
बुद्ध आणि त्याचा धम्म.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगदी अलीकडे जो ग्रंथलिहिला गेला आहे तोच हा ग्रंथ आहे.हा ग्रंथ जो कोणी वाचला आहे. तो पुन्हा पुन्हा हा ग्रंथ सतत वाचल्याशिवाय राहत नाही.अस काय आहे या ग्रंथात? मानवी जीवनाच्या अनेक प्रकारच्या रोगांवर एकच औषध जे काम करेल अगदी असाच उपचार हा ग्रंथ मानवी जीवनाच्या सर्व प्रकारच्या अत्यंत वाईट सवयी, दुष्ट प्रवृत्ती, द्वेष भावना,राग,लोभ, चुकीच्या अपेक्षा,हिन भावनेतून आम्हाला सही सलामत बाहेर काढण्यासाठी मदत करतो.मानवी जीवन सार्थकी लावायचा विचार मनात निर्माण करतो.आपली सर्वांगीण प्रगती, विकास झपाट्याने कसा करावा याबाबत आपणास सविस्तर माहिती देतो.एका शब्दात सांगायचे तर आपणास आपल्याच बुद्धीची जाणीव करून देतो.
जगातील सर्वात उत्तम जगण्याचा मार्ग दाखवून देतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्धांना आपले गुरू मानले आहे.स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जग हे ज्ञानाच प्रतिक मानत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धांना आपले गुरू मानतात.आता आपण सामान्य लोक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू स्थानी जर मनापासून मानले आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललो तरच आमचा सर्वांगीण विकास झपाट्याने होऊ शकतो हेच सत्य आहे.पण आजही असं होताना दिसत नाही.आंम्ही असं का करतो आहोत याचा आज अनेक प्रकारांनी विचार केला तरीही याच एकच उत्तर आहे ते म्हणजे,आंम्ही आमच्या जुन्या,मोडकळीस आलेल्या परंपरागत रुढी, चालीरीती, संस्कार सोडायला तयार नाही.आणखी एक कारण आहे ते म्हणजे आमचा स्वतावरच विश्वास नाही, आणि आंम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवला नाही.त्यामुळे तर आजही मोठ्या प्रमाणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा अनुयायी समजणारा वर्ग हा भयंकर दुःख, यातना सहन करत आहे.

आंम्ही ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जबाबदारीने पाठराखण करायला सुरुवात करु त्याच क्षणापासून आमचे सर्व प्रकारचे वाईट संस्कार, सवयी नाहीशा होतील आणि आमचा खर्याअर्थाने पुनर्जन्म होईल.आणखीएक कारण आहे ते म्हणजे आमचा मोठा वर्ग हा त्यांना फक्त लिहायला आणि वाचायला येत पण ज्याठिकाणी बुध्दीची गरज आहे त्याठिकाणी तो बुद्धीच्या ऐवजी डोक्याला ताप नको म्हणून आपल्या बुद्धीचा वापर करत नाही.ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हे आपल्या बुद्धीच्या बळाची शक्ती समजून घेतील त्या दिवशी एका झटक्यात परिस्थिती बदलून जाईल.आंम्ही डोळे झाकून लोकांचे अंधानुकरण करत आलो आहोत.त्यामुळे समाजातील बहुजन लोक जे करतात तेच आंम्ही ही करतो असंच प्रत्येकजण आपापल्या परीने याच समाधान करून घेतो.ज्या दिवशी आमचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास समजून येईल त्याचवेळी महाराष्ट्रातील महार समुदायाचा सर्वांगीण विकास झपाट्याने होऊ शकेल.

बुद्धांनी सांगितलेला धम्म मार्ग समजून घेणे आवश्यक आहे.कालाम लोकांना धम्म मार्ग समजावून सांगत असताना भगवान एक वाक्य बोलले आहेत.तुमची तर्कशुद्ध पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमताच तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या सुखद आणि दुःखद प्रसंगी योग्य तो मार्ग दाखवून देईल.तुम्ही ज्याक्षणी तुमची वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणार तरच तुमचा विकास झपाट्याने होत राहणार आहे.लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतील मी काय सांगतो आहे, बुद्धीमान हुशार लोक काय सांगतात हे महत्त्वाच नाही.तुमच्या बुद्धीचा विकास हाच सर्व प्रकारच्या समस्या, दुःख, ञास, अडचणी, संकटे सोडविण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यांनी आणखी एक विचार मांडला आहे.तो म्हणजे या संपूर्ण विश्वात चमत्कार नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही,जे काही घडत आहे ते घडण्याला कारण आहे, विनाकारण काही ही घडणार नाही.जेव्हा कारण समजत नाही तेव्हा लोकांना वाटतं चमत्कार झाला आहे.अशा प्रकारे आपणास डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म मार्गच आपला वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.यासाठी आता तरी सर्व प्रकारची कर्मकांडे, अलौकिक पारलौकिक दैवी शक्ती चमत्कार सोडून या दोन महामानवांनी दाखवलेला धम्म मार्ग समजून घेण्यासाठी आवश्यक विचार करावा हि विनंती.
सुभाष भाऊसाहेब इनामदार ९०९६१९००९६,
(वीर शिदनाकांचे वंशज.) मु.कळंबी.ता.मिरज.जिल्हा – सांगली.

