
मानव रानटी अवस्थेतून मनुवादी व्यवस्थेच्या अज्ञानाच्या अंधकारात गुदमरलेल्या अवस्थेत जीवन जगत असताना अंगारा,धुपारे,ताईत, गंडेदोरे कर्मकांडाच्या डबक्यात खितपत पडलेल्या अवस्थेत जीवन जगत असताना अंधश्रद्धेच्या विळख्यातून,आणि मानसिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेक जाती धर्मातील थोर समाज सुधारकांनी आपल्या देशातील अनिष्ट चाली,रुढी परंपरा,प्रथा,बंद करून माणसातला माणूस म्हणून घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत.दुःखाचं खरं कारण काय? याचा शोध घेण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी राजेशाहीला झुगारून सर्व गोष्टींचा त्याग करून राज्यवाड्यातून सत्य ज्ञानाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. दया,करुणा,क्षमा,विश्व शांतीचा साऱ्या जगाला संदेश दिला.विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी धम्माची शिकवण दिली आणि माणसाला माणूस म्हणून माणसासारखे जगता यावे यासाठी अहिंसा करुणा शांती बंधूता ही तत्वे रुजविण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी,आयुष्य भर भटकंती केली.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,संत गाडगेबाबा,संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकडोजी महाराज,महामानव,बौध्दीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अशा अनेक साधू संतांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे.आज माणूस अज्ञानाच्या अंधारातून विज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादी होवून सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत असल्याचे दिसून येते.
आज थोर समाजसुधारकांच्या,साधू संतांच्या कर्तुत्वाला अशोक खरात,आसाराम बापू,रामरहिम, ऋषिकेश,चंद्रा स्वामी,सत्य साईबाबा असे अनेक विकृत लिंग पिसाट बाबा समाज सुधारकांनी केलेल्या कार्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे कार्य करीत आहेत.भोंदू ढोंगी बाबांची विज्ञान युगात देशाला किड लागलेली दिसून येते.अंधश्रद्धेच्या अज्ञानाला विवेकवादी च्या मशालीने कर्मकांडाला पेटवून विकृत भोंदू ढोंगी बाबाची होळी साजरी केली पाहिजे.तरच देशात अंधश्रद्धेची राख होवून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला लागेल!.लोकांनी लोकांच्या कामासाठी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले लोक प्रतिनिधी निवडून आल्यानंतर संविधानाची शपथ घेऊन सत्तेची खुर्ची धारण करत असल्याचे दाखवतात.आणि दैनंदिन जीवनात विज्ञान युगात संशोधनातून विकसित केलेल्या तंत्रज्ञान यांत्रिकी,उपकरणांचा पुरेपूर फायदा घेऊन जीवनात सुखी समृद्धीचा आनंदाने उपभोग घेत असतात.आणि दुसरीकडे अंश्रद्धेच्या नावेत बसून ढोंगी भोंदू बाबांनी चालवलेल्या अंधश्रद्धेच्या प्रवाहात वाहत जावून विकृत बाबांना राजकीय आशिर्वाद देत असल्याचे दिसून येतात.हे विज्ञानाच्या युगात अंत्यंत हानिकारक आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.ज्यांच्याकडे दैवी शक्ती, जादूटोणा,भूत, करणी,चेटूक,भानामती,मंत्रतंत्र आहे म्हणून सिद्ध करून दाखविल त्याला रोख एकवीस लाखाचे बक्षीस आहे. ज्यांच्याकडे दैवी शक्ती आहे.त्याने अंनिसचे जाहीर आव्हान स्वीकारावे हिम्मत असेल तर अंनिस चे आव्हान हे ढोंगी भोंदू बाबा का? स्वीकारत नाहीत. कारण अशी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही.भोळ्या भाबड्या अज्ञान भोळसट लोकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक,लैंगिक शोषण करण्यासाठी मानसिक पिंजऱ्यात कैद करून वेगवेगळ्या मार्गांनी शोषण करून अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहेत. प्रसारमाध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या देवी देवतांच्या सिरियल आणि यांना राजकीय लोकप्रतिनिधी कडून दिले जाणारे संरक्षण तसेच प्रसार माध्यमांच्या कडून दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीमुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते.या ढोंगी भोंदु बाबांच्या कडे दैवी शक्ती असेल! तर यांना पोलीस संरक्षण देण्याची गरज काय? तसेच यांच्या दरबारात चोरी झाली तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची गरज काय?.या ढोंगी भोंदु बाबांची भरभराटी करणारी येथील मानसिकता जबाबदार असल्यामुळे श्रद्धेच्या कुरणात अंधश्रद्धेची बीज जोमाने रुजविण्यासाठी मदत केली जाते.यामुळे अंधश्रद्धेच्या रोपांची वाढ जोमाने होत आहे.
वाढत्या महागाईमुळे देशाच्या अन्नदात्याना आणि सर्व सामान्य माणसांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असताना भक्तांचे खावून तिर्थक्षेत्र जोतिबाच्या मंदिरात पुजाऱ्यांनी सर्व सामान् भाविकांच्यावर जो हल्ला घडवून आणला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून कष्टकरी भाविकांनी दिलेल्या देणग्या वरती तूप रोटी खाऊन पुजाऱ्यांना माज आल्याची ही लक्षणं दिसून येताहेत.भाविकांच्यावर लाथा बुक्क्यांनी आणि लाठीकाठी सहायाने मारहाण करीत असल्याचे दिसून येते. ही कशाची लक्षणं आहेत!.रात्रंदिवस देवतांच्या सानिध्यात राहून पूजाअर्चा, प्रार्थना,साधना, केल्यामुळे यांच्यामध्ये,सहानुभूती,दया, क्षमा,मानवतावादी,यायला पाहिजे होती.त्या ऐवजी अहंकार, रागक्रोद,तापटपणा वाढलेला दिसून येतो.यांना हे सर्व पाहून यांना पुजारी म्हणायचे का ?. यांच्याकडे जमा होणारी धनसंपत्ती ही दैविक शक्तीतून जमा होत नसून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या देणगी किंवा दान केलेल्या संपत्ती यांच्या कुटुंबीयांचा संसार चालतं असतो.याची तरी यांनी जाणीव ठेवायला हवी होती.
सर्वच क्षेत्रात जी प्रगती झालेली आहे ती केवळ शिक्षक,शास्त्रज्ञ,इंजिनीयर,वैज्ञानिक, डॉक्टर,तंत्रज्ञान,यांत्रिकीकरण टेक्नॉलॉजी,कृषी, इत्यादी विविध क्षेत्रातील संशोधनामुळे देशाची झपाट्याने प्रगती झालेली दिसून येते. हे कोणाला ही नाकारता येणार नाही.तरी देखील राजकीय क्षेत्रातील आणि उच्च दर्जाचे अधिकारी स्वतः ची विवेकबुद्धी घाण टाकून विकृत ढोंगी बाबांच्या नादी लागून अनेक प्रकारच्या पुजा अर्चा,होम हवन, करण्यासाठी आपला लाख मोलाचा वेळ वाया घालवत बळीचा बकरा ठरत असल्याचे दिसून येतात.हे पाहून यांना सुशिक्षित म्हणायचे का?. असे प्रश्न निर्माण होतोय.शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग करून ढोंगी बाबाचा मान सन्मान करत असल्याचे.पाहून आपण विज्ञान युगातील एकविसाव्या शतकामध्ये आहोत का ? हा प्रश्न नेहमी मनाला सतावत राहातो.आपली मातृभूमी ही अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमिमध्ये गल्ली बोळा तील ढोंगी भोंदू बाबां जळू जसा रक्त शोषून मोठा होतो. त्याच प्रमाणे भक्तांचे रक्त शोषून मोठं होण्यासाठी सर्वत्र दरबार भरलेले दिसून येतात.राजकीय क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी व्यासपीठावर प्रत्येक राष्ट्रीय थोर महापुरुषांच्या आणि पुरोगामी व्यक्तींच्या नावांचा आवर्जून जयजयकार करतात.आणि मनुवादी व्यवस्थेच्या विचार धारेतून अंधश्रद्धेची गुलामगिरी पत्करतात.त्यामुळे अंधश्रद्धेचे विषाणू जोमाने पसरण्यासाठी मदत होते.
भगवं वस्त्र परिधान करून,रुद्राक्षाच्या माळा घालायच्या,कपाळाला टिळा लावून,जप तप करायच्या नावाखाली मोठ मोठ्या राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने अज्ञान भोळ्या भाबड्या भाविकांना ताईत,गंडेदोरे बांधून कर्मकांडातून शोषण करण्याचा उद्योगधंदा सुरूवात करतात येतो.यासाठी कोणत्याही प्रकारचे भांडवल लागत नाही.कोणत्याही प्रकारच्या परवानगी नको.अंधश्रद्धेच्या प्रवाहातून बडे बडे मासे भोंदू बाबांच्या पायाशी लोटांगण घालायला रांगा लावतात.एकदा रांगा सुरुवात झाल्या की नंतर हळूहळू,योग,साधना,शरीर शुध्दी,मनःशांती,पूर्व जन्माचे पाप,सर्पदंश,योनी पुजा, लिंग शुद्धी,अशा विविध विधीच्या नावाखाली अज्ञान,भोळसट,भोळ्या भाबड्या भाविकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात मानसिक गुलाम बनवून पैशाचा पाऊस पडतो.
भाविकांचा विश्वास संपादन करून घेतल्यानंतर.माझ्या शरिरामध्ये साक्षात परमेश्वर प्रकट होवून तो तुझ्या शरिराचा लाभ घेईल! ते तुझे भाग्य समज.किंवा देवानं प्रत्यक्ष भेटून दिलेला आशिर्वाद समजून घेणे. त्यामुळे आपली.सर्व संकटातून मुक्तता होवून भरभराटी होणार !.परंतू याची वाच्यता कुठे ही करायची नाही.जर चुकून कोणाला सांगितले तर देवाने दिलेला आशिर्वाद नाहिसा होवून.पुन्हा संकटं निर्माण होऊन तुझ्या कुटुंबाला धोका होणार अशा जबरदस्त भीतीच्या दडपणाखाली खाली ठेवून भोळ्या भाबड्या भाविकांच्या मनावर बिंबवले जाते आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो.तसेच जी माणसं कमकुवत किंवा हावळ्या मनाची असतात.ती संमोहनशास्त्रामुळे लवकर बळी पडतात. मानसिक दृष्ट्या भाविकांचे खच्चीकरण करुन भाविकांचे वेगवेगळ्या पध्दतीने शोषण केले जाते.खरोखरच या ढोंगी भोंदू बाबांच्या कडे दैवीक शक्ती असेल! तर या देशातील सर्व ढोंगी भोंदुना एकत्रित करून देशाच्या सिमेवर शत्रुचा नायनाट करण्यासाठी पाठवून देण्याची व्यवस्था करावी.म्हणजे आपल्या सैनिकांना थोडी विश्रांती मिळेल!
निसर्गामध्ये ज्या नैसर्गिक घडामोडी घडत असतात.त्याला चमत्काराचे स्वरूप देवून ढोंगी भोंदू बाबा चमत्काराच्या नावाखाली जनतेची फसवणूक करीत असतात.चमत्कार करणारा बदमाश असतो.त्याच्यावर विश्वास ठेवणारा अज्ञान असतो.त्यांच्या विरुद्ध बंड न करणारा भ्याड किंवा भित्रा असतो.कोणतेही चमत्कार दैवीक शक्तीच्या जोरावर करता येत नाहीत.काही चमत्कार टेक्निकल किंवा हातचलाखी ने करता येतात.काही रासायनिक केमिकल्स वापर करून केले जातात.त्यालाच भोळी भाबडी माणसं बळी पडतात.जो पर्यंत चमत्काराच्या मागील कार्यकारणभाव तपासत नाही.तो पर्यंत चमत्कार वाटतो.ज्या वेळी चमत्काराच्या मागील कार्यकारणभाव तपासल्या नंतर त्यातील फोलपणा बाहेर येतो.सत्य ज्ञानाचा प्रसार प्रचार करुन अज्ञान घालवून सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.जनतेचे प्रबोधन करतात त्यांना विरोधकांचा विरोध सहन करावा लागतो. तसेच त्यांना संपविण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जातात.आणि जे धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली दंगली घडवून आणतात.त्यांना आश्रय दिला जातो.सत्य समाजात लवकर पचत नसतं असत्य समाजात लवकर पचत.ही वस्तुस्थिती आहे.
आपल्या देशातील अनेक थोर समाज सुधारक आणि साधू संतांनी समाजासाठी सामाजिक बांधिलकी स्विकारुन समाजातील ज्या अनिष्ट प्रथा रुढी परंपरां याच्यातून मुक्त करण्यासाठी कार्य केले त्यांना जिवंतपणी मनुवादी विचार श्रेणीच्या व्यवस्थेने त्यांचा अंत्यंत क्रुरपणे छळ करुन त्यांचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला गेला.आपल्या देशात सर्वात मोठा पुरस्कार मिळवायचा असेल तर त्याला मरण पत्करावे लागते. मेल्यानंतर त्यांच्या जयंत्या साजऱ्या करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला जातो.शासनाच्या तिजोरी मध्ये जो पैसा जमा होतों तो सर्व सामान्य कष्टकरी जनतेच्या श्रमातून कर रुपात जमा होत असतो.तो पैसा सामान्य जनतेच्या दैनंदिन अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा, आरोग्य,औषध,पाणी,शिक्षण,पर्यावरण, इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करणं गरजेचं असताना मनुवादी व्यवस्थेच्या विचारांना चालना देण्यासाठी मंदिरे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असल्याचे दिसून येतो. ज्यांना मंदिर बांधण्यासाठी द्यायचा असेल!तो त्यांनी वैयक्तिक पातळीवर द्यावा.
माणसांना दैववादी बणवून भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्या ऐवजी प्रत्येक नागरिकाला विवेकवादी,वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी व श्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला तरच देशाची प्रगती झपाट्याने होईल.देवळ ही पुजाऱ्याची पोट भरण्याची ठिकाण आहेत.ज्या विद्येच्या मंदीरात देशाचे आधारस्तंभ घडविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केला जातो.ती विद्येची मंदिर आज मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत.कांही ठिकाणी विद्यामंदिर बंद केली जात आहेत.अशी शाळांची अवस्था असताना देउळ बांधण्याची गरज आहे का? श्रध्दा आणि अंधश्रद्धा यातील फरक प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात एक ज्योतिषी शाहू महाराजांचे भविष्य सांगण्यासाठी आलेला होता.त्याची रहाण्याची व्यवस्था केली गेली आणि दुसऱ्या दिवशी त्याला फटकारे देऊन बाहेर काढले.त्याला शाहू महाराजांनी विचारले तुला फटकारे देणार आहेत याची माहित का ? समजली नाही.जाहिरातीच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना अमाप पैसा मिळतो म्हणून प्रसिद्ध दिली जाते.त्या जाहिराती पाहून कमकुवत हावळ्या मनाची माणसं अशा ज्योतिषांच्या नादी लागून बळीचा बकरा ठरत आहेत.ज्योतिषाची अलिकडे दुबईमध्ये परिषद भरलेली होती.त्या परिषदेला सहभागी होण्या करिता अनेक देशांतील नामवंत ज्योतिष तज्ञ गेले होते.तेथे युद्धामुळे अच्छानक विमान सेवा बंद झाल्याने तेथेच अडकून पडले.हे जगाचे भविष्य सांगणारे तज्ज्ञ ज्योतिषी असताना त्या देशात युद्ध सुरू होणार आहे.याची माहिती यांना अगोदरच यांना समजायला पाहिजे होती.हे ज्योतिष शास्त्रातील महान विद्वान तज्ज्ञ होते ना ?.या जगात कष्टाशिवाय यशस्वी होण्याचा मार्ग अद्याप कोणालाही सापडलेला नाही.जो धडपडतो त्याला यशाचा मार्ग सापडतो.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.प्रयत्नाच्या वेलीवरच नेहमी यशाची फुले उमलत असतात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये जिद्द चिकाटी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.तेंव्हाच ती व्यक्ती यशस्वी होते.सर्व संकटातून माणसाला वाचवणारा कोण? तर तो धैर्य होय.धैर्य खचला की त्याला कोणीही वाचवू शकणार नाही.संकटातून जो घडतो.तो कुठेही कमी पडत नाही.म्हणतात ना संकटाची पुंगी वाजू लागली असता विचारांची नागिण डोलायला लागते.या पृथ्वीवरतलावर ज्या गोष्टी अस्तित्वातचं नाहीत.त्याच्या पाठीमागे सद्सदविवेक बुद्धी घाण टाकून पाठीमागे लागणे ही माणसाची मुर्खपणाची लक्षणं आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात अशी कोणती तरी दैविक किंवा अदभुत शक्ती आहे म्हणून मुर्खासारखे आयुष्यभर त्याच्या पाठीमागे लागतात.ही मुर्खा सारखी घाणेरडी सवय समाजात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे ढोंगी बाबा असून भोंदू देवर्षी म्हणून आपला दरबार चालविण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात.कोणत्याही ढोंगी भोंदू बाबांच्या नादी लागून बळीचा बकरा होण्यापूर्वी स्वतः च्या शरिरावर स्वतः चे डोकं ठेवून.डोक्याच्या कवटी मध्ये विचार करायला लावणारा मेंदू आहे त्या मेंदू चार वापर करून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा किंवा सत्यता पडताळून पाहण्यासाठी नेहमी प्रयत्न करावा.माणूस दैनंदिन जीवन जगत असताना बाजारांतील प्रत्येक बारीकसारीक वस्तूंची चिकित्सा करीत असतो.विविध प्रकारच्या भाज्या,विविध प्रकारची फळे,कडधान्ये, कपडे,विद्यूत उपकरणे,खरेदी करताना चिकित्सक नजरेने निरिक्षण करूनच खरेदी करीत असतो.परंतू ढोंगी भोंदू बाबांच्या दरबारात सर्वस्वी बुद्धी घाण टाकून माणूस का? वागतो.हा खरा प्रश्न डोळ्यासमोर पडत असतो.कारण त्या ठिकाणी कोणतीही चिकित्सा न करता अंधळ्या प्रमाणे अंधश्रद्धेच्या जाळ्यात त्याला अडकवला जातो.एखाद्या गोष्टीची कोणत्या प्रकारची चिकित्सा न करता अंधळ्या प्रमाणे विश्वास ठेऊ नका.वैज्ञानिक दृष्टीने त्याची चिकित्सा करायला शिका.कळपातील एखादं मेंडरु डबक्यात पडलं की त्यांच्या पाठी मागील मेंढरं एका पाठोपाठ सर्व डबक्यात पडतात. तशीच परिस्थिती माणसांची आहे.अस्तित्वात नसलेल्या गोष्टींच्या पाठीमागे न लागता अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न करावा.
देशमुख पी.आर.-9921111955,

