ज्येष्ट व वयोवृद्ध अनुभवी कामगार नेत्याने शांतपणे विचार करून वागावे व आत्मपरीक्षण चिंतन करावे.
विशेष प्रतिनिधी मुंबई- महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांनी दिनांक 15 जानेवारी ला मंत्रालयात बोलावले होते.नेत्याचा आदेश म्हणून 50/60 पदाधिकारी जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबई येथे मंत्रालयात आले होते. ते सर्व कामगार प्रधान सचिव मान.कुंदन मॅडम यांना भेटण्यासाठी गेले असता कामगार संघटना संयुक्त कृती समितिचे पाच प्रतिनिधीचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी कुंदन मॅडम च्या कॅबिन मध्ये बोलविण्यात आले असता.कृती समितीतील कॉम्रेड शंकर पुजारी यांनी प्रधान सचिव कुंदन मॅडम यांच्याशी चर्चा करतांना विषय व बोलण्याची मर्यादा पाळली नाही. त्यांना शांत राहण्याच्या सूचना करून हे ते येकत नव्हते व इतर सहकाऱ्यांना बोलू देत नव्हते.ज्या पद्धतीने ते कृती समितीतील कामगारांना हुकूमशाहीने अधिकारशाहीने वागणूक देतात.मीटिंग मध्ये कोणाचे ऐकून घेत नाही. एकट्याने प्रथम निर्णय घेतात.आणि मान्य नसेल तर कृती समिति व ग्रुप वरुन निघून जाण्यास सांगतात.त्याच आक्रमक पद्धतीने त्यांनी कुंदन मॅडम,इतर अधिकारी अवर सचिव (महिला) कक्ष अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली असतांना. परिस्थिति हाता बाहेर गेली. शंकर पुजारी यांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे सांगितले असता,सागर तायडे यांनी ते ज्येष्ट नेते व 74 वर्षाचे वयोवृद्ध असून त्यांना रक्तदाब व सुगरचा आजार आहे.त्यामुळे ते भडकले आहेत. कृपया त्यांना पोलिसांकडे देऊ नका,पाहिजे तर बाहेर काढा.अशी सर्वानी विनंती केली.गेल्या वेळी विनीत सिंगल वेद मॅडम ला भेटतांना असाच प्रकार घडला होता.तेव्हा मॅडम नी त्यांना गेट बाहेर काढण्याचा आदेश दिला.त्या नंतर कुंदन मॅडम यांनी शिष्टमंडळातील चार प्रतिनिधी सागर तायडे मुंबई,प्रशांत रामटेके वर्धा,प्रशांत मेश्राम अकोला,रत्नपाल डोफे यवतमाळ यांच्या बरोबर दहा मिनिटे शांतेतेने बांधकाम संघटना आणि कामगार यांच्या समस्यावर चर्चा केली.
शंकर पूजारीने बाहेर कामगारांना मॅडम व शिष्टमंडळातील सहकाऱ्या बाबत चुकीची माहिती दिली.झूम मीटिंग मध्ये सागर तायडे यांनी ही सत्य परिस्थिति सांगत असतांना झूम मिटिंगची लिंक बंद करून टाकली आणि खोटी माहिती आहे अशी ओरड सुरू केली. मंत्रालयात 50/60 पदाधिकारी जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते.त्यांना ग्रुपवर आणि झूम मीटिंग मध्ये बोलण्यास मनाई केली जात होती.ज्येष्ट व वयोवृद्ध अनुभवी कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांचे हे वागणे.म्हणजेच हुकूमशाहीने अधिकारशाहीने वागने कृती समितीला खाजगी कंपनी समजणे यामुळे कृती समिति मध्ये लोकशाही विरोधात हुकुमशाही निर्माण झाली आहे. ग्रुपवर कामगार संघटना पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नना समाधानकारक उतर न देता.मान्य नसेल तर बाहेर पडा असे उत्तर दिले जाते.बांधकाम कामगार संघटनेच्या 532 सभासद असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या ग्रुप मध्ये चर्चा न करता ग्रुपमधून बाहेर पडणे,हे ज्येष्ट व वयोवृद्ध अनुभवी कामगार नेत्याला शोभणारे नाही.स्वताची चूक मान्य न करता कृती समितीतील सहकाऱ्याची नाहक बदनामी करीत आहेत. हे लक्षात घेऊन कामगारांना व कामगार संघटना पदाधिकाऱ्यांना सत्य परिस्थिती समजावी म्हणून हे प्रसिद्धी पत्रक देण्यात येत आहे.ज्येष्ट व वयोवृद्ध अनुभवी कामगार नेत्याने शांतपणे विचार करून वागावे व आत्मपरीक्षण चिंतन करावे अशी नम्र विनंती त्यांना करण्यात आली आहे. म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील नोंदणी कृत कामगार संघटना यांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध कृती कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी मुंबई येथे बैठक बोलविण्यात येईल असे झूम मीटिंग मध्ये ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक सागर तायडे मुंबई,विनिता बाळेकुंद्री नवी मुंबई,राजकुमार होळीकर लातूर,प्रशांत रामटेके वर्धा,प्रशांत मेश्राम अकोला,रत्नपाल डोफे यवतमाळ,आनंद भालेराव धाराशिव,अजय कांबळे लातूर,ज्ञानेश्वर देशमुख सोलापूर,नितीन दवंडे हिंगोली,भूषण उइके अमरावती,मंगेश माटे भंडारा,व सर्व संघटना पदाधिकारी यांनी ठरविले आहे.यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिलेले आहे.