समाजात पदांची निर्मिती शोभेची वस्तू नसून विकासासाठी आणि प्रबोधनासाठी असतात!

बातमी शेअर करा.

संविधान निर्मात्यांनी ओबीसींसाठी संविधानात तरतूद केलेली आहे त्याचा योग्य उपयोग समाजात नेतेगिरी करणाऱ्या ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाज जागृतीसाठी करावा.आदर्श ओबीसी सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा मुकुट परिधान करणाऱ्या अनेक सामाजिक संघटना,संस्था,विविध विकास मंच अनेक विविध प्रतिष्ठान असतील आणि संपूर्ण राज्यभरात हजारो पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असेल यापैकी अनेक जण स्वतःलाच समाजाचे दिग्गज नेतृत्व आणि धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणवून घेत असतील परंतु,कोणाच्याही नेतृत्वाखाली स्वतःच्या हक्काच्या गृह जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने उद्योग व्यवसाय उभारणी करून तळागाळातील आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना तसेच गरजू महिलांना आर्थिक उत्पनाचे साधन संसाधन म्हणून रोजगार निर्मिती केलेली नाही.ओबीसी,आरक्षण, जनगणना,संवैधानिक अधिकार,सत्ता,संपत्ती,ज्ञान आणि राजकीय हिस्सेदारी संदर्भात समाज जागृती मेळाव्यात हजारोंच्या संख्येने समाजाला एकत्रित केलेले नाही.
    ओबीसी सुतार समाजात मोठ्या आवेशात नेतेगिरी करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी समाजात उद्योग व्यवसाय,ओबीसी,आणि राजकीय हिस्सेदारी संदर्भात सुतार समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी अजिबात प्रयत्न केले नाहीत कारण समाज जागृत झाला तर या लोकांना उजळमाथ्याने मोठेपणा मात्र मिरवता येणार त्यासाठी बुद्धिवान लोकांनी जागरूक असावे जेणेकरून ओबीसी सुतार समाजाची दिशाभूल करण्यास कोणताही पुढारी धजावणार नाहीत.समाजात फक्त विशिष्ट लोकांचे वाढदिवस,सदिच्छा भेटीगाठीचे,आनंदाच्या क्षणांचे औचित्य साधून मात्र सोशल मीडियावर फोटोबाजी करून त्याखाली न विसरता ठळकपणे आवर्जून संबंधित पदांचा उल्लेख केला जातो अशाच पद्धतीने समाजात स्वयंघोषित पुढारी उदयास येतात हिच सत्य परिस्थिती आहे.
    विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात अनेक वर्षांपासून मोठ्या रुबाबात नेतेगिरी करणाऱ्या कोणत्याही स्वयंघोषित दिग्गज नेत्यांनी आणि कोणत्याही स्वयंघोषित धडाकेबाज युवक नेत्यांनी आपापल्या खऱ्या खोट्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करून ओबीसी,आरक्षण,जनगणना,संविधान,सत्ता, संपत्ती,ज्ञान आणि राजकीय हिस्सेदारी संदर्भात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत या व्यतिरिक्त कोणत्याही स्वयंघोषित समाज नेत्यांनी सुतार समाजात लाखोंच्या संख्येने उद्योग व्यवसाय उभारणी केलेली नाही शिवाय समाजाला संवैधानिक आधार आणि संवैधानिक अधिकार असलेले राजकीय प्रतिनिधित्व मिळवून दिले नाही.
   विश्वकर्मीय ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील जबाबदार पदाधिकारी आणि सर्वच स्वयंघोषित नेत्यांनी समाज चिंतन करण्याची नितांत गरज आहे.सुतार समाजात फक्त नावासोबत सामाजिक पदभार जोडण्यासाठी नसतो हे आपण सर्वच मान्यवर जाणतो.सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित समजणारे सामाजिक पद आणि पदानुसार समाज प्रतिष्ठा, पदाच्या उंचीनुसार हक्काचे ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करण्याची समाजात क्षमता,पात्रता,प्रतिष्ठा ओबीसी सुतार समाजात समाज किंमत,प्रभाव,प्राबल्य,प्रभुत्व,समाजात प्रचंड समाजप्रिय असलेले,समाज अभ्यासक, थोर विचारवंत आणि कृतीशील,कार्यसम्राट,सुतार सम्राट,कर्तबगार,कर्तृत्ववान सामाजिक कार्यात तत्परता इत्यादी तर ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात सामाजिक वैचारिक तसेच नैतिकतेच्या आधारावर ओबीसी सुतार समाजात एकही बहाद्दर सामाजिक ते राजकीय पदाधिकारी सापडणार नाही हि ओबीसी सुतार समाजात सत्य परिस्थिती आहे.
    ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील सर्वच सन्माननीय जबाबदार पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली मग ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पद तालुका पातळीवर असो अथवा जिल्हा पातळीवर असो किंवा,राज्य पातळीवर असो असावे फक्त नावासोबत पदभार,पदावली,एखाद्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली असेल अशा सर्वच बुद्धिवान,कर्तृत्ववान प्रत्येक जबाबदार सन्माननीय पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली त्या त्या क्षेत्रातील त्या त्या भौगोलिक क्षेत्रातील ओबीसी सुतार समाज बांधवांना दरडोई किमान दहा ते पंधरा हजार तरी ओबीसी सुतार समाज बांधवांना ओबीसी संदर्भात समाज जागृती मेळाव्यात,आरक्षण,संविधान जागरूकता अभियान कार्यक्रमात, ओबीसी समाज आंदोलनात,ओबीसी मोर्चात किंवा,इतर अन्य ओबीसी संदर्भात सुतार समाज प्रबोधनात्मक,समाज आंदोलनात्मक कार्यक्रमात संबंधित नेतृत्वाखाली दरडोई किमान दहा ते पंधरा हजार ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करावं यासाठी मोठं धाडस करावं.


    विश्वकर्मीय सुतार समाजात एवढा मोठा प्रचंड समाज ताफा,संपूर्ण राज्यातील जबाबदार आणि कृतिशील लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांची प्रचंड शक्ती,पाठबळ सामाजिक संघटनांकडे कार्यरत असतांना ओबीसी संदर्भात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात पिछाडीवर कशासाठी हा प्रश्न मात्र समाजात अनुत्तरित आहे.ओबीसी सुतार समाज सुशिक्षित,उच्चशिक्षित,बुद्धिवान आहे याची कल्पना सर्वानाच आहे.शिवाय अनेक समाज मान्यवर समाजात समाज प्रतिष्ठित,प्रतिभावंत,प्रभावशाली असतील.समाजात अनेक मान्यवरांनी स्वतःच्या नावासोबत समाज नेता,समाज नेतृत्व आणि युवक नेतृत्व अशी सन्मानित पदाची बिरुदावली सुद्धा जोडण्यात आलेली असेलच. याव्यतिरिक्त समाजात सुतार समाजाची शान,बाण,आण आणि दिग्गज,धुरंधर,बुलुंद तोफ,बुलुंद आवाज तसेच कार्यसम्राट,कर्तबगार,कर्तृत्ववान, तडफदार,धडाकेबाज,विचारवंत,मार्गदर्शक,आधारस्तंभ असणारे सुद्धा ओबीसी सुतार समाजात नक्कीच असतील.
     विश्वकर्मीय राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात समाज प्रभाव,प्रभूत्व,प्राबल्य,समाजात समाजप्रिय सुद्धा असतील समाजात वैयक्तिक पातळीवर कोण किती आर्थिक परिस्थितीने गर्भश्रीमंत,धनवान,धनाढ्य, प्रतिष्ठित,प्रतिभावंत आहेत याचा संबंध अजिबात येत नाही.समाजात सामाजिक श्रीमंती आणि वैयक्तिक श्रीमंती हे दोन्हीही विषय वेगवेगळे आहेत हे लक्षात घेणे गरजेचे असते.ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात मोठ्या रुबाबात आणि मोठ्या दिमाखात समाज नेतेगिरी करणाऱ्या समाज नेत्यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना ओबीसी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात,समाज जागृती मेळाव्यात,आंदोलन ठिकाणी,ओबीसी मोर्चात समाजात सहभागी करणे गरजेचेच आहे.
   विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात पदांची निर्मिती करणे म्हणजे संबंधित पदाची कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणिव करून देणारे एक महत्वाचे माध्यम असते.पदांची निर्मिती म्हणजे मान्यताप्राप्त,कर्तबगार,कर्तृत्ववान, कार्यसम्राट नेतृत्व होत नाही.समाजात नेतेगिरी करणारे आणि संघटना अध्यक्ष मान्यवरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात ओबीसी संदर्भात समाज जागृती मेळाव्याचे आयोजन करून लाखोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करणार आहात काय?.समाजात लाखोंच्या संख्येने उद्योग व्यवसाय उभारणी करण्यात येईल काय आणि समाजाला संवैधानिक आधार व अधिकार असलेले राजकीय प्रतिनिधित्व सुध्दा मिळवून देणार आहात काय?
समाजाला सत्य,वास्तव परिस्थिती समजण्यासाठी पारदर्शकपणे आपापल्या संघटनेच्याच वतीने जाहीर करावी. ओबीसी सुतार समाजात असे किती समाज मान्यवर खऱ्या समाज कसोटीवर उतरतील.सामाजिक,वैचारिक,नैतिक जबाबदारीचा विचार करता हे शिवधनुष्य पेलणे जमत नसेल तर मग म्हणावेसे वाटते कि,विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात विविध पदांची निर्मिती शोभेची वस्तू नसून विकासासाठी आणि प्रबोधनासाठी असतात.लिखाण समाज जागृती अभियान अंतर्गत.
प्रमोद सूर्यवंशी :-८६०५५६९५२१.चिखली,मातृतीर्थ बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *