भूमीपुत्र म्हणून प्रेरणादायी लक्षवेधी कामगिरी केलेले.मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान सिद्धार्थ खरात,डॉ.राजेश गवांदे (आय.एफ.एस) प्रोटॉकॉल मंत्रालय मुंबई,तसेच बुलढाणा जिल्हा आंबेडकरी चळवळीचे भूषण मान.भिमराव तायडे,रामकृष्ण रजाने,आदि मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले.त्याच बरोबरआयु.अर्जुनराव कस्तुरे,व्ही.एल.गवई,पी.पी.गवई ,एम.सी.गवई,एच.बी.तायडे,टी.एल.वाठोरे,एस.एल.गाडे, आर.डी.बांगर,व्ही. जी.जाधव,आणि जयवंताबाई अंभोरे,भीमराव तायडे,आयु.रामकृष्ण रजाने.अनेक मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

जयवंताबाई सूर्यभान अंभोरे,जन्म 2 जानेवारी 1921,माहेर – गवई परिवारात वरुडी ता सिंदखेडराजा,जिल्हा बुलढाणा वयाच्या सहाव्या वर्षी बालविवाह कळंबेश्वर मेहकरचे – सूर्यभान अंभोरे यांच्या सोबत बालविवाह झाला होता.पती सूर्यभान अंभोरे ब्रिटिश आर्मीमध्ये होते. दोघे पती-पत्नी 1935 मध्ये सायन कोळीवाडा रावळी कॅम्प येथे वास्तव्यास आले,बुलढाणा जिल्ह्यातून तेव्हाचे महार समाजाचे मुंबईत वास्तव्यास असलेले हे पहिलं (आजचे बौद्ध)कुटुंब असावे.सूर्यभान अंभोरे ब्रिटिश आर्मी मध्ये असल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये त्यांना प्रथम नोकरी मिळाली.महामानव डॉ.बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत या पेपर संदर्भात सायन कोळीवाडा येथील रावळी कॅम्प येथे बाबासाहेबांनी मीटिंग घेतली होती, प्र.के.अत्रे सोबत होते त्यावेळी सूर्यभान अंभोरे यांनी एक रुपया वर्गणी बाबासाहेबांना दिली होती.आणि दादर येथे बाबासाहेबांच्या मीटिंगमध्ये प्रत्यक्ष त्यांनी सहभाग घेतला होता.त्यावेळी चळवळीतील अनेक कार्यकर्ते घरी यायचे, अनेकांना मदतीचा हात या दाम्पत्यांनी दिला होता.
सूर्यभान अंभोरे यांचे १९९२ निधन झाले.त्यावेळी त्यांना चार मुलं दोन मुली होत्या.त्या नंतर तीन मुलांचे निधन झाले. आज त्यांची सोळा नातवंड असा परिवार आहे.1992 मध्ये पतीचेही निधन झाल्यानंतर जयवंताबाई सूर्यभान अंभोरे यांनीसायन कोळीवाडा येथे सुदर्शन नावाचे हॉटेल सुरू केले होते.या हॉटेलचा कारभार त्यांनी स्वतः 1995 पर्यंत सांभाळला.मद्रासी लोकांचा त्रास असल्यामुळे हॉटेलमध्ये धारावीचे वर्धा भाई राजन यांना चहापानासाठी बोलून घ्यायचे त्यावेळी त्यांनी मदत केली होती.महिला असून त्या स्वतः हॉटेलच्या गल्ल्यावर बसायच्या परिसरात आंबेडकरी चळवळीच्या लढाऊ महिला नेत्या म्हणून त्यांचा एकप्रकारे दबदबा होता.त्यांची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील नातलगात पोचली होती. त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नातेवाईक रोजगाराच्या शोधात मुंबईत येत आणि या अंभोरे कुटुंबाचा आश्रय घेत होते. त्यांनी अनेकांना रेल्वेमध्ये व इतर ठिकाणी सुद्धा नोकऱ्या लावल्या अनेकांचे लग्न जुळवून करून दिले.विदर्भ व बुलढाणा जिल्हयातील खेड्यापड्यातील कष्टकरी शेतमजूर त्यांना नावाने ओळखत असल्यामुळे तो मुंबईत कामासाठी येत होता.त्यांनी सर्वपरी मदत करणारा अंभोरे परिवार मुंबईच्या सायन कोळीवाडा राहत होता.जयवंता बाई अंभोरे यांनी अनेक संकटाशी,वादळ वाऱ्याशी जीवन संघर्ष केला. तो आज ही अनेकांना प्रेरणादायी लक्षवेधी ठरत आहे.जयवंता बाई अंभोरे नावाचा वटवृक्ष आता 105 वर्षाचा झाला आहे. या वटवृक्षाने अनेकांना छाया दिली या वटवृक्षाच्या सहाय्याने अनेकांनी आपले घरटे मुंबईत बांधली.आंबेडकरी विचारांच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्या ला हा पुरस्कार प्रेरणादायी व लक्षवेधी ठरणार आहे.

बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबईचे हे स्नेह संमेलन केवळ एक मनोरंजनाचा (गेट टू गेदर) कार्यक्रम म्हणून झाला नाही तर अनेक पिढ्यातील जुन्या नात्यांना जोडणारा विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची चळवळ जीवंत करण्याची सामाजिक बांधीलकीचा प्रेरणादायी लक्षवेधी सोहळा झाला आहे.या भव्य स्नेह संमेलनास सहकुटुंब मुलामुलीपासून ज्येष्ट नागरिका पर्यन्त सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीती दाखवून आयोजकाचे मनोबल वाढवले.बुलढाणा जिल्हा भूमीपुत्र मान सिद्धार्थ खरात,यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई अध्यक्ष प्रा.डॉ.दयानंद इंगळे सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयु.भास्कर पवार यांनी प्रास्ताविक केले तर आयु.वामन मोरे व आयु. विजय खरात यांनी सूत्रसंचालन केले.आयु.सीमा जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. हे स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी काही लोकांचे नांव घेणे काही लोकांचे नांव न घेणे चुकीचे ठरलेल. म्हणूनच अनेकांनी खूप मेहनत घेतली.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून
