हा माणूस एक फर्डा वक्ता,संविधान अभ्यासक,निष्णात कायदेतज्ज्ञ म्हणून अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे.

बातमी शेअर करा.

या माणसाविषयी मी नव्याने काही सांगावं,असं मुळीच नाही. कारण हा माणूस एक फर्डा वक्ता,संविधान अभ्यासक, निष्णात कायदेतज्ज्ञ म्हणून अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. हा माणूस असेल कर्मवीर दादासाहेब रुपवतेंचा चिरंजीव.पण ह्या माणसाने कधीही या महान वारशाचं अवडंबर केलं नाही. ह्याचं वागणं,बोलणं हे नेहमीच एखाद्या मित्रासारखं राहिलं आहे.या माणसासोबत आम्ही कैकदा फाईव्ह स्टार हॉटेल मध्येही जेवलोय आणि रस्त्यावर उभं राहून वडापाव, भजी सुद्धा खाल्लेत. दरवर्षी सहा डिसेंबरच्या माहौलमध्ये या माणसासोबत दादरच्या सेनापती बापट चौकात असणाऱ्या इराणी हाॅटेलमध्ये आमलेट पावावर आम्ही मनसोक्त ताव मारत असतो. माझ्या कॅन्सरच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस या माणसाने फक्त आर्थिक भारच उचलला नाही  तर प्रत्यक्ष हाॅस्पिटलमध्ये उपस्थित राहुन अगदी मोठ्या भावासारखा मला भरभक्कम आधार दिला. अशा या बंधूसमान ॲड.संघराज रुपवतेंचा आज वाढदिवस आहे.या माझ्या सर्वगुणसंपन्न अशा भावाला या निमित्ताने आभाळभर सदिच्छा! 

          विवेक मोरे- 8451932410,मुंबई.

Mumbai May 13 :- Former D G P – Suradkar along with Advocate Sangharaj Rupwate address to media regarding Ramabai Ambedkar riot case in Mumbai. ( pic by Ravindra Zende )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *