मागण्यामान्य करा नाहीतर महाराष्ट्र दिनी एसटी कामगार सेना विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण करणार- गजानन माने 

बातमी शेअर करा.

बुलडाणा,(प्रतिनिधी)- राज्यपरिवहन बुलडाणा विभागातील कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा बाबत एसटी कामगार सेनेने विभाग नियंत्रक यांना ०४ फेब्रुवारी २०२५ ला मागण्याचे निवेदन दिले होते पण आज पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही वेळोवेळी संपर्क साधला असता विभाग नियंत्रक व राप प्रशासनाचे आधिकारी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले म्हणून आम्ही १५ एप्रील २०२५ रोजी उपोषण नोटीस दिली की, आमच्या खालील मागण्या २७/११/२४ रोजी कामगीरीवर पाठविलेल्या चालक वाहकांना मेहकर आगारात पाठवावे, बुलडाणा विभागातील चालक, वाहक हे सहा.वाह.निरिक्षक, वाहतूक नियंत्रक परिक्षा पास झालेले आहे त्यांना तात्काळ रिक्त जागेवर त्यांची पदोन्नती करावी, चिखली, बुलडाणा आगारात वाहकाकडून आलोकेशन केले जाते, मर्जीतील कामगारांना एकच एक कामगीरी दिली जाते व आतीकालीक भत्ता ही मर्जीतीलच कामगारांना दिला जातो, चालक कम वाहक यांना १५ दिवस चालक व १५ दिवस वाहक या परिपत्रकाची पायमल्ली केल्या जात आहे, बुलडणा आगारात चालक, वाहक यांना पिण्याचे पाणी नाही आरो ना दुरूस्त आहे व बस्स्थानकावर पीण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली दिसत आहे प्रशासन फक्त दिन जाव पैसा आव ची भूमिका घेत आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे रापच्या ब्रिद वाक्यांची पायमल्ली केल्या जात आहे तर त्वरीत चालक/वाहक/ प्रवाशाना पीण्याच्या पाण्याची व्यवस्थाकरावी, इतर विभागातूव विनंती बदली आलेल्या कामगारांना त्यांच्या जवळच्या आगारात देण्यात यावे, सर्व आगारातील चालक/ वाहक यांचे आलोकेशन वेळेच्या आत लावावे खोडतोड नसावी,आगारातील चालक/ वाहक कामगीरीवर असतात पण त्यांना प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कामगीरी मिळत नाही अशा सर्व कामगारांना हजेरी पटावर दाखवून त्यांना हजेरी देण्यात यावी, शेगाव आगारात एटीआय टीआय असतांना चालक विरकर आलोकेशन करतात हे कोणत्या नियमाने आहे अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी आहे की, प्रवाशांच्या सेवेसाठी आहे तर तत्काळ विरकर यांना आलोकेशन वरून हाटवीवे,विभागातील कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशन, वार्षिक वेतन वाढ प्रलंबीत आहे ते ताबडतोब काढण्यात यावे, खामगाव आगारात माणिक गोरे यांचेवर हल्ला करणारे रंजीत सपकाळ यांचेवर कार्यवाही करावी, संजय दिपके, माणिक गोरे यांचे वैद्यकीय बिले तात्काळ अदा करावी वरिल मागण्या ३० एप्रिल २०२५ पर्यंत मान्य न केल्यास

आम्ही १ मे २०२५ महाराष्ट्रदिनी विभागनियंत्रकांच्या कार्यालयावर उपोषणास बसनार असा ईशारा सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन माने, राज्यचिटणिस विजय पवार, विभागीय अध्यक्ष संदिप पाचपोर, विभागीय सचिव संजय उबरहंडे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

बालासाहेब जाधव – 94225 91321, बुलडाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *