
विशेष प्रतिनिधी पुणे – संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जदारांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात,तसेच महामंडळाला अध्यक्ष नेमावा अशी मागणी सकल सुतार समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात विश्वकर्मा विराट संघाचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांनी केली.

यावेळी गणपत बारवकर,हणुमंत पांचाळ, रविंद्र रायकर मनीषा सुतार,मनीषा रायरीकर,गणेश राऊत, गजानन वानखेडे,व्हि.व्हि.एस.एस.चे तालुका अध्यक्ष दिलीप सुतार व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना विष्णू गरुड म्हणाले की एक लाख रुपये कर्जाला जामीनदार व तारणाची, तसेच सिबिल स्कोर ची अट शिथिल करण्यात यावी. तसेच कर्ज मंजुरी २१ दिवसात करावी. कर्जाचा हप्ता मंजूर तारखेनंतर तीन महिन्यांनी चालु करावा. १ लाखाच्या पुढिल कर्जास जामीनदार,तारण व सिबिल स्कोरची अट कायम ठेवावी.
कर्ज परत फेढीसाठी समाजातील राज्य स्तरीय नेते पदाधिकारी व सदस्य यांचे हमीपत्र सक्तीचे करण्यात यावे. जेणेकरून महामंडळाचे कर्ज थकित होणार नाही.सदर आंदोलनात मालेगाव, मुळशी, पिंपरी चिंचवड, खडकवासला, सातारा, लोणावळा व पक्ष्चिम महाराष्ट्रातील समाज बांधव,बंधु भगिनी उपस्थित होते.या वेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.व्हि व्हि एस एस ने सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.

विशेष प्रतिनिधी पुणे यांस कडून


