संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये पाली व बुद्धिझम विभाग अंतर्गत जागतिक महिला दिन व सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर विशेष कार्यक्रम. 

बातमी शेअर करा.

जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त अमरावतीत विचारमंथन

अमरावती : स्त्रीशक्तीचा गौरव,शिक्षणाची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा स्मरणोत्सव म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पाली व बुद्धिझम विभागात जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता ए.व्ही. थिएटर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाजवळ आयोजित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाली व बुद्धिझम विभागाच्या समन्वयक प्रा.डॉ.रेखा वानखडे (पर्वतकर) मॅडम राहणार असून प्रमुख व्याख्यात्या म्हणून आयु.प्रणिता रक्षित मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. “वर्तमान परिप्रेक्ष्यात थेरीगाथा ते सावित्रीबाई फुले यांचा महिलांवरील प्रभाव” या विषयावर त्या विचारमंथन करणार आहेत.

कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक आयु.प्रा.डॉ. रत्नशील खोब्रागडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून आयु.निर्मल काळबांडे मॅडम विशेष उपस्थिती म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच प्रा. डॉ.टी.बी.रामटेके, प्रा.अनिता निगुळे, प्रा.कल्पना डोंगरे, प्रा.सपना मेश्राम, प्रा.कल्पना पाटील, प्रा.एस. कुमार  मेश्राम आणि प्रा.डॉ.कमलाकर गोवर्धन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

पाली व बुद्धिझम विभागाच्या विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम स्त्रीशक्ती, शिक्षण आणि समतेच्या मूल्यांचा जागर करणारा ठरणार असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारप्रबोधनाच्या सोहळ्याला साक्षी राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भिक्खू अमरावती सीलवंसलंकार 7507894203

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *