हॉटेल,रेस्टॉरेंटवर दारु विक्रीचा निर्णय रद्द महाराष्ट्रात दारु बंदीचा कायदा मागणीसाठी विधवा महिलांचे आक्रोश आंदोलन.

बातमी शेअर करा.

आझाद मैदान मुंबई – दारु मुक्ती आंदोलनाचे वतीने,मुंबईचे आझाद मैदानावर अनुक्रमे १५,१६,व १७ जुलै रोजी देवेंद्र फडणीसाचे मंत्री मंडळाने ३ जून २०२५ रोजी राज्यातील हॉटेल व रेस्टारेंटमधे विदेशी मद्यविक्रीचा निर्णय घेतला तो रद्द करावा,शिव छत्रपति दैवत असणाय्रा महाराष्ट्रात संपूर्ण दारु बंदीचा कायदा करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकडे सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता,महाराष्ट्र सरकारचे मुक्त दारु धोरणामुळे,दारु व्यसनात महिलांचे नवरे मारलेत अशा विधवा महिलासह राज्यातील दारुग्रस्त,त्रस्त शेकडो स्री,पुरुषांचे धरणे संपन्न झाले,वरील मागण्यासह राज्यातील सर्व अवैध दारु विक्री तातडीने बंद करावी,दारुचे व्यसनात मृत्यू झालेल्यांचे वारसांना किमान १० लाख भरपाई मिळावी,त्या कुटुंबाचे सर्वां गिण पुनर्वसन व्हावे,सरकारने घोषित केलेली राज्यातील पंढरपूर,शेगांव,शिर्डी,देहू,आळंदी,तुळजापूर,गुरुकुंज ( मोझरी) आदि सर्व तिर्थक्षेत्र दारु मुक्त करावीत,दारु बंदीचे काम करणारया कार्यकर्त्यांना दरमहा १० हजार मानधन व ५ हजार प्रवास खर्च मिळावा या महत्वपूर्ण मागण्याकरीता हे धरणे आयोजित केले,व निवेदने मा.देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,श्री.पंकज भोयर,गृहराज्य मंत्री यांचेकडे पाठवण्यात आलीत व दारु मुक्ती आंदोलनाचे प्रतिनिधी मंडळा सोबत चर्चेसाठी सतत ३ दिवस वेळ मागण्यात आली, परंतु लोकशाहीचे नाटक करणाय्रा फडणवि सांचे एकाही मंत्र्यास वेळ मिळाला नाही. शेवटी अधिवेशनाचे अखेरचे दिवशी १८जुलै रोजी आझाद मैदाना वरुन दारु मुक्ती आंदोलनाचे प्रमुख संयोजक भाई रजनीकांत यांनी, दारु कारखानदार दारु विक्रीचा व्यापार करणारे,व लाखो महिलांचे कुंकू पुसणारे,त्यांना वैधव्यात ढकलणाऱ्या   फडणविस सरकारचे मंत्र्यांकडून फक्त रस्त्यावरच जाहिर जबाब घेण्याचे घोषित केले व मुंबईचे आझाद मैदानावर,मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून लक्ष्यवेधी धरण्याचे उपक्रमाचा समारोप केला.या धरणे आंदोलनात दारु मुक्ती आंदोलनाचे राज्य संघटक,जेष्ठ पत्रकार सर्वश्री प्रभाकर नारकर,श्रीमती सिसीली कार्डोझो,संघटिका, कोकण विभाग,दारु मुक्ती आंदोलन,भाई प्रदिप अंभोरे,अध्यक्ष,भूमिमुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य,पुनम कनौजिया,एन.ए.पी.एम,पुजा पंडीत,जनता श्रमिक मोर्चा, मालाड,अविनाश पाटील,राज्य समन्वयक,महाराष्ट्र राज्य,व्यसनमुक्ती मंच, विनोद भोसले,सचिव, अंशकालीन महिला कर्मचारी संघ,नाशिक,दारु मुक्ती आंदोलनचे संघटक,कामगार नेते सागर तायडे, ठाणे, जगदीश इंगळे,संघटक,रमेश पवार,वाशि म,किरण ठाणगे,अहिल्या नगर,सिध्दांत गवळी,पैठण,दारु मुक्ती आंदोलनचे लक्ष्यवेधी धरणकर्ते श्री.रमेश गाडेकर,संघटक,बुलढाणा जिल्हा,भिमराव खरात,उषाताई सपकाळ, उषाताई जाधव,आशाबाई वाघ,शांता साबळे, आसराबाई पारवे,नंदाताई तायडे, आकाश सावंत,समाधान गिरी,शांताराम सोनोने, जिल्हा बुलढाणा,आदि शेकडो स्री-पुरुषांचा सहभाग ३ दिवसाचे धरणे उपक्रमात होता.                               

भाई रजनीकांत,संयोजक,दारु मुक्ती आंदोलन,म.रा.मो.८००७९९४०९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *