
विशेष प्रतिनिधी नाशिक : दिनांक 26 एप्रिल 2024 महाकवी कालिदास कलामंदिर शालिमार या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती “ना डीजे- ना डान्स” तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देण्यासाठी संघटनेतर्फे मोफत “लाईफ चेंजिंग सेमिनार” देऊन अगदी महापुरुषांच्या विचारांना शोभेल अशी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.भालचंद्र चव्हाण IAS ग्राउंड वॉटर सर्व्हे कमिशनर (G.S.D.A) पुणे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित प्रमुख मार्गदर्शक शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी व मोटिव्हेशनल ट्रेनर किरण रामी बाबुराव मोहितेंसह, कॅप्टन कुणाल गायकवाड,कृष्णा शिंदे,मौलाना सलीम खान, अजमल खान,एडव्होकेट प्रभाकर वायचळे,डॉ.नितीन गोडबोले, डॉ.अर्चना तोंडे, रिलॅक्सो डोमेसवेअर कंपनीचे सीईओ अब्दुल्ला खान सर उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून काश्मीर ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली.यानंतर भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.भालचंद्र चव्हाण सर यांनी प्रसंगी महापुरुषांची जयंती ही खऱ्या अर्थाने साजरी करत आहात, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले व असेच यापुढेही विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी भारतीय हितरक्षक सभा भारत यांनी असेच योगदान देत राहावे,अशा शुभेच्छा दिल्या.माननीय सचिन जोशी सर यांनी AI वर अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. AI महत्व विशद करताना त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने आपला स्वतःचा विकास करणे कसा आवश्यक आहे. याबद्दल अनेक विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. भारतात येणाऱ्या दहा वर्षात जवळपास 70 टक्के विविध क्षेत्रातील करिअरच्या संध्या पूर्णतः बदलणार असून आजच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेऊन करिअरची योग्य ती निवड केली पाहिजे.आपली आवड ज्या क्षेत्रात आहे,परंतु त्या क्षेत्रातले कौशल्य जर आपल्याकडे नसेल,तर मात्र आवडी बरोबरच कौशल्य ही विद्यार्थ्यांनी संपादन करण्याची गरज आहे.अन्यथा आपल्या करिअरच्या वाटा चुकू शकतात ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देऊन त्यांनी AI च्या माध्यमातून आजच्या विद्यार्थ्यांना काय- काय संध्या आहेत..? याचे उत्कृष्ट प्रेझेंटेशन देऊन विद्यार्थ्यांना भविष्याची वाट दाखवली.तसेच पुढील करिअरच्या संधी काय आहे हे विद्यार्थ्यांना अतिशय सुटसुटीत पद्धतीने समजावून सांगितले.

यानंतर मोटिवेशनल ट्रेनर माननीय किरण रामी बाबुराव मोहिते यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व समजावून सांगितले.आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे आहे.मात्र यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा विषय त्यांना कसा मदत करू शकतो..? याचे महत्त्व विशद करताना भारतामध्ये व्यक्तिमत्त्व विकासाला एक टक्का देखील महत्व दिला जात नसून प्रगतशील राष्ट्र व्यक्तिमत्व विकासाला प्रचंड महत्व देत आहे.जपान सारख्या देशांमध्ये वय वर्ष 10 पर्यंत फक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय शिकवला जातो.त्यामुळे जपान हा अतिशय प्रगत राष्ट्र म्हणून आपल्यासमोर आहे.म्हणून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन,जिद्द,आपले वर्तन,सुसंवाद,चिकाटी व सातत्य ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे.ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व देऊन शिक्षणाच्या माध्यमातून आपला व समाजाचा कायापालट कसा होऊ शकतो,याचे महत्त्व किरण मोहिते यांनी आपल्या मार्गदर्शनात करताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा,यासाठी पेटलेली आग खाणे,काचेच्या फोडलेल्या बॉटल्सवर चालणे असे चित्तथरारक विविध असलेले प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले.ज्यामुळे भिती जाऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसला.
महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमात रिलॅक्सो डोमेसवेअर कंपनीचे सीईओ मा.अब्दुल्ला खान यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. जवळपास 85000 हजारांची शैक्षणिक बक्षिसे या निमित्ताने विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आली.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नाशिक मधील ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण संपादन करून आज विविध क्षेत्रात ज्यांनी आपल्या नावलौकिक केला आहे अशा विद्यार्थ्यांना या जयंतीच्या निमित्ताने “आदर्श विद्यार्थी पुरस्कार” देण्यात आला ज्यामध्ये एडव्होकेट गोदावरी देवकाते,एडव्होकेट प्रियंका शिंदे,सीमा श्रावण,किरण लोखंडे,जयेश बच्छाव,प्रांजळ गायकवाड, ऑफिया शेख,राझीन शेख यांचा समावेश होता
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती काकड मॅडम यांनी अतिशय सुंदर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक – मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रमिला पवार मॅड्म यांनी केले.संघटनेच्या कार्याची ओळख – कृष्णा शिंदे यांनी करून दिली.आभार – मौलाना सलीम खान यांनी मानले.लकी ड्रॉ चे व्यवस्थापन गझाला खान,तंजू खान आणि रिलॅक्सो डोमेसवेअर कंपनीच्या टिमने केले.कार्यक्रमाचे समापन राष्ट्रगीताने करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिलॅक्सो डोमेसवेअर कंपनी,ब्रेन सिक्रेट काऊन्सेलिंग अँड रिसर्च सेंटर,AIMS चॅरिटेबल ट्रस्ट -नाशिक, एल.एस.जे वेलनेस नर्सिंग कॉलेज (जी.एन.एम.),तमिळ सोशल फेडरेशन-नाशिक,धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था-नाशिक,खिदमत -ए -खल्क मल्टिपर्पज वेल्फेअर फौंडेशन यांनी परिश्रम घेतले.
किरण रामी बाबुराव मोहिते -9561883549,नाशिक.यांस कडून
