
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन दलालांनी अर्ज भरून घेतले गेले.त्यासाठी रोजदारीवर आणि कमिशन वर बाई माणसं ठेवण्यात आली होती.तेच लोक भांडे वाटपाची माहिती देऊन अर्ज भरून आणत होती. त्यानंतर दलालच्या सेतु कार्यालयात त्यांनीच ९० दिवसांच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या बनावट सही व शिक्के कॉपी पेस्टच्या आधारे तयार केली.तालुका कामगार सुविधा केंद्रावर कोणत्या दलालाच्या मार्फत अर्ज आले त्यावर काही चिन्ह टाकण्यात आली.टिक असलेले अर्ज तालुका कामगार सुविधा केंद्रांवरील कंत्राटी कर्मचारी आणि आरो यांनी प्रत्येक अर्ज मागे रक्कम ठरली ती मिळाली,तरच त्यांचीच त्यानुसार बांधकाम कामगार म्हणून बोगस नांव नोंदणी करून घेतली,आपोआप झाली नाही. त्यांनाच भांडे व पेटी वाटप झाले.कामगार संघटना कडून आलेले खऱ्या कामगारांचे अर्ज काही रक्कम मिळत नसल्यामुळे ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या ९० दिवसांच्या प्रमाणपत्रावरील आवक क्रमांक दिनांक ठरलेल्या जागी नसलातर अर्ज नाकरल्या जात होते.सही व शिक्का असतांना देखील काहीना काही क्षुल्लक कारणाने नाकरल्या जातो.इंजिनियर,ठेकेदारांचे वर्क ऑडॅर,बँक डिटेल मागण्यात येते होते.खऱ्या कामगारांची त्याची सर्व कागदपत्रे बरोबर असतांना हेतुपुरस्सर अर्ज त्रुटी काढल्या गेल्या.आणि खऱ्या कामगारांची अर्ज रद्द केला गेले.मग बोगस नांव नोंदणी कोणी केली त्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे.हे होतांना दिसत नाही.हे कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांना वाचवण्यासाठी चालले नाटक आहे.यांचे पुरावे अनेक संघटनांनी सादर केले त्यांची दखल घेतल्या गेली नाही.
आम्ही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने २४/०४/२०२४ पासून सतत पत्रव्यवहार करीत आहोत.सप्टेंबर २०२४ ला आचार संहितेचा नांवाखाली पोर्टल बंद करण्यात आले होते.त्याविरोधात याचिका दाखल केली होती.तिचा निकाल 6 नोव्हेंबर 2024 लागला असतात.सरकारने त्यांची अंमलबजावणी केली नाही.पत्राचे उत्तर मिळत नाही त्यावर चर्चा होत नाही. म्हणून १२ डिसेंबर २०२४ ला आम्ही कॉम्रेड शंकर पूजारीच्या नेतृत्वाखाली मंत्रालायत धडक मारली, ईमेल,पत्राची दखल घेऊन उत्तर दिले जात नाही,चर्चा केली जात नाही,म्हणून सत्तर नोंदणीकृत कामगार संघटना पदाधिकारी यांनी प्रधान सचिव कामगार मा.विनीत सिंगल वेद मॅडम यांच्या कार्यालयत भेटीसाठी धडक दिली असता. त्यांच्या सचिवांनी पूर्व परवानगी नसल्यामुळे भेटता येणार नाही असे सांगितले.आम्ही तीन महीने झाले भेटण्याची वेळ तारीख मागतो,ईमेल देतो.त्याचे उतर मिळत नाही मग काय करायला पाहिजे.भेट घेतल्या शिवाय आम्ही जाणार नाही.बोलवा पोलिसांना अशी जोरजोरात ओरडा ओरड झाल्यामुळे विनीत सिंगल वेद मॅडम बाहेर आल्या आणि काय झाले यांची चौकशी केली आणि सर्वांना कॅबिन मध्ये घेऊन सर्व समस्या वर चर्चा केली.लवकरच समितीच्या शिष्टमंडळा बरोबर संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासहन दिले.त्यानंतर त्यांची बदली झाली त्यांच्या जागी मा.आय ए कुंदन मॅडम आल्या त्यांना आम्ही सर्व पत्रव्यवहार करून माहिती दिली भेटण्याची वेळ तारीख मागितली.मी नवीन आहे संपूर्ण माहिती घेतो आणि बोलवतो असे तोंडी आश्वासन मिळाले.आम्ही १८ डिसेंबर २०२4 ला नागपूर हिवाळी अधिवेशनवर भव्य मोर्चा काढला.तेव्हा मंत्र्यांचे खाते वाटप झाले नव्हते. मान.अतुल सावे माजी मंत्री यांनी निवेदन स्वीकारले आणि नवीन कामगार मंत्री आले की त्यांच्या सोबत आपली मीटिंग लावून देतो असे आश्वासन दिले.

१२ डिसेंबर ते १२ जानेवारी एक महिना झाला. आम्ही सतत तिसऱ्या दिवशी ईमेल वर वेळ मागत होतो.शेवटी १५ जानेवारीला सतर कामगार संघटनेचे पदाधिकारी कुंदन मॅडमला भेटण्यासाठी मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात भेटी साठी गेलो असतात.तेच ईमेल मिळाला नाही,परवानगी नाही.मागच्या सारखी ओरडा ओरड नंतर पाच प्रतिनिधीना आत मध्ये घेऊन चर्चा तुम्ही कामगार संघटना वाले दलाल आहात तुम्ही कामगारांकडून पैसे गोळा असा आरोप मॅडम नी केला.कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सर्व पुरावे दाखविण्याचा प्रयत्न केला असतात.त्यांनी आवाज चडवून बोलू नका असा दमच दिला,बोलू नका नाहीतर पोलिसांना बोलावून अटक करण्यास सांगेल अशी धमकी दिली. पण गेली तीस चाळीस वर्ष कामगार चळवळीचे नेतृत्व करणारी व्यक्ति वयाच्या ७५ व्या वर्षी त्याच उमदीने कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतो.त्याचा आवाज बंद करणे शक्य नव्हते.तेव्हा कुंदन मॅडम ने पोलिसांना बोलावले ए सी पी साहेब त्यांची मंत्रालय सुरक्षा अधिकारी टीम आली त्यांनी २२ जिल्ह्यातील २२ संघटना पदाधिकारी यांना ताब्यात घेतले.शंकर पुजारी वयोवृद्ध व आजारी असल्या कारणाने त्यांना गेटच्या बाहेर सोडण्याचे सांगितले.तेव्हा मी सागर तायडे मुंबई,प्रशांत रामटेके वर्धा,प्रशांत मेश्राम अकोला,रत्नपाल डोफे यवतमाळ यांच्याशी कुंदन मॅडम यांनी संघटना आणि दलाल यांची काम करण्याची पद्धत समजून घेतली.लवकरच आपण याविषयावर संयुक्त बैठक बोलावू असे सांगितले.परंतु १५ जानेवारी २०२२५ पासून आज पर्यन्त स्वतंत्र कृती समितीला चर्चा करण्यासाठी वेळ तारीख दिली जात नाही.पत्राचे ईमेल चे उतर मिळत नाही.याबाबत आम्ही उप पोलिस आयुक्त मंत्रालय सुरक्षा यांना पत्र दिले आहे.
भारतीय ट्रेड युनियन अॅक्ट १९२६ च्या कायद्यानुसार नोंदणीकृत कामगार संघटना ना सोबत घेऊन काम करण्याचा हा महाराष्ट्र शासन महत्त्वाचे अति तात्काळ क्रमांक :- इबांका- २०१७/प्र.क्र.३७२/कक्ष-७, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग मंत्रालय राजगुरू चौक मंत्रालय मुंबई-४०००३२. दिनांक १५ सप्टेंबर २०१७,प्रती. कामगार आयुक्त कामगार भवन ई ब्लॉक सी -२०,बांद्रा कुर्ला संकुल बांद्रा पूर्व मुंबई ४०००२१,विषय:- बांधकाम कामगारांचे कायद्या अंतर्गत नोंदणीसाठी व लाभासाठीचे अर्ज (प्रस्ताव) नोंदणीकृत मजदूर संघटनेकडून दाखल करून घेण्याबाबत. संदर्भ :- आपल्या कार्यालयाचे क्र.मइवइबांकमं शासन संदर्भ-४/२०१७,दिनांक २९/०५/२०१७, दत्तात्रेय य.डांगे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सहीने आदेश यांनी पायदळी तुडवळा आहे. जन सूनवाई विधायक मंजूर होण्या अगोदर हे सरकार त्याचे प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीने न्याय देत आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्याव्याच्या भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग. शासन निर्णय क्रमांक इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार ७ अ, बादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०००३२,तारीख २६ मे २०१४,सही- दि.सो.राजपूत सह सचिव महाराष्ट्र शासन.यांच्या सहीने असा आदेश असतांना ही सुरक्षा संच,पेटी वाटप,भांडे वाटप करण्यात आले. असा आदेश असतांना कामगार मंत्र्यांना अचानक कशी काय जाग आली?. काम करता असतांना कामगारांना सुरक्षा साहित्य कंत्राटदार यांनी देणे बंधनकारक असतांना कल्याणकारी मंडळाने नाका बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच वाटप का केले?.
दलालांनी दिलेल्या बोगस ९० दिवसाच्या प्रमाणपत्राची तालुका कामगार सुविधा केंद्रातील कर्मचारी यांनी चौकशी न करता अर्ज दाखल कसा करून घेतला.त्यांनीच नोंदणी अधिकारी यांची सही घेऊन मंजूरी घेतली.चौकशी न करता नोंदणी अधिकाऱ्यांनी सही करून मंजुरी कशी दिली?.कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार आहे?.
सरकारने व कल्याणकारी मंडळाच्या सचिवाने आपल्या बीओसीडब्लू (BOCW) विभागातील विभाग प्रमुख व कर्मचारी आरो यांचा बचाव करण्यासाठी जे एजेंट दलाला गावोगावी निर्माण केले.त्यांचीच बीओसीडब्लू (BOCW) विभाग प्रमुखाची दक्षता समितीवर नेमणूक केली.वास्तविक पाहता ज्या ट्रेड युनियनच्या लोकांनी पुराव्यासह आवाज उठवून सरकारच्या व मंडळाच्या सचिवांच्या लक्षात आणुन देण्याचे काम कामगार संघटनांनी केले. त्यांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक होते.
एजेंट दलाल यांनी गावोगाव जाऊन ग्रामसेवक,ठेकेदार यांचा बनावट शिक्का तयार करून 90 दिवसांच्या प्रमाणपत्रावर बनावट सही व शिक्के मारून तसेच आधार कार्डावरचा एक साईट पत्ता बदलून मंडळामध्ये बोगस नाव नोंदणी करणाऱ्या फिरस्ती दलाल एजंट यांच्या साखळीत असणाऱ्या तालुका कामगार सुविधा केंद्र प्रमुख व कर्मचारी तसेच आरो यांची चौकशी दक्षता पथकाने केली पाहिजे होते,तेव्हा कुठे फिरस्ती दलाल एजंट शोधून काढता आले असते.या संदर्भात आम्ही संघटनेच्या वतीने वारंवार सरकारी कामगार अधिकारी,सहाय्यक कामगार आयुक्त,कामगार आयुक्त साहेब,कामगार मंत्री साहेब, कामगार प्रधान सचिव तसेच कल्याणकारी मंडळाचे सचिव यांच्याकडे पुराव्यासह एजेंट दलाल यांच्या नावा सहित तक्रारी ईमेल द्वारे आणि पत्राद्वारे केले आहेत.परंतु त्यांची अद्याप पर्यंत कोणत्याही दखल घेऊन कोणत्याही प्रकारची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही.परंतु असे होताना दिसून येत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठी हे दक्षता पथक निर्माण करण्यात आले,अशी शंभर टक्के शंका निर्माण होत आहे.तालुका कामगार सुविधा केंद्र प्रमुख व कर्मचारी तसेच आरो यांची चौकशी दक्षता पथकाने केली पाहिजे.ते न होता कामगारांची चौकशी होत आहे. ही म्हणजे आंधळ दळते कुत्र पीठ खाते असे झाले आहे,दलाल एजंट,तालुका कामगार सुविधा केंद्र प्रमुख,कर्मचारी आणि आरो यांना वाचविण्यासाठी दक्षता पथक काम करतांना दिसत आहे म्हणजेच ही प्रचंड ढोंग केले जात आहे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती.
