रतनकुमार साळवे यांना ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर : पत्रकारितेतील सामाजिक योगदानाचा होणार गौरव.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, वैचारिक जागृती आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत दैनिक ‘निळे प्रतीक’चे संपादक रतनकुमार साळवे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा मराठी साहित्य संमेलन निमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.


   रतनकुमार साळवे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. दैनिक ‘निळे प्रतीक’च्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी चळवळ, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य, समता आणि परिवर्तनवादी विचारांना सातत्याने लेखणीच्या माध्यमातून अभिव्यक्त केले आहे. अन्याय, विषमता आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कारासाठी’ निवड केली आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. संघर्ष बळीराम सावळे यांनी निमंत्रणपत्राद्वारे साळवे यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.या पुरस्कारामुळे आंबेडकरी आणि परिवर्तनवादी पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारितेच्या योगदानाचा गौरव होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *