“शूद्र” कुणबी आगरी भंडारी यांनी मराठा (क्षत्रिय) ब्राह्मण,वैश्य या उच्चवर्णीय शोषक,लुटारू यांचा इतिहास समजून घ्यावा.तरच “जरांगे” समजेल- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

भारत हा कृषीप्रधान देश आहे.ही जगप्रसिद्ध गोष्ट आहे.तरीही जमीनदार शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांचे हिंदू धर्माने जन्मानुसार कायम विभाजन केले आहे.

ओबीसी जातीत एकदा जन्म घेतला की आम्हाला कधी उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य होता येत नसेल? तर आज शूद्र हलका कुणबी हा मराठा होऊ शकतो? उच्चवर्णीय क्षत्रिय मराठा कुणबी होऊ शकतो?.विचारा जरा हिंदू धर्म पीठांपैकी एका तरी धर्माच्या प्रमुखांना? मग मराठा मोर्चा काशीला जाऊ द्या,नवी मुंबई वाशी?,मुंबई चेंबूर वाशीला ? कशाला? ही धार्मिक विषमता जगाला आजही सांगितली जात नाही.जमीनदार मराठा ब्राह्मण वैश्य या मनुस्मृतीच्या लाडक्या लोकांच्या शेतात जन्मजात वेठबिगार,नोकर,चाकर,सेवक,बिनपगारी कामगार म्हणून काम करणे म्हणजे “शूद्र ओबीसी” असणे होय.कोकणात पूर्वीचे खोत, धर्माधिकारी ब्राह्मण ईश्वरसेवा म्हणून आदिवासी आगरी कोळी कुणबी यांना आजही यांना हिंदू धर्मातील “भक्ती” म्हणून आजही फुकट राबवून घेतात.अर्थात अनेक मंदिरे,आश्रम,राजकीय पक्ष यात ही “सेवा” स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्याकडून धर्माच्या तत्त्वज्ञानाने आजही करून घेतली जाते.याची जाणीव मागासवर्गीय जातींना झाली असती?.तर ते उच्चवर्णीय जातींच्या धर्म देवळे,कारखाने,राजकीय पक्ष यात ब्राह्मण पुजारी,उद्योजक,पक्षप्रमुख झाले असते.? शूद्रांचा समतेसाठी संघर्ष आजही संपलेला नाही.ओबीसी नेतृत्वाला तो समजून उमजलेला नाही.त्यांच्या प्रत्यक्ष कृतीत दिसत नाही.

  कुणबी आणि मराठे एकच आहेत.हे तत्वद्न्यान मनुस्मृतीचे हजारो वर्षांचे शोषणाचे अत्याचारांचे,विषमतावादी तत्वद्न्यान संपवण्याचे काम आहे.म्हणूनच जरांगे हे महाराष्ट्रातील स्त्रिया शूद्र अतिशूद्र जातींचे शोषण,गुलामी उघड करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्री माई फुले यांना मराठा आरक्षणाच्या मनुपिठावर नाकारून,मराठा कुणबी म्हणजे शोषक आणि शोषित यातला फरक,खोटे कुणबी दाखले काढून,संपवण्याचे ऐतिहासिक कार्य करीत आहेत.फुले शाहू आंबेडकर यांचे समतेचे “ब्रँड” घेऊन निघालेल्या बामसेफी वामन मेश्राम आणि इतर यांनी मराठे कुणबी एकच आहेत. समता विषमता या सख्या बहिणी आहेत.दूध आणि गटाराचे पाणी समान आहे.हे सांगून “समाज प्रदूषण” हा इतर पर्यावरण प्रदूषण,समुद्रप्रदूषण, हवा प्रदूषण,ध्वनी प्रदूषण,जलप्रदूषण यांच्या प्रदूषणा सारखा,नवा प्रयोग प्रबोधनकारांच्या महाराष्ट्रात मराठ्यांनी सुरू केला आहे.

   उच्चवर्णीय मराठा ब्राह्मण वैश्य यांच्या अत्याचारांसमोर झुकणे हीच गुलामी आहे.त्यांच्यासमोर त्यांचे धार्मिक विषमतेचे तत्वद्न्यान उघड करून,त्यांना समतेच्या आर्थिक,राजकीय,धार्मिक पर्यायांची जोड देणे.म्हणजे फुले शाहू आंबेडकर होणे होय.ज्यांच्या मनगटात अशी ताकद नसते?.ते विकलांग लोक वर्तमान परिस्थित दोन हात करून लोकशाहीची आरक्षणाची लढाई सोडून पळत सुटले आहेत.उच्चजातीयांची  आधुनिक गुलामी स्वीकारून पुरोगामी महाराष्ट्रात मानवी लज्जेलाही लाजवीत आहेत.आधुनिक स्वच्छ,सुंदर,सुसंकृत मातृसत्ताक मुंबईत “च्यायला मायला” करून पुरुषसत्ताक संस्कृतीचा उदो उदो करीत आहेत.

  मुंबईच्या सुशिक्षित स्त्रीयांना मग त्या रोज लोकलने ऑफिसला जाणाऱ्या महिला असोत,पत्रकार असोत,खासदार सुप्रिया ताई असोत,कुणी आगरी कोळी महिला असोत?.ओबीसींच्या नाही तर मराठ्यांच्या मुली,आणि मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री मनुस्मृतीच्या विषमतेतून सुटत नाहीत.आमचा हा महाराष्ट्र असा स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या विरोधातच जगतोय.आता जारंगेंची लढाई समतेसाठी आहे की विषमते साठी?

मला फोन करून सांगा.

  मराठा आरक्षण आंदोलन,मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक ठिकाणी शौच,पुरुषांचेअर्ध नग्न स्नान,मदिरापान यांचे “विश्व रूपदर्शन” लोकांना घडवित आहे.हे सारे भगवे झेंडे लाऊन केलेले आंदोलन,हे दुसरा कुंभमेळा मुंबईच्या सागर किनारी करण्याचा धर्म संकल्प मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदी सरकारचा प्लॅन नाही ना? सरकारने लक्षात घ्यावे ही मुंबई अदानीची नाही.कष्टकरी सागरपुत्र आगरी कोळी कुणबी भंडारी यांची होती,आहे,आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राहील.जोपर्यत समुद्रात पाणी आहे तोपर्यंत येथे कोळी आहे.शूद्र आहे.ओबीसी आहे.मुंबई घाण करून जिंकता येत नाही.ती स्वच्छ सुंदर करूनच,तिचे मन जिंकून जिंकता येते.जरांगे मुंबई ची सत्ता मिळविण्याचा हा मार्ग नव्हे.

   इंग्रजांच्या शासन काळात मुंबई महानगर पालिका इमारत,छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन या नेत्रदीपक हेरिटेज इमारती पाहून,सार्वजनिक कामातील आदर्श बांधकामाचा आदर्श खेड्यातून आलेल्या महाराष्ट्राचा शासक “मराठा जातीला” समजाउन सांगणे. हे त्यांच्या जातीचे नगर विकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्रीअजित दादा पवार आणि सकल हिंदू शासक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी यांचे काम होते.मुंबईतील आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांचा समुद्र,शेती,जंगल,घरे,कोळीवाडे गावठाणे,बौद्ध लेण्या,किल्ले तुटत असताना.आम्ही आगरी कोळी भंडारी लोकांनी आंदोलन केले. तर त्यास परवानगी नाकारून पोलिसांकडून अटक केली जाते.जरांगेना मात्र कसेही, कुठेही आंदोलनास शासकीय गालिचे अंथरले जात आहेत.ही विषमता आहे.हाच फरक आहे ओबीसी शूद्र आणि मराठ्यात आहे.हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.

   सायन कोळीवाडा जेसीबी लावून चारशे पोलिस घेऊन तोडत असताना.आमची लाडकी बहीण वीणा केनी कोणत्याही आजी माजी गृहमंत्र्यांना दिसली नाही. सारा संसार उघड्यावर आला.आमच्या कोळीवाड्यातल्या मुलांचा आक्रोश मुंबई महानगर पालिका,महाराष्ट्र शासन यांना दिसला नाही.यातून हेच सिद्ध होते.अजूनही बहुसंख्य ,मुख्यमंत्री गृहमंत्री हे कुणबी आगरी भंडारी शूद्र ओबीसी नाहीत.तर ओबीसी,शूद्र विरोधी मानसिकतेचे मराठा (क्षत्रिय) ब्राह्मण वैश्य हेच आहेत.

    ओबीसी आंदोलनात अलीकडे ॲड.मंगेश ससाणे,प्रा.लक्ष्मण हाके या उच्च शिक्षित ओबीसी तरुणांचे नेतृत्व पुढे आले आहे.त्यांचे नव नवे युक्तिवाद आरक्षणाची चळवळ नव्या उंचीवर घेऊन जात आहे.तरीही मंडल आयोगाच्या संघर्षात जे आंबेडकरी नेते लढले तिथपर्यंत ओबीसी तरुणाई पोहचलेली नाही.कालची माननीय मंत्री महोदय छगनभाऊ भुजबळ यांची संयमी पत्रकार परिषद गाजली.राजकीय नेतृत्वाने कसे अभ्यासपूर्ण पुरावे घेऊन बोलावे.ओबीसी या शेकडो मागास जातीना लढण्यासाठी नेता कसा असावा?.याचे नवे आदर्श ओबीसी आमदार खासदार यांना देणारी ही पत्रकार परिषद होती.त्यांच्या सारखे अनेक राजकीय नेते न्यायमूर्ती,वकील,प्राध्यापक,सामाजिक कार्यकर्ते,निवृत्त आयपीएस,निवृत्त आयएएस मराठा समाजात आहेत.  मुंबईतील मराठा आंदोलनाचे नेतृत्व अशिक्षित अडाणी,असभ्य शिव्या प्रत्येक वाक्यात ठेऊन.मराठी भाषेला नव्या व्याकरणाचा आदर्श देणाऱ्या लोकांकडे का?.साऱ्या साहित्यिक महाराष्ट्राला माझा हा विनम्र प्रश्न आहे.भर गणेशोत्सवात काहीतरी आदर्श असे प्रदर्शन माझ्या मराठा बांधवानी मुंबई मध्ये करावे.हुंडा नाकारून आपल्या आई बहिणी मावश्या आज्या यांना जिजाऊ सावित्री अहिल्या माता रमाई,आई एकवीरा यांना मानवी जीवनात जपावे.ही मातृसत्ताक संस्कृती मुंबईची आहे.स्त्रीयांना देव्हाऱ्यात देवी म्हणून पूजा करणे हे हिंदू कर्मकांड आहे.मुंबईची आगरी कोळी भंडारी महिला मासळी मार्केट ते घर अशी सारी अर्थव्यवस्था पाहते.कुतुहल म्हणून कुणी मराठा भाऊ शेअर मार्केट पहायला गेला.

कधी तरी स्त्री पुरुष समतेचे मुंबई महिला मासळी मार्केट पहा.हातात काती कोयता घेऊन चाळीस पन्नास किलोचा मासा उभा चीरनारी,फाडणारी कोळीन मावशी पाहिलीत,की तुम्हास राजमाता जिजाऊ दिसतील.जिने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा घडविला.ज्यांनी आदिलशाही निजामशाही नाही?,तर पाटील आणि देशमुख यांची उच्चवर्णीय सरंजामी आणि शूद्र जातींवर अत्याचार आक्रोश यांचे आवाज दाबणाऱ्या,गळे दाबणाऱ्या गढ्या उध्वस्त केल्या.आमच्या स्त्रीयांना पेशवाईत,ब्राह्मणी व्यवस्थेत “शूद्र” ठरविणाऱ्या गुलाम व्यवस्थेला मजबुत करण्यात क्षत्रिय मराठे होते? की शूद्र कुणबी आगरी भंडारी होते.?

कुणबी मराठे एकच होते? तर कोकणात ब्राह्मण मराठा,खोत सावकार,यांच्या विरोधात संविधान कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कुळ कायदा निर्माण करून कुणबी आगरी भंडारी यांची गुलामी संपविली.त्या जमीन पाणी जंगल शिक्षण हक्कांच्या संघर्षात मराठे कोणा बरोबर होते.?

   कुणबी मराठे एकच होते? तर ते कुळ कायद्याच्या आंदोलनात कुणबी आगरी यांच्या बरोबर का नव्हते?. आजही कोकणात जमीन हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,आगरी नेते नारायण नागू पाटील,भंडारी नेते सी के बोले यांच्या मार्गावर चालणारा एक मराठा,ब्राह्मण, आमदार खासदार नगरसेवक सरपंच दाखवा.वर्तमानात मुंबई कोकणातील गावे गावठाणे घरे विकून आपले सरंजामी राजकारण करण्यात नसलेला ब्राह्मण मराठा वैश्य मारवाडी राजकीय नेता दाखवा.विषमता ही मराठा बांधवांची रक्तात वाढलेली साखर आहे.ती कमी करणे.ही महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी तसेच देशासाठी गरजेची संविधानिक समतेची चळवळ आहे.ओबीसी आरक्षण हे समस्त ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांच्या अस्तित्वासाठी जीवनाचा संघर्ष आहे.तो आम्ही आरक्षणाच्या लाभधारक समस्त स्त्री शूद्र अतिशूद्र यांनी एकत्र लढला पाहिजे.

कोकणात डॉ.बाबासाहेब आबेडकर,आगरी नेते नारायण नागू पाटील,भंडारी नेते सी के बोले,लोकनेते माजी खासदार दि बा पाटील.सेझ विरोधी ओबीसी नेते दत्ता पाटील यांनी यांनी आम्हाला हा नवा जीवन मार्ग जगून दाखविला.या अहिंसक साविधानिक लोकशाहीत हा समतेचा लढा,जमीनदार,उच्च वर्णीय मनुवादी राजकीय नेते म्हणून आजही मला स्वतःला,मराठा ब्राह्मण वैश्य या माझ्या भारतीय भावा बरोबर करावा लागतोय.याचे खूप दुःख वाटते.

कुणबी तेली सुतार भटक्या विमुक्त जातींचे सोडा.आम्हा मुंबईच्या आगरी कोळी भंडारी आरमारी सागर पुत्रांनी २५०० वर्षापूर्वी श्रीलंका इजिप्त बरोबर सागरी व्यापार केला.आज आम्हाला ब्राह्मण मराठा भावा बहिणी बरोबर बंधू भावाचे नाते जोडायचे आहे.येणाऱ्या ओबीसी तरुण तरुणीच्या पिढ्या करू शकतील का सोयरिक? मराठा ब्राह्मण अदानी अंबानी लोढा यांच्या सोबत? एक नक्की आम्ही हुंडा देत नाही आणि घेत नाही.तरीही महाराष्ट्र आणि देशात उच्चवर्णीय आणि शूद्र अतिशूद्र यांच्यात विषमता आहे ना? म्हणूनच मराठा ओबीसी कुणबी यांच्यातील विषमता संपवावी म्हणून त्याला आयएस आयपीएस मुख्यमंत्री,गृहमंत्री, होऊदया.समतेची सुरुवात करा.मागे राहिलेल्या ओबीसीला तुमच्या बरोबर येऊद्या.फडणवीस,पवार,शिंदे साहेब तुम्ही ओबीसींना फसवून.लोकसभा विधानसभा जिंकली.कुणब्यांना,आगरी भंडारी,धनगर,सुतार, लोहार शिंपी एससी एसटी यांना ग्राम पंचायत,महानगर पालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती इथे तरी सत्ता द्या.प्रतिनिधित्व द्या.त्यासाठी आमचे ओबीसी आरक्षण सुरक्षित राहू द्या.त्यात जरांगे मराठे क्षत्रिय घुसखोरी थांबवा.

  जरांगे यांना EWS हे १० टक्के आरक्षण कळत नसेल का? ECBC हे कळत नसेल का? हे आरक्षणच आहे ना?.OBC हे शूद्र मागास वर्गीय आरक्षण आहे.त्यातील राजकीय आरक्षणाची मागणी समोर ठेवून होत असलेले हे मराठा आंदोलन सहज समजते?. राजकीय सत्तेसाठी ययाती सारखा सर्वनाश क्षत्रिय सत्तेने करू नये.“कामातुराना न भय ना लज्जा” अशी वेळ जागतिक कीर्तीच्या आधुनिक मुंबईत स्वतः वर आणू नका.

जेथे मागासवर्गीय जावई,अतिशूद्र सून चालत नाही.ज्या महाराष्ट्रात कोवळ्या पिढीचा आजही “आर्ची आणि परश्या” होतो.तेथे ओबीसी एससी एसटी यांची कवच कुंडले म्हणजे,आरक्षण,अट्रॉसीटी, कुळ कायदा ही अहिंसक लोकशाही हत्यारे गरजेची आहेत.जर मराठा ओबीसी यात फरकच नसता?.तर आर्थिक राजकीय धार्मिक विषमता संपविणारी समता भारतीय संविधानात कशाला आणली असती.?

जय संविधान.

जय ओबीसी.

राजाराम पाटील.

८२८६०३१४६३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *