
विशेष प्रतिनिधी -भांडुप विभागातील प्रसिद्ध एन ई एस (NES) इंटरनॅशनल स्कूल, आय बी (IB) वर्ल्ड स्कूलमध्ये इयत्ता 6 मध्ये शिकत असलेल्या सुश्री कैरा ललित मानेक ने तिच्या 3 औद्योगिक डिझाइन पेटंटसाठी जागतिक युवा इनोव्हेटर 2025 जिंकल्यामुळे भांडुपच्या एन ई एस स्कूलचे व भांडुपचे नांव जागतिक पातळीवर पोचवले.
सुश्री कैरा ललित मानेक हिने तिचे तीन पेटंट सादर केले होते.
1. मेडिसिन बॉक्स डिस्पेंसरवर होते.
2. आय ड्रॉप डिस्पेंसर.
3. स्वयंचलित छतावरील पंखा क्लिनर.
हे तीन पेटंट सादर केले होते.

गीतांजली पब्लिक स्कूल,कोईम्बतूर येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भारत आणि यू ए ई (UAE) मधील शाळांनी भाग घेतला होता. तिची शाळा एनईएस इंटरनॅशनल स्कूल आयबी वर्ल्ड स्कूलचे प्रमुख प्रा.डॉ.आर. वर्धराजन सर यांनी आणि डॉ.अरुण रझा सरांसह मार्गदर्शन केले.ती तिच्या यशाचे श्रेय तिची शाळा,पालक, आजी आजोबा आणि कुटुंबाला देते. इनोव्हेटर 2025 पुरस्कार डॉटर ऑफ फेमस (सुप्रसिद्ध) डॉ.ललित अशोक मानेक. (एएसपीए दंत चिकित्सालय) यांची सुश्री कैरा ललित मानेक ही नात आहे. 3 डिझाईन पेटंटसाठी वर्ल्ड यंग इनोव्हेटर्स एक्स्पोमध्ये वर्ष 2025 मध्ये युवा शोधक म्हणून सन्मानित झाली आहे. त्याचा आम्हाला भांडुप च्या रहिवाशांना अभिमान वाटतो.असे डॉ.ललित अशोक मानेक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना आनंद व्यक्त केला.भांडुपच्या संस्था संघटना कडून कैरा ललित मानेक हिचावर हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकार साहित्यिक कामगार नेते सागर तायडे यांनी डॉ. अशोक मानेक यांची भेट घेऊन त्यांच्या नातीने भांडुपचे नांव जागतिक पातळीवर पोचवले म्हणून हार्दिक अभिनंदन केले.
