मुखनायक महिला बचतगटाने भव्य भिम जयंती मिरवणुकीत ताक वाटप केले.

बातमी शेअर करा.

मुंबई भांडुप -विशेष प्रतिनिधी -: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंतीनिमित्त भांडुप विभागातील आंबेडकर नगर,तुलशेत पाडा,सिद्धार्थ नगर आणि मिलिंद नगरच्या भव्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना मुखनायक महिला बचतगटाने ताक वाटप केले.उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना आरोग्यासाठी उपयोगी असलेलं पेय म्हणून बचतगटाने ताकाची निवड केली.त्याचा भव्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. मुखनायक महिला बचतगट अध्यक्ष सोनाली येवले,उपाध्यक्ष भारती मोरे,सचिव दिक्षा मोरे,खजिनदार रुपाली सावळे, सभासद स्वाती गावडे,वंदना अहिरे,किरण गावडे,रेखा मोरे,अर्चना शाही, या सर्व सदस्याच्या सहकार्याने बचतगट काम करत असल्यामुळे दिवशेंदिवस प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे.

   भव्य भिम जयंती मिरवणुकीत ताकाचे वाटप केल्याने परिसरात महिला बचतगटाचे कौतुक करण्यात येत आहे. परिसरातील मित्र मंडळाच्या कार्यकामात मुखनायक महिला बचतगटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना आवर्जून बोलवण्यात येत आहे. मिलिंद नगर येथे आयोजित नृत्य स्पर्धेत भारती मोरे व आरती सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या गीतावर सुंदर नृत्य सादर केल्याने त्या कौतुकास पात्र ठरल्या,महिला एकत्र आल्या त्यांना संधी दिली तर त्या काही ही करू शकतात. असा मुखनायक महिला बचतगटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विश्वासाने करून दाखवले.

आंबेडकरी चळवळीतील तरुण तडफदार समाजसेवक,मिलिंद तरुण मित्र मंडळाचे ज्येष्ट पदाधिकारी संतोष गौतम तायडे,शिवसेना उबाठा कार्यकर्ते समाज सेवक सुभाष वाकोडे यांनी ताक वाटप स्टोल ला भेट देऊन मुखनायक महिला बचत गटाच्या कौतुकास्पद कामगिरीचे हार्दिक अभिनंदन केले.सामाजिक बांधिलकी ठेऊन महिलांनी  संघटित होऊन बचत गट निर्माण करून आर्थिक अडचणीवर मात्र करू शकतो. हे भव्य भिम जयंती मिरवणुकीत ताक वाटप करून मुखनायक महिला बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. 

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *