395 कलमाची खुटी

बातमी शेअर करा.

लय लय चिडली उताणी पडली

नीच रूढी ती तोंड वासून…
395 कलमाची खुटी ती ठोकली
बापानं माझ्या तासून…!!धृ!!

पूर्वापार प्रथेचा बाजार उठविला सारा..
माझ्या भीमानं तिचा वाजवीला बोजबारा..
मनात चिडला, बुरखा तो फाडला..
धाडलं तोंडाला काळं फासून..
395 कलमाची खुटी ती ठोकली
बापानं माझ्या तासून…!!१!!

खुप छळलं आम्हा त्या काळ्या मनुस्मृतीनं…
तिला पेटविलं आणि दिलं हे संविधानं..
दिला समानं,न्याय सन्मानं…
बुद्धीची कसोटी घासून…
395 कलमाची खुटी ती ठोकली बापानं माझ्या तासून…!!२!!

मनुस्मृतीचे गाती गुण गोडवे…
बारा बापाचे हरामी ते भडवे…
आहे कश्याचं,रक्त तयातं…
पाहिलं रुपेशानं हे तपासून…
395 कलमाची खुटी ती ठोकली बापानं माझ्या तासून….!!३!!

रुपेश अनिल साखरे..८१६९४५७६७६
 
कवी,गायक- दिंडेगांव (तुळजापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *