
ही कथा एका माणसाची आहे ज्याने आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करून त्यांचे पालन पोषण केले. प्रत्येक माणूस आपल्या कर्तव्यानुसार करत असतो.पण त्याचा मुलगा मात्र खूप आळशी होता तो दिवसभर फक्त मजा मस्ती करत राहायचा.आणि त्याच्या वडिलांनी कमवलेल्या पैशावर मौज करायचा.यामुळे त्याला एक चिंता होती की माझा मुलगा काही काम करत नाही.एक दिवस त्याने आपल्या मुलाला हाक मारून बोलावले आणि सांगितले आता तुला काम करावे लागेल.परंतु आज जर तू संध्याकाळ पर्यंत काही कमावले नाहीस.तर तुला या घरात प्रवेश मिळणार नाही.असे बोलून तो आपल्या कामाला गेला.तो मुलगा खूप आळशी झाला होता.आपले वडील कामाला गेल्यानंतर त्यांनी आईला ही गोष्ट सांगितली.आईने तिच्याकडे चे पैसे मुलाला दिले आणि बोलली संध्याकाळी वडील घरी आल्यानंतर हे पैसे तू त्यांना दे आणि मी कमवले असे सांग.
संध्याकाळ होतात त्याची वडील कामावरून घरी आले तो मुलगा आपल्या वडिलांकडे गेला आणि त्याला पैसे देऊन म्हणू लागला.बाबा हे पैसे मी कमवले.त्याचे वडील त्याला म्हणाले.जा आणि हे पैसे तू आपल्या विहिरीत टाकून दे.मुलांनी वडिलांचे ऐकले आणि पैसे विहिरीत टाकून दिले.दुसऱ्या दिवशी त्या माणसाने आपल्या बायकोला माहेरी पाठवले आणि आपल्या मुलाला सांगितले आज तुला कालच्या पेक्षा जास्त पैसे कमवावे लागतील. आणि असे बोलून तो आपल्या कामाला गेला.आता आई माहेरी गेल्यामुळे तो मुलगा आपल्या बहिणीला म्हणाला.बाबांनी मला पैसे कमवण्यासाठी सांगितलं आहे.त्यांना संध्याकाळी कामातून आल्यावर द्यायचे आहे. बहिणीने देखील आपल्याकडील पैसे भावाला दिले.आणि बोलली संध्याकाळी बाबा आल्यावर हे पैसे तू त्यांना दे.आणि सांग ही माझी कमाई आहे.संध्याकाळी त्याचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी ते पैसे आपल्या वडिलांना दिले.आणि परत त्याला सांगितले जा हे पैसे तू परत विहिरीत टाक.मुलगा परत गेला आणि पैसे विहिरीत टाकून आला कारण त्याचे वडील पाहत होते मुलगा खरंच पैसे टाकतो का ?
दुसऱ्या दिवशी त्या माणसाने आपल्या मुलीला आपल्या नातेवाईकांकडे पाठवले आणि तो आपल्या मुलाला म्हणाला आज तुला परत पैसे कमवावे लागतील.
आणि असे बोलून तो आपल्या कामाला गेला.आता त्या मुलाकडे स्वतः काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे तो गावात गेला आणि काम शोधू लागला एका ठिकाणी त्याला जड काम भेटले. एका ट्रक मधून लोखंड दुकानात नेऊन ठेवायचे होते नाव विलाजाने ते काम त्याने स्वीकारले.तो अगदी मनापासून काम करू लागला.ते काम जरी खूप मेहनतीचे होते तरी त्याला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.आणि संध्याकाळी तो पैसे घेऊन आपल्या घरी आला. त्याचे वडील कामातून आल्यानंतर त्यांनी ते पैसे आपल्या वडिलांना दिले.वडिलांनी परत त्याला सांगितले जा हे पैसे पण आज तू परत विहिरीत टाकून ये.असे बोलतात तो मुलगा खूप चिडला आणि बोलला बाबा,ही माझ्या कष्टाची कमाई आहे त्यामुळे मी विहिरीत टाकणार नाही.
मग त्याचे वडील त्याला बोलले आतापर्यंत तू माझ्या कष्टाची कमाई उधळत होतास. तेव्हा तुला काही वाटत नव्हते.परंतु आज तू स्वतः कमाई केली म्हणून तुला पैशाची किंमत कळली. आज तू स्वतः मेहनत करून पैसे कमावलेस म्हणून म्हणून विहिरीत टाकू शकत नाहीस.स्वतः कष्ट केल्याशिवाय पैशाचे मोल समजत नाहीसंजय सखाराम पवार-9137440340खांडोत्री,तालुका-चिपळूण,जिल्हा- रत्नागिरी
