
सामाजिक जीवनात प्रेरणा,वारसा याची सतत उजळणी करत रहावी लागते.ती उजळणी व्हावी या हेतूने बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी समाज मंडळाने या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार दिले त्यातील “रोल मॉडेल” एच बी तायडे साहेब.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील शासन व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी तायडे साहेबांना ओळखत नाही असा एकही सापडणार नाही,समाजाने अनेक अधिकारी कर्मचारी दिले त्यातले वेगळेपण म्हणजे तायडे साहेब
आरक्षणाच्या माध्यमातून जेव्हा आपला माणूस शासन प्रशासनात येतो तो फक्त नोकरीसाठी नव्हे तर त्या खात्यात समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येतो (आरक्षणाचा अर्थच तो आहे शासन प्रशासनात समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना कोणताही कंटेंम लागत नाही) आरक्षणाचा फायदा घेत आमचे अनेक अधिकारी कर्मचारी प्रशासनात आले त्यांनी फक्त नोकऱ्या ‘च’ केल्या आणि स्वतःचे बँक बॅलन्स वाढवले.तायडे साहेबांनी मात्र शासन प्रशासनात समाजाचे प्रतिनिधित्व केले.त्यांची मंत्रालयातील केबिन अनेक सामाजिक चळवळींचं केंद्र बनलं होत,मंत्र्याच्या दालनात गर्दी कमी असायची परंतु तायडे साहेबांकडे केबिनमध्ये बसायला जागा नसायची हे आम्ही अनुभवले आहे ग्रामीण भागातून येणारा बेरोजगार तरुणाला मुंबईत आल्यानंतर आशेचा किरण म्हणजे तायडे साहेब.सेवानिवृत्तीच्या अखेरपर्यंत मंत्रालयात समाजाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.मागच्याच महिन्यात त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला. 80 वर्षाच्या या वटवृक्षाने मुंबईसारख्या महाकाय शहरात अनेक कुटुंबांना,अनेक बेरोजगारांना आधार दिला.वंचित समाजासाठी सतत कार्यरत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते.शासन प्रशासनात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तायडे साहेब नक्कीच “रोल मॉडेल ठरतील” समाजाच्या या आधारस्तंभाला दीर्घायुष्य लाभो.

आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे केंद्र स्थान प्रेरणा स्थान आंबेडकर भवन दादर मुंबई येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्राचे बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी समाज मंडळ मुंबई च्यावतीने रोल मॉडेल मान.एच बी तायडे साहेब यांना सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे रक्ताचे वारसदार रिपब्लिकन सेना सरसेनापती आनंदराज आंबेडकर,शासनाच्या प्रशासनात एकेकाळी बुलढाणा जिल्हा भूमीपुत्र म्हणून प्रेरणादायी लक्षवेधी कामगिरी केलेले.मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान सिद्धार्थ खरात,डॉ.राजेश गवांदे (आय.एफ.एस) प्रोटॉकॉल मंत्रालय मुंबई,तसेच बुलढाणा जिल्हा आंबेडकरी चळवळीचे भूषण मान.भिमराव तायडे,रामकृष्ण रजाने,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले.जीवनगौरव पुरस्कारासाठी साहेबांचे हार्दिक अभिनंदन.

विजय खरात- 8169963285,
पनवेल नवी मुंबई.
