२६ जानेवारी १९५० साली भारतात संविधान लागु झाले आज आपण देशात संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत.आज आम्ही सर्व भारतीय लोक मोठय़ा उत्साहाने हा दिवस साजरा करत आहोत. ज्याचाकडे अजुनही संविधानाची प्रत नसेल त्यांनी या अमृत महोत्सवी वर्षाचे औचीत साधुन आपल्या घरी संविधानाची प्रत आणावी आणी त्याचे वाचन करून घरोघरी संविधान हे अभियान चालवावे.या संविधानात बहुजनांना आपले हक्क मिळाले आहे.यात देशातील विषमता दुर करण्याची ताकद आहे.संविधान आणि त्यातील मूल्ये यांची सांगड घालण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.हे लोकांना असमानता आणि अन्याय ओळखण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी कारवाई करण्यास मदत करेल.तसेच तरुणांना संविधानात दिलेले मुलभूत हक्क आणि मूल्ये माहीत असावीत, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेला अनुसरून राष्ट्रीय समाजाची निर्मिती करणे आणी स्वातंत्र्य,समता,बंधुता ची जाणीव निर्माण करुन संविधानप्रेमी समाज निर्माण करणे हा या संविधान जागृती कार्यक्रमाचा उद्देश आहे.याचेच औचीत साधुन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,डि.वाय.एफ.आय शिवाजी नगर युनिट च्या वतीने भारतात संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,डि.वाय.एफ.आय शिवाजी नगर शाखा कार्यालयावर कॉमरेड हेमकांत सामंत यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.त्या नंतर प्रभात फेरी काढण्यात आली. टेंभीपाडा,नरदास नगर,माता रमाबाई आंबेडकर नगर,साई विहार,केदारे चौक अशी प्रभात फेरी काढण्यात आली प्रचार फेरीत प्रत्येक चौकात गीत व भाषणांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. प्रचार फेरीचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे करण्यात आले.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट नेते प्रा.जगन्नाथ बावा,भगवान साळवे,मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक निर्भीड पत्रकार सागर तायडे,यांनी या प्रचार फेरीचे स्वागत करून मार्गदर्शन केले. तसेच गणेश सोसायटी,माता रमाबाई नगर,मधील सदस्य चंद्रकांत जाधव,टणजी बागवे,सुधाकर नाईक,महाडीक,प्रशांत गायकवाड परिवार,समता साहित्य लोककला केंद्र केंद्राचे कवी गायक रुपेश साखरे,गौतम मोर,श्रीकांत गायकवाड,अनिल गमरे,जंगल मंगल मित्र परिवार,विलास कदम,प्रबोधन कला मंच,संदीप पटेकर,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,डि.वाय.एफ.आय शिवाजी नगर युनिट सदस्य यान सहभाग घेतला. प्रचार फेरीच्या समारोपाच्या शेवटी युनिट सचिव कॉमरेड अनिकेत पवार यांनी सर्वांचे आभार मानले.समविचारी संघटना,पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व लोकांनी प्रत्येक चौकात उत्तम प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला.
इन्कलांब झिंदाबाद!
जय भिम! जय हिंद जय भारत! जय संविधान!. संदीप राजापूरकर ७४००३५८२७० भांडुप,युनिट.