समाजातील रुग्णांची सेवा म्हणजेच देश सेवा होय!-

बातमी शेअर करा.

प्राध्या.डॉ.जयपाल पाटील अलिबाग:- रुग्ण सेवा ही देशसेवाच आहे आपण सारे जण महाराष्ट्र शासनाच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याने आमच्या अलिबागच्या रहिवासी असलेल्या पहिल्या महिला डॉ. सौ.आनंदीबाई जोशींचे नाव जगप्रसिद्ध आहे.त्याप्रमाणे आपणही कोणत्याही आपत्तींना शांतपणाने सामोरे जाऊन आपल्या आई-वडिलांचे आपल्या गावाचे नाव सर्वश्रुत करून रुग्णांची सेवा मनोभावे देशसेवा करा असे मार्गदर्शन मेडिकल कॉलेज अलिबागने आयोजित केलेल्या दुसऱ्या दिवशीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत रायगड भूषण प्राध्यापक डॉ.जयपाल पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर मेडिकल कॉलेजच्या प्रमुख डॉ.पूर्वा पाटील प्राध्यापक डॉ.जयपाल पाटील,डॉ. चांदोरकर,डॉ.काळे,108 चे सहाय्यक जिल्हा व्यवस्थापन अधिकारी डॉ.जगताप डॉ.अजित बर्गे डॉ.अजित गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.पूर्वा पाटील यांच्या शुभहस्ते होऊन मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी डॉ.पूर्वा पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्राध्यापक डॉ.जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर इतर मान्यवरांचे आयोजक डाॅ.संतोष वाघमोडे यांनी केले.

  आपल्या प्रास्ताविकात डॉ.पूर्वा पाटील म्हणाल्या की रायगड जिल्ह्यात अनेक आपत्या येतात यामध्ये आपण कसे सुरक्षित रहावे व आपल्या व्यवसायात येणाऱ्या आपत्यांबाबत अनुभवी मार्गदर्शकांकडून ज्ञान प्राप्त करून घेणे यासाठी आपल्या पहिल्या सत्रात रायगड जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत इंडि.आर.एफ.आणि नागरी संरक्षण दलाकडून आपण प्रशिक्षण घेतलेत आज रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष जगप्रसिद्ध आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक प्राध्यापक डॉ.जयपाल पाटील व त्यांच्या फाउंडेशनचे पारंगत तज्ञ मंडळींचे ज्ञानामृत आपणास मिळणार आहे ते सर्वांनी घेऊन सुरक्षित राहावे असे त्या म्हणाल्या.प्रारंभी पुणे येथून आलेले महिलांविषयक तज्ञ डॉक्टर अशोक काळे यांनी गर्भ व बाळंतपणाच्या वेळी कोणत्या आपत्याला सामोरे जावे लागते याचे चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले.त्यांनी केलेल्या हजारो बाळंतपणाच्या वेळी आलेल्या अडचणी वर कशी मात केली याचेही अनुभव सांगितले.यानंतर अलिबागचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ,रोटरी क्लबचे पदाधिकारी,संगीत प्रेमी चित्रपट निर्माते डॉक्टर चांदोरकर यांनी लहान मुलांना येणाऱ्या विविध आपत्यांवर कशी मात करावयाची याचेही अनुभवाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले,

रुग्णालयात अनेकदा सीपीआर करताना येणाऱ्या आपत्यां बाबत डॉ.अजित बर्गे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तर रस्त्यावरील अपघात व अवघड बाळंतपणासाठी महाराष्ट्र शासन व बीव्हीजी इंडिया लिमिटेड ची 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा याची माहिती डॉ.जगताप यांनी दिली.सध्या तरुण युवक युवतींच्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे अनेक आपत्या पण येतात यासाठी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातून सोशल मीडिया लॅबच्या पोलीस हवालदार नीलम नाईक आणि सायबर च्या पोलिस हवलदार शितल घरत यांनी याबाबतच्या येणाऱ्या आपत्यांना सुरक्षित कसे राहायचे याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मान्यतेने मार्गदर्शन केले. यावेळी तरुणांचा आवडता विषय म्हणजे वाहने चालवणे याबाबत नवीन मोटर वाहन कायद्याची माहिती पुढे सरकारी अधिकारी म्हणून सेवा देताना लाच लुचपत कायद्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती कायद्याची माहिती आकाशातील विजे बाबत दामिनी ॲपचा वापर कसा करावा याची माहिती विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांना व लवकरच भव्य दिव्य मेडिकल कॉलेज ला डॉ.सौ.आनंदीबाई जोशी मेडिकल कॉलेजला नाव द्यावे अशी मागणी मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणीपत्र देणार असे डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले रायगडचे माजी सिव्हील सर्जन असतांनाचे वेगवेळया आलेलया आपत्तीचे अनुभव डॉ.अजित गवळी यानीं सांगितले ते रायगडचा युवकफाउंडेशन चे सल्लागार आहेत.शेवटी डॉ.जयपाल पाटील यांनी आपली सखी व लाडु कविता सादर करून कार्यशाळेचा समारोप केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेडिकल कॉलेजच्या मेडिकल कॉलेज समाज सेविकासौ.चित्रा ठाणगे,सौ.नम्रता रणसिंग यांनी केले आणि आभार सौ.हर्षा जाधव यांनी मानले.

प्राध्या.डॉ.जयपाल पाटील ९६७३७२७२७७,यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *