“मी कुणालाही घाबरत नाही”… बुद्ध म्हणतात, 

बातमी शेअर करा.

 मी म्हणतो म्हणून नाही, तर तुमच्या सदविवेक बुद्धीला पटत असेल तर घ्या अन्यथा नाही.एवढं स्वातंत्र्य बुद्धानी तुम्हाला दिले.म्हणजे तुम्ही घाबरू नका,सत्य बोलण्यासाठी निर्भीड पणे पुढे या,अन्यथा तुमच्या वर अन्याय झाल्या शिवाय राहणार नाही.प्रज्ञा,शील करुणेचा संदेश देणारे बुद्ध आम्हाला खऱ्या अर्थाने कळले पाहिजे.जगातला सर्वात निर्भीड व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ होय.याचे कारण म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्यावरून, म्हणजे पहिल्यांदा मी पाणी घेणार,माझी पाळी आहे,मी पाणी घेणार माझी पाळी आहे. यावरून वादाला सुरवात शाक्य आणि कोलिया मध्ये झाली.या होणाऱ्या वादाला नेहमी साठी संपूस्टात आणण्यासाठी शाक्य संघाच्या सेनापतीनी शाक्य संघाच्या सभासदांची सभा बोलावली. आणि त्या सभेत कोलीय हे आपली पाणी घेण्याची पाळी असतांना जबरदस्तीने रोहिणी नदीचे पाणी घेत आहेत त्यामुळे आपल्या लोकांच्या शेतीचे नुकसान होत आहे.त्यामुळे आपल्याला त्याच्या सोबत युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सेनापती म्हणतो की,युद्धाच्या बाजूला आणि युद्धाच्या विरोधात कोण,कोण आहेत त्यानी आप आपले मत मांडावेत,असा प्रस्ताव सेनापती मांडतो.

   खरं शाक्य संघांचे सभासद होत असतांना काही नियम होते.जो कोणी ते नियम मोडतील त्याला सजेला सामोरे जावे लागत होते. म्हणजे जो कोणी प्रस्ताव  मांडेल त्या प्रस्तावाच्या बाजूला जास्तीत जास्त लोक असावी लागत होती.म्हणजे बहुमताने तो प्रस्ताव पारित केल्या जात होता.आणि मग ज्यांनी विरोध केला त्याला शिक्षेस सामोरे जावे लागत होते. त्याची शिक्षा अशाप्रकारे होती 1) त्याला फासीची शिक्षा देण्याचा नियम होता.2) त्याच्या कुटुंबातील लोकांवर बहिष्कार आणि त्याची संपत्ती जप्त करण्याचा नियम होता 3) त्याला देशाबाहेर हाकलून देण्याचा नियम होता.या शाक्य संघाच्या सभासदाच्या नियमां प्रमाणे त्याला या तीन पैकी एका सजेला सामोरे जावे लागत होते.सिद्धार्थ ने जेव्हा युद्धाच्या प्रस्तावाच्या विरोधात जेव्हा आपले मत मांडले त्यावेळी सिद्धार्थ च्या बाजूला कोणीही नव्हते.त्यामुळे त्याला सजेला सामोरे जावे लागत होते. सिद्धार्थ हा राजकुमार असल्यामुळे त्याला सजा कशी दयावी या बाबत सेनापती हा संभ्रमात होता.

   खरं तर लढाई करण्यासाठी पुढे येणारा सेनापती हा संभ्रमात आहे,सजा कशी दयावी हे त्याला काही समजत नव्हते हे जेव्हा राजकुमार सिद्धार्थ च्या लक्षात आल्याबरोबर, सिद्धार्थ स्वतः च म्हणतो मीच गृहत्याग करतो आहे म्हणजे तुमचा प्रश्न आपोआपच मिटेल.असे सिद्धार्थ म्हणतो.याचा अर्थ असा की,सिद्धार्थ ला माहित होते की युद्धात मुळे संपूर्ण लोकांना त्रास होणार आहे अनेकांची जीवितहानी होणार आहे आणि दोन्ही राज्यातील लोकांना दुःख होणार आहे. याची जाणीव असल्यामुळे सिद्धार्थ राजकुमार स्वतःच त्यातून मार्ग काढतो म्हणजे कुणालाही न घाबरता गृहत्यागाचा निर्णय घेतो, एवढा निर्भीड व्यक्ती न घाबरणारा व्यक्ती जगात पहिल्यांदा लोकांच्या कल्याणसाठी पुढे येतो तो सिद्धार्थ राजकुमार होय. हे आम्हाला कळल्या शिवाय आपल्यात निर्भीडता येणार नाही हे बोद्ध माणसानी समजण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

   सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर तो सारनाथ या ठिकाणी त्या पाच संन्या सांना बुद्ध धम्म समज ऊन सांगतो आणि तिथेच संघ तयार होतो. पुढे यश,आणि अशी अनेक माणसे भिक्कू संघात सामील होतात आणि कोणत्याही माणसाला न घाबरता मानवाच्या कल्यानाचा असलेला बुद्ध विचार समाजात पोहचवितात हे सत्य आहे.अंगुलीमाल सारख्या खुंखार डाकू ला देखील बुद्ध आपल्या ज्ञान, नैतिकता,आणि करुणा च्या भरवश्यावर त्यात परिवर्तन घडवून आणतो पुढे अंगुलीमाल हा भिक्कू होऊन बुध्दाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करतो.ही निर्भीडता सिद्धार्थ राजकुमार आणि पुढे झालेल्या बुध्दा मध्ये होती.हे आम्ही केव्हा समजून घेणार आहोत.आषाढ पौर्णिमा पासून वर्षावास तीन महिने पर्यन्त अनेक बुद्ध विहारात चालू असतो. त्या वेळात बुद्ध विचार भिक्कू आणि काही उपासक लोकांना प्रामुख्याने बुद्ध उपदेश देऊन सांगतात. हे अलीकडे आपल्याला मोठया प्रमाणात विहारात पाहायला मिळते. त्यात उपासक वर्ग हा चिकित्सक पणे तो बुद्ध विचार किती समजून घेतो आणि निर्भीडपने लोकांपर्यंत पोहचवितो यावर जास्तीत जास्त लोक जागृती अवलंबून आहे. हा विचार केवळ बोद्ध लोकांना सांगून चालणार नाही तर इतरही लोका पर्यंत कसा पोहचेल यासाठी भिक्कू नी आणि बुद्ध अनुयायी यांनी निर्भीडपने लोकांपर्यंत जाऊन पोहचवीला पाहिजे.बुध्दानी सांगितलेला विचार जर लोकांना खऱ्या अर्थाने कळला तर लोकांचा ओढा बुद्ध विचाराकडे येईल.यात तुमची बुद्धी,अस्मिता,निर्भीडपण, नैतिकता,आणि करुणा दिसेल. म्हणजे “मी कुणालाही घाबरत नाही” सत्य सांगणे हे माझ कर्तव्य आहे. असे होईल. तेव्हा तुम्हाला खरा बुद्ध विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समजला असे होईल.आणि लोक कल्याण ही होईल.या सर्व हेतूने बुद्ध विचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, “मी कुणालाही घाबरत नाही” यातच आपली अस्मिता आहे. आणि जनतेवर असलेले खरे प्रेम आहे. जसे सिद्धार्थ राजकुमार ने रोहिणी नदीच्या पाण्या वरून निर्माण होणाऱ्या युद्धासाठी विरोध केला,की ज्यामुळे लोकांची हानी होणार होती.त्यामुळे लोकांच्या वाट्याला दुःख येणार होते. अलीकडे होत असलेल्या अन्यायाला रोखण्यासाठी बुद्ध विचाराची गरज आहे. 

अविनाश टिपले चंद्रपूर 9970917389.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *