लोकेनेते दि.बा.पाटील साहेब यांचा स्मृती दिन फुंडे विद्यालयात संपन्न.

बातमी शेअर करा.

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे) रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेवार उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते,माजी खासदार लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांचा १२ वा स्मृतिदिन संपन्न झाला.या प्रसंगी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन शिवदास पोटे- लेखाधिकारी रा.जि.प.अलिबाग,विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू,विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे बी बी,उपमुख्याध्यापिका थोरात एस.डी, पर्यवेक्षिका बाबर एस. एम,पाटील एस.एस,लेखनिक नवनीत ठाकूर व उपस्थित शिक्षक वृंदाच्या शुभहस्ते झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सां.वि.प्रमुख एच.एन.पाटील यांनी केले.या नंतर विद्यालयातील कु.प्राजक्ता कडू या विद्यार्थिनीने ‘दि.बा.पाटलांच्या नावाचे होणार विमानतळ’  या गीताचे सादरीकरण केले.विद्यालयातील क्रिडा शिक्षक डी.डी. पाटील व जेष्ठ शिक्षक भोपी जे.सी यांनी दि.बा.पाटील साहेबांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्ये विषद केले.रायगडचा राजा, प्रकल्प ग्रस्तांचा तारणहार,भूमिपुत्राचा मार्गदर्शक,कर्तुत्व,नेतृत्व आणि चारीत्रता कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकनेते दि बा पाटील साहेब आहेत.त्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले.रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दि.बा.पाटील साहेबांची विधिमंडळातील अभासपूर्ण भाषणे गाजली आहेत.आदी दिबा पाटील यांच्या विषयी उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली.

पत्रकार विठ्ठल ममताबादे,-9702751098,उरण,जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *