
विशेष प्रतिनिधी कल्याण दि. 08 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार येथे महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलामार्फत “आपत्ती व्यवस्थापन,अग्निशमन,पुरविमोचन व प्रथमोपचार” या विषयावर कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार दि. 08/06/2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम सन्माननीय परिवहन व्यवस्थापक मा.डॉ श्री.विजय कुमार व्दासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमास कल्याण डोंबिवली महानगरपालिका सभागृह नेते मा.वरुण पाटील साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपनियंत्रक,नागरी संरक्षण,ठाणे मा.डॉ श्री. विजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अनिल गावित उप नियंत्रक नागरिक संरक्षण रमेश गोरे उपमुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण डॉक्टर राहुल मास्टर ट्रेनर नागरिक संरक्षण डॉक्टर प्रकाश ठमके नागरिक गौतम मोरे स्वयंसेवक नागरिक संरक्षण दल यांनी स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 अन्वये आयोजित या प्रशिक्षणात आग लागल्यावर काय करावे,गॅस सिलेंडरचा स्फोट कसा टाळावा,भूकंप-पुराच्या वेळी स्वतःचा व प्रवाशांचा बचाव कसा करावा,CPR द्वारे प्रथमोपचार कसे द्यावेत याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे 85 चालक,वाहक,महिला वाहक,यांत्रिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास परिवहन अधिकारी सन्माननीय आगार व्यवस्थापक श्री.दीपक चौधरी साहेब श्री.प्रमोद बागुल,श्री.रविंद्र संसारे,सुरक्षा अधिकारी श्री. भारत सांगळे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच भरारी पथक टीम – श्री.राजेंद्र पातकर, श्री.प्रवीण देशमुख, श्री. बाळासाहेब एरंडे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद जाधव यांनी केले तर प्रभारी मार्ग तपासणीस तथा भरारी पथक प्रमुख श्री. संतोष हेरोडे यांनी आभार मानले.
संकल्पना परिवहन व्यवस्थापक मा.डॉ.श्री विजय कुमार व्दासे साहेब, “केडीएमटीच्या बसमध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात.आपत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता शास्त्रोक्त पद्धतीने कृती केल्यास अनेक जीव वाचू शकतात. त्यामुळे असे प्रशिक्षण काळाची गरज आहे व यापुढेही नियमित घेतले जाईल.”
सभागृह नेते मा.श्री वरुण पाटील साहेब यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून नागरी संरक्षण दलाचे आभार मानले.

सागर तायडे यांस कडून
