प्रत्येक घरात एक कन्फेशन बॉक्स असण्याची आवश्यकता आहे ….!

बातमी शेअर करा.

प्रत्येक व्यक्तीने रोज रात्री झोपण्यापुर्वी आत्मपरीक्षण करण्याची सवय करुन घ्या. स्वत:ला कन्फेशन बॉक्समध्ये उभे करत जा. आणि दिवसभरातून घडलेल्या चुकांची उजळणी करा, त्या चुका स्वत:शीच मान्य करा. शक्यतोवर त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची स्वत: लाच शपथ घाला. व तुमच्या हातून कळत – नकळत कोणाचे मन दुखावले गेले असेल तर, त्याच्याजवळ, पुढच्या भेटीच्या वेळी मनमोकळेपणाने माफी मागा. त्यात कमीपणा मानू नका. आयुष्य खुप सुंदर आहे याचा तुम्हाला प्रत्यय येईल!. 

Confession box’ म्हणजे ख्रिश्चन धर्मात (विशेषतः कॅथोलिक चर्चमध्ये) पापस्वीकृतीसाठी वापरली जाणारी एक लहान खोली किंवा पेटी, जिथे लोक धर्मगुरूंकडे (Priest) आपल्या पापांची कबुली देतात. याला मराठीत पापस्वीकृती कक्ष, कबुलनामा पेटी किंवा कबुलीजबाब कक्ष असे म्हणतात.
उद्देश: आत्मिक शांततेसाठी आणि पापांची माफी मिळवण्यासाठी लोक येथे येऊन पश्चाताप व्यक्त करतात.
रचना: सहसा चर्चच्या कोपऱ्यात असलेली एक बंद जागा, जिथे एका बाजूला व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला पाद्री बसतात, पण एकमेकांना थेट पाहू शकत नाहीत.
संबंधित शब्द: Confession = पापनिवेदन/कबुलीजबाब, Confess = कबूल करणे.

राजाराम तुळसाबाई सूकदेव सूर्यवंशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *