
विशेष प्रतिनिधी मोताळा – थायलंड येथील राजघराण्यातील पूज्य भिख्खू भदंत अजान जयसारो यांचा बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष मंगलमय संवाद धम्मयात्रा सुरवात झाली आहे. मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणी ही मंगलमय धम्मयात्रा भेट देणार आहे.२७ डिसेंबर ला दुपारी २ वाजता त्यांचे धम्मसारा शांतीभूमी टाकळी वाघजाळ येथे आगमन झाले होते,२८ डिसेंबर रोजी कोऱ्हाळा बाजार येथे आगमन झाले असता धम्मक्रांती ग्रुप कोऱ्हाळा बाजार धम्म उपासक राजेंद्र सुखदेव सोनोने, विजय मनोहर उजागर,ऍड पुकराज सुरडकर,श्रावण रावजी इंगळे,स्वप्नील राजाराम सुरडकर,सचिन उजागर,दीपक मोरे,सचिन बिऱ्हाळे,करण हिवाळे,गौरव आनंदा खराटे यांनी त्यांचे पुष्प उधळून भव्य स्वागत केले.

ग्रामीण भागात भिख्खू कसा असावा याबाबत माहिती देतांना तुडॉग म्हणजेच पाली भाषेमध्ये “धुतांग” ही भिख्खूनां सुख सोयीचा त्याग करून त्यांची साधना अधिक प्रगल्प करण्यासाठी आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी शक्तिशाली,ऐच्छिक प्रशिक्षण पद्धत आहे.असे पूज्य भंते अजान जयसारा यांनी सांगितले,या संपूर्ण कालावधी मध्ये भिख्खू संघ धम्मसारा शांतीभूमी टाकळी वाघजाळ येथे वास्तव करणार आहे.त्यावेळी ते धम्म देशना देणार आहेत त्यांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व धम्म उपासक उपासिका यांनी घ्यावा असे आवाहन धम्मक्रांती ग्रुप कोऱ्हाळा बाजार धम्म उपासक व धम्मसारा शांतीभूमी टाकळी वाघजाळ यांनी केले आहे.

गौतम मोरे +91 96047 02659 यांस कडून
