आगवे येथे जिल्हास्तरीय जलसा गीत गायन स्पर्धत गूढे अव्वल स्थानी

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधि रत्नागिरी – दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने चिपळूण तालुक्यातील मौज गाव आगवे या ठिकाणी सावर्डे कुटरे तुरुंबव,यांच्या विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा जयंती महोत्सव या निमित्ताने दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा स्तरीय प्रबोधनात्मक गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये एकूण ११ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता,उपस्थित मान्यवरांचे स्वागत समारंभ होऊन रात्री १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,चिठ्ठी उडवून प्रत्येक संघाला नंबर देण्यात आला.

  एकूण अकरा जलसा मंडाळानी भाग घेतला होता १) माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ मौजे तेऱ्ये, २) नवतरुण भिमसेवा संगीत जलसा कला मंच मांडकी, ३) भीमसेवा जलसा मंडळ कळंबस्ते, ४) भीम ज्योत जनसेवा जलसा मंडळ आंबवली खेड,५) भीम ज्योत जलसा मंडळ गुढे, ६) मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसा कोकरे, ७) वैभव कला जलसा मंडळ ओमळी, ८) धम्मक्रांती जलसा कला मंच रत्नागिरी, ९) त्रिरत्न जनसेवा ज्यांचा मंडळ कुशिवडे, १०) नवतरुण संगीत जलसा मंडळ वहाळ, ११) भिमसेवा जलसा मंडळ मुचरी उपस्थित मान्यवरांचे स्वागत समारंभ होऊन रात्री दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.चिट्टी उडवून प्रत्येक संघाला नंबर देण्यात आला त्याप्रमाणे नव तरुण भीम सेवा संगीत जलसा मंडळ मौजे मांडकी यांनी प्रथम गीत गायनाला सुरुवात केली सर्व संघाने सुंदर सादरीकरण करून उपस्थित जलसा कलाप्रेमी यांनी आनंद लुटला आणि जशी स्पर्धा रंगत गेली आणि एका पेक्षा एक सादरीकरण होत गेले तेव्हा मात्र परिक्षकांची खरी कसोटी पहायला मिळाली या स्पर्धेला परीक्षक,संजय पवार खांडोत्री,माधवराव मोहिते पाथर्डी,आणि संदेश कदम सर,शेणवडे यांनी योग्य निरीक्षण आणि परीक्षण करून निकाल जाहीर केला. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा आंबेडकरी कला मंच यांचे अध्यक्ष प्रा.प्रदीप मोहिते,सचिव सतीश जाधव सर तसेच धम्मक्रांती जलसा कला मंच रत्नागिरी यांचे अध्यक्ष मनोज जाधव सर उपस्थित होते.प्रथम क्रमांक,संजय कदम गुढे व द्वितीय क्रमांक,प्रदीप मोहिते ओंमळी,आणि तृतीय क्रमांक,सतीश जाधव कोकरे,तसेच उत्कृष्ट कवी,जनार्दन जाधव आगवे, यांना पुरस्कार देण्यात आला व उत्कृष्ट हार्मोनियम वादक,मौजे गाव तेऱ्ये यांना देण्यात आला,विभागातील सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष चंद्रकांत जाधव विजय पवार संजय जाधव अमरदीप मोहिते सुदेश कदम शरद पवार,विनोद कदम यांनी मेहनत घेऊन हा जयंती कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला,

संजय पवार मांडकी,९७०२६४९०८१ ,

तालुका- चिपळूण, जिल्हा-रत्नागिरी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *